बारीकराव ....

Submitted by पुरंदरे शशांक on 29 January, 2014 - 02:23

बारीकराव...

एक होते बारीकराव
सदा त्यांची काव-काव

नक्को हे पोहे अस्ले
कोथिंबीर खोबरे किस्ले ???

पोळी-भात आवडेना
भाजी कोणती चालेना

अजून होती बारीक बारीक
सग्ळे म्हण्ती आली खारीक

बारीकराव बसले रुसून
आई सांगे त्यांना हसून

पोळी-भाजी, भात ताजा
सग्ळे खावे माझ्या राजा

कोशिंबीर करकरीत
फळे मस्त रसरशीत

मजेत खावे सग्ळे मस्त
सोडून सारे वेडे हट्ट

घट्ट - मुट्ट होशील बघ
कोण कशाला चिडविल मग .....
-----------------------------------------------------
(सुज्ञ आई-बाबांनी आपल्याला हवा तो बदल करुन घेणे. एकंदरीतच लेकरांचे दररोजचे जेवण-खाण सुफलतेने पार पडो हीच नित्य शुभेच्छा...... Happy Wink ....)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

mast...

आवडली ....................................