कपड्यांच्या फॅशन

Submitted by webmaster on 31 January, 2014 - 23:35

कपड्यांच्या फॅशन
वेगवेगळे कपडे, पॅटर्न
(साड्या आणि साड्यांशी निगडीत कपड्यांव्यतिरिक्त)
Fashion, dresses, patterns

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही मुली लेंगिंग्जना स्किनी जीन्ससारखे वापरतात हल्ली. ते भयाण दिसते.>>> मुली काय घालतील काही सांगता येत नाही, गळ्याला किती मोठे ठेवायचे याबाबतीत तर उजेड असतोच, पण खाली वाकले की मागून आनंदी आनंद असतो...

काही मुली लेंगिंग्जना स्किनी जीन्ससारखे वापरतात हल्ली >> आमच्या ऑफिसमधे टीशर्ट, शॉर्ट ट्युनिक असलं काहीही घालतात ! प्रिंटेड वर पण मिसमॅच टीशर्ट!

लाँग & स्लीम लेग्ज असतील आणि पॅन्टीजच्या आउटलाइन दिसत नाहीत याचं भान ठेवलं तर स्लीम & टॉल मुलींनी शॉर्ट कुर्ती/लाँग शर्ट / ट्युनिक्स लेगिंगवर वापरलं तर वाइट नाही दिसत. माझ्या ऑफिसमधे एक अति उंच मुलगी घालते. डिसेंट आणि ट्रेन्डी वाटतं तिच्या फिगरवर. ५फुट लोक कॉपी नाही करु शकत अशा फॅशन्स. Sad

बरं, मुलींनो मला सांगा, लेकीचा एक पांढरा लेसी फ्रॉक आहे. १-२ वेळा घातलाय पण लेकीने आईसक्रीमचा डाग पाडुन ठेवलाय समोर. घरी हाताने धुतला तर चालेल का की ड्रायक्लीनींगलाच देऊ???

योडे, तो फ्रॉक हाती धुवून रात्रभर व्हॅनिशमध्ये बुडवून ठेव. दुसर्‍या दिवशी जरा चोळून स्वच्छ धुवून टाक.

व्हॅनिश लिक्विड असेल तर ते अर्धा चमचा लिक्विड डागावर घास, आणि चमचाभर लिक्विडमधे एक तांब्याभर पाणी घालून त्यात फ्रॉक बुडवून ठेव. व्हॅनिश डिटर्जंट मिळाला तर थोडा डिटर्जंट पाण्यात घोळून डागावर चोळ, थोड्या डिटर्जंटमधे पाणी घालून त्यात फ्रॉक बुडवून ठेव.

ओक्के मंजु.

अनु, अगं लेसी म्हणजे असं थोडं वरचं कापड डेलिकेट आहे... श्या!!! सांगताच येत नाहीय मला नीट...

transparent चमकील कापड आहे का ?
ते जावू दे पण Vanish चा माझा अनुभव चांगला आहे .
थोड लावून ट्रायल घे .

नाही होत गं नी...

माझ्या लेकीने फ्रॉकच्या स्लीव्हला लिपस्टिकचा डाग पाडून ठेवला होता, तो व्यवस्थित गेला, फ्रॉकवरच्या बाकी रंगांना काही झालं नाही. पांढर्‍या फ्रॉकवर एक मोठी चमकदार रंगातली मिनी आणि बाकी सर्वत्र लाल रंगाचे चमकदार बदाम होते.

इन्स्ट्रक्शन्स काय दिलेल्या आहेत लेबलवर?
>>
बहुधा नाहीयत काहीच. आज गेल्यावर चेक करते.

transparent चमकील कापड आहे का ?
>>
अगं नेटसारखं आहे, पण नेट नाही म्हणता येणार.

१-२ दिवसात बघेन वॅनिश वापरुन.

Are wah paTiyala majha favourite.
Patiyala chi fashion old nahi hot kadhi. Festive clothes chya fashion madhe patiyala chi fashion yeun jaun aste. Pan normal office wear sathi vagere Chan....
Hyper madhle patiyala n odhnya, leggings third class quality che ahet.

काळ्या प्लेन जॉर्जेट ला लेस लावून डिझायनर बनवायची आहे(खरं म्हणजे पहिल्या संक्रांतीनंतर घरात पडून आहे ती वापरात आणायची आहे.) कशी/कोणत्या रंगाची लेस सुट होईल? इबे वर मस्त लेसेस आहेत.
अगदी कॉन्ट्रस्ट रंग (उदा गुलबाक्षी वर सोनेरी काम) वाली लेस घ्यावी की काळी आणि थोडेफार रंगीत काम असलेली घ्यावे यावर विचारांचे घोळ आहेत, शिवाय ब्लाउज ला ती लेस कशी दिसेल हाही विचार करायचा आहे.

I would go with golden lace. You can not go wrong with gold lace on black saree. काँट्रास्ट लेसपण छान दिसेल, पण रंग बघून घे. लाल, तू म्हणतेस तसा गुलबक्षी किंवा फुशिया छान वाटेल. गोल्डन स्लिवलेस किंवा हॉल्टर नेक, डीप नेक ब्लाऊज :). त्या वामाजवळच्या दुकानात ब्लाऊजची बरीच डिझाईन्स आहेत. तिथूनपण निवडता येईल.

मी_अनु, हा फोटो बघ

kali sadi 3 (Large).jpg

काळ्या साडीवर सोनेरी टिकल्यांची फुले आणि सोनेरीच (रेशमी, जरीचे नाही) काठ आहेत, असे काही करता येते का बघ, ही साडी फारच सुंदर दिसते

गोल्डन बॉर्डर जरा झगडीमगडी दिसते असं मा व + १
मग त्या साड्या अगदी स्पेशल ऑकेजन च्या होतात.

काळ्या साडीला पेस्टल कलर मस्त दिसतात. पिस्ता, पिंक, आकाशी .
जास्त पैसे खर्च करायचे असतील तर ह्याच रंगामध्ये पारसी वर्क च्या लेस मिळतात का बघ & हेच कलर असणारे फ्लोरल प्रिंट चे ब्लाउज घे.

सायो & मॄणाल, me too against black - golden combination. पार्टी वेअर असेल तर निऑन कलरची बॉर्डर छान दिसेल. पण रिच आणि क्लासी हवी. नाही तर कित्येक वेळा सुंदर साडी लेसमुळे चिप /ऑर्डिनरी दिसते. अगदी महाग पार्टीवेअर पण पाहिली आहेत दुकानात, जे चुकीच्या लेसमुळे वाईट दिसत होते. कोणत्याही ड्रेसला लेस लावायची तर लेसची चॉइस चांगलीच हवी, नाही तर ड्रेसचा ग्रेस जातो.

ब्लॅक लेस हा तर फेवरिट आणि सेफ पर्याय. मस्तच दिसतो. शिवाय वाट्टेल ते छान छान ब्लाउजेस घालता येतात.

कॅम्प मध्ये क्लोवर center ला गेलीस तर लेस पण मिळेल,
वेस्ट एंड च्या बाजूने बेसमेंट ला गेलीस कि उजव्या हाताच्या शेवटच्या लेन मध्ये १-२ दुकान आहेत लेसची . त्यानाच विचार कोण लावून देतील . बाहेरच बसलेले असतात .
एका दिवसात लावून पण देतील. सकाळी लवकर गेलीस ५-६ वाजेपर्यत साडी हातात मिळू शकते .
हे काम स्वस्तात होईल .
जर अगदी designer करायची असेल तर कुठल तरी बुटिक गाठ. पण बर्याच बुटिक वाल्या इथनच लेस घेतात.

Pages