कपड्यांच्या फॅशन

Submitted by webmaster on 31 January, 2014 - 23:35

कपड्यांच्या फॅशन
वेगवेगळे कपडे, पॅटर्न
(साड्या आणि साड्यांशी निगडीत कपड्यांव्यतिरिक्त)
Fashion, dresses, patterns

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अछा, इथे पुरुषांच्याही कपड्यांच्या फॅशन बद्दल चर्चा केली तर चालेल का? किंवा तसा एखादा धागा आहे का?

लेकीला (वय १४) दिवाळीसाठी लेहेंगा / घागरा आणला आहे. वरचा ब्लाऊज / टॉप इत्यादी प्रकार पुण्यात कुठे मिळतील? इनामदार (रेडीमेड ब्लाऊज) ह्यांच्याकडे मिळतील का?

वय १४ ला इनामदार कडचे सर्वात स्मॉल साइझ चालू शकेल. ईनाम दार डिझाईन्स मला जरा जुनाट वाटतात.
जवळ शनीपार गल्लीत बरीच रेडी ब्लाउज ची दुकाने आहेत ती पण पहा. (थोडा वेळ असेल आणि रंग एखादा डाऊटलेस असेल(काळा, गोल्ड, पांढरा, लाल इ.)तर ऑनलाईन मधे पण खूप व्हरायटी आहे.)

थँकू mi_anu.

ऑनलाईन मधे पण खूप व्हरायटी आहे>>> ऑनलाईन घेतला तर साईझ काय घ्यावा ते कळत नाहिये म्हणून शक्यतो दुकानातून घ्यायचाय.

शनीपार गल्लीत बघते.

नताशा, चितळे समोर शालगर मध्ये बघ की ( मन्डई कडे जाताना गोरे बन्धुन्समोर, अनोखा केन्द्राशेजारी) तिथे परकर पोलके आणी साड्या ( लहान मुलीन्च्या ) मिळतात. त्यान्चे अजून एक मोठे दुकान लक्ष्मी रोडला आहे बहुतेक. त्यानाच विचार तिथे नाही मिळाले तर.

ऑनलाईन घेताना त्या त्या ठिकाणी माप कसे घेउन कोणता साईज घ्यावा ते सुचवतात ना, ते उपयोगी येत नाही का? (कोणी केले असल्यास अनुभव सांगा प्लीज)

नताशा, जयहिंदच्या गल्लीमधे एक दुकान आहे तिथे खूप व्हरायटी आहे ब्लाऊजच्या डिझाईन्समधे. जाऊन बघा नक्की.

नताशा, जयहिंदच्या गल्लीमधे एक दुकान आहे तिथे खूप व्हरायटी आहे ब्लाऊजच्या डिझाईन्समधे. जाऊन बघा नक्की >>> नक्की सहेली Happy

नताशा सहेलीने सांगितलेल्या दुकानाचं नाव आराधना... खुप व्हरायटी मिळेल तिथे.>>> नाव कळले ते बरे झाले अमृता. आत शोधायला बरे पडेल Happy

सुजाता मस्तानी वरुन सरळ पुढे (स.प च्या बाजुला) सोहम नावाच दुकान आहे.तिथे ही चांगले मिळतील.किंमत सुदधा वाजवी आहे.मेन लक्ष्मी रोड ला थोडे महाग मिळतील अस वाटतय.

सोहम च्याच आजूबाजूला पूर्वा नावाचे दुकान आहे ब्लाऊज चे. ते दुसर्‍या समोर च्या दुकानात रेडीमेड नऊवारी पण विकतात.

धुतल्यावर गेला नाही रंग की कळतेच. एरवी अशी काही टेस्ट नाहीये.
जनरली फॅक्टरीमेडमधे रंग जाऊ नये यासाठी प्रक्रिया केलेली असते. पण तरी ठराविक निळा, मोरपंखी, आमसुली वगैरे जातातच.

माझ्या अनुभवात फॅब इंडियातल्या बर्‍याच कपड्यांचे रंग गेले आहेत (ते बहुतेक ऑरगॅनिक रंग वापरतात) आणि वेस्ट साईड मधल्या कुर्त्यांचे नाही गेले, अर्थात वेस्ट साईड मधल्या पंजाबी ड्रेसेस चे गेले आहेतच.
बांधणी/राजस्थानी कामाचे रंग जातातच पहिल्या एक दोन दा.
असे रंग जाणारे चार पाच ड्रेस आठवड्यात घतले असले की सगळे हाताने धुवावे लागतात, तितका पेशन्स अंगी नसल्याने आठवडी एकच रंग जाणारा ड्रेस घालून तो एखाद्या दिवशी वॉशिंग मशिन ला डार्क कपड्यांबरोबर टाकते.

अनु, अश्या सर्व समीकरणांना तडा जाईल असेही अनुभव आहेत. म्हणजे सिंथेटिक आणि वेस्टसाइड किंवा तत्समवाले आहे म्हणून जाणार नाही रंग म्हणावे तर घामाने स्किनला लागतो रंग.
व्हेजिटेबल डाय आणि हॅण्डलूम कॉटन म्हणजे नक्कीच जाईल तर पहिल्या धुण्यातही फक्त खळ निघते इतकंच होतं.
असा सगळा प्रकार. तस्मात समीकरणे नाहीतच.

हॅण्डलूम कॉटन वगैरे असेल तर फर्स्ट वॉश कंपलसरी ड्रायक्लीन आणि मग वेगळे धुणे. कोमट किंवा गार पाण्यात भिजवणे वगैरे.

रंग जाणारे चार पाच ड्रेस आठवड्यात घतले असले की सगळे हाताने धुवावे लागतात >+१
कॉट्न सोडून कमी कटकटीचे , स्कीन फ्रेंडली असे फॅब्रिक कुठेले?

मिक्स कॉटन्स असतात ना. त्यातल्या बर्‍याचश्यांचा पहिल्या एखाद्या धुण्यानंतर रंग जाणं बंद होतं.

असे रंग जाणारे चार पाच ड्रेस आठवड्यात घतले असले की सगळे हाताने धुवावे लागतात, >> वेगवेगळे धुतले तरी तो ड्रेस जर मल्टीकलर्ड असेल तर? म्हणजे उदाहरणार्थ, फिक्या पिवळ्या रंगावर लाल बटरफ्लाइज असं प्रिंट आहे. अशा वेळस कितीही नाजुकपणे धुतलं तरी फिक्या रंगावर दुसरा रंग पसरातो आणि बेस कलर खराब होतोच. त्यासाठी काही टीप्स??

हॅण्डलूम कॉटन वगैरे असेल तर फर्स्ट वॉश कंपलसरी ड्रायक्लीन आणि मग वेगळे धुणे.>>> हो पण लॉन्ड्रीमधे डेलिकेट कपडे वॉशिंगसाठी काही स्पे. सुचना नाही देता येत. इकडे इंन्ड्यामधे तरी सगळे कपडे सरसकट सुपर वंडर वॉश होवुन येतात. मग फॅब आणि Either Or सारखे organic clrs लॉन्ड्रीमधुन आल्यावर जुनाट आणि भलत्याच न आवडणार्‍या कलरचे झालेले असतात. ( लॉन्ड्रीचा काहीसुद्धा दोष नाही. नेहमीचीच - स्वारगेटची फेमस 'सुपर'. ) अशा वेळेस काय करता?

कॉटन साड्या, ड्रेसेस किंवा रीच कॉटन दुपट्टे हा भलताच टेन्शनचा मामला झालेला आहे.

बोल

फर्स्ट टाईम ड्राय क्लिनिंग आणि मग होम वॉश. प्युअर कॉटन ड्रेसेस चे खुप कमी वेळा रंग गेले आहेत. क्वचितच.
बाटीक चे वैगरे कपडे जाड मिठाच्या पाण्यात भिजवुन ठेवले तर पहिल्यांदाच थोडा रंग जातो नंतर नाही जात शक्यतो.

आमच्या ड्राय क्लीनर ने पण रंग घालवले आहेत. एकदा क्रम्पल्ड कॉटन चा टॉप दिला होता. शहाण्याने कडक इस्त्री मारुन दिला आणी म्हणाला किती चुरगळला होता मी बघा छान इस्त्री केली.आता तो पिळून चुरगळत बसावा लागतो धुतल्यावर.
कपडे ड्रायक्लीन वाले जास्त घेत नाही.

खडा मीठ प्रोसेस कशी आहे? मीठाच्या पाण्यात किती वेळ भिजवायचं, त्यामधेच सोप पावडर टाकायची कि नंतर वेगळ्या पाण्यात टाकायची, कि आधी वाळवुन मग नंतर साबणाने धुवायचं? एक कॉटनचा फिका & डार्क combination चा कपडा धुणं लांबलं आहे आणि त्यामुळे तो बरेच दिवस वापरताही येत नाहीए.

मृणाल, Dye Fixer कुठे मिळेल? ब्रॅन्ड माहित आहे का? एकदा 'सोप & वॉशिंग' सेक्शन मधे कलर फिक्स नावाचं काही पाहिलं होतं, ते बहुतेक याच परपज साठी असावं, पण नंतर कधीच दिसलं नाही.

त्या साईटवरून काल एक ड्रेस ऑर्डर केलेला, पण सहा वेळा रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा लागला आणि शेवटी ऑर्डर कॅन्सल करीत आहोत, पुन्हा ट्राय करा असा मेसेज आला. मग नादच सोडला.

डाय फिक्सर दिप्ती केमिकल्स मधे मिळू शकेल कदाचित विजय टॉकिजच्या इथे. पण ते प्रत्यक्ष डाय करताना वापरायचे असेल.

Pages