फिरुनी नवी जन्मेन मी.....

Submitted by जिप्सी on 2 February, 2014 - 08:22

क्षमस्व....मायबोलीच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले सर्व प्रचि काढून टाकले आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्सी....

प्रचि. क्रमांक ८......अक्षरश: जीव ओवाळून टाकावा वाट्तो....विशेषत: त्या लाल स्कार्फ़ गुंडाळलेल्या बार्बी डॉलसम गोंडस मुलीच्या चेह-यावरील भाव पाहून.

सुंदर थीम...
खुपदा महाराष्ट्रातील ग्रामीण भागात प्रवास करताना, रस्त्यात शाळेला निघालेली मुले मुली दिसतात.
कधी कधी एस्टीतही गर्दी करतात.. हा बदल अगदी अलिकडचा. मला खुप आशादायी वाटतो. ती दृष्ये डोळ्यासमोरून तरळून गेली, हे फोटो बघताना.
अगदी गेल्या पिढीपर्यंत शिक्षणाबद्दल, खास करुन मुलींच्या शिक्षणाबद्दल फारच अनास्था होती आपल्याकडे.

क्या बात है जिप्सी ...... खरा कलावंत आहेस - दुसर्‍याचे अंतरंग जाणणारा .....

आतापर्यंतच्या तुझ्या सगळ्या थीममधील अतिशय उंचीवरची थीम ...... हॅट्स ऑफ ...

जिप्सीचे फोटो म्हणजे काय बोलावं ? स्तुतीपर सगळे शब्द ऑलरेडी वापरून संपलेत.

पण नुसते सुंदर फोटो न काढता अशा वेगवेगळ्या योग्य थीममधे सादर करण्याची त्याची क्रीएटीव्हीटी अफलातून आहे. मान गये उस्ताद!!

सुंदर थीम.
( ८ मार्च महिला दिनाच्या निमीत्त किंवा तत्सम काही निमीत्त पाहुन टाकली असतीस तर जास्त समर्पक वाटलं असतं. )

लाल स्कार्फ़ गुंडाळलेल्या बार्बी डॉलसम गोंडस >>> सॉरी पण अजिबात न आवडलेली उपमा.

सुंदर थिम.. शीर्षक वाचुन विचार करत होते की काय असेल आत? वाटले हिवाळ्यातले आणि मग वसंतातले ऋतुबदल असतील. Happy

खुपदा महाराष्ट्रातील ग्रामीण भागात प्रवास करताना, रस्त्यात शाळेला निघालेली मुले मुली दिसतात.
कधी कधी एस्टीतही गर्दी करतात.. हा बदल अगदी अलिकडचा. मला खुप आशादायी वाटतो. >>>> +१ ठाणे जिल्ह्यातील थोड्या भागात सर्व्हेसाठी गेल्यावर्षीपर्यंत जात असे तेव्हा काही पाड्यांवर १००% मुलं/मुली शाळेत जाणारी होती. १-१ तास जंगल तुडवत शाळेत पोहोचत होती. घरं बघाल तर बांबूच्या कामट्या जमिनीत रोवून भिंती तयार केलेल्या. तिथल्या जिल्हा बोर्डाच्या शाळेतले २-३ शिक्षक तर अगदी तळमळीने काम करणारे आढळले. त्यांच्या शिकवण्याच्या ड्युटीपलिकडे जाऊन त्यांनी आम्हाला कुठल्या वस्तीत जास्त गरज आहे सांगितलं, नेऊन दाखवलं आणि पुढेही को-ऑपरेट करायची तयारी दाखवली. असे सगळेच नोबल प्रोफेशनल्स (शिक्षण्/वैद्यकीय वगैरे) झाले तर काय बहार येईल! Happy

प्रतिसादाबद्दल धन्यवाद Happy

खुपदा महाराष्ट्रातील ग्रामीण भागात प्रवास करताना, रस्त्यात शाळेला निघालेली मुले मुली दिसतात.
कधी कधी एस्टीतही गर्दी करतात.. >>>>+१

( ८ मार्च महिला दिनाच्या निमीत्त किंवा तत्सम काही निमीत्त पाहुन टाकली असतीस तर जास्त समर्पक वाटलं असतं. )>>>>त्यासाठी दुसरी थीम डोक्यात आहे. Happy

अप्रतिम Happy हॅट्स ऑफ! वरचे गीत आणि नंतरचे प्रचि एकमेकांशी किती सुसंगत आहेत. डोळ्यात आशा, कुतूहल अशा अनेक भावनांच मिश्रण आहे यात.

जिप्स्या!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
तुझे फोटोज जितके ग्रेट आहेत ना त्यापेक्षाही जास्त ग्रेट तुला हे जे काही सुचतय ना ते 'सुचणं' आहे Happy

Pages