बालि सहल - भाग १ - तनाह लोट

Submitted by दिनेश. on 26 January, 2014 - 22:57

यावर्षीच्या सुट्टीत बालिला जायचे अगदी शेवटच्या दिवसात ठरले. माझा आधी फिजीला जायचा विचार होता पण
लेकीचे आणि माझे वेळापत्रक जुळले नाही. मग तायपेईचा विचार केला होता. नेटवर जी माहिती आहे त्यानुसार
भारतीयांना तैवानचा व्हीसा ऑन अरायव्हल मिळतो असे कळले पण ते चुकीचे होते.

शेवटी थॉमस कूकच्या मानसी गोरे यांनी सुचवल्याप्रमाणे बालि ला जायचे पक्के केले, कधी नव्हे ती मला यावेळेस
माझा पुतण्या, केदारची सोबत होती.

सिंगापूर एअरलाईन्सची तिकिटे तर बूक केली. आणि मी भारतात आल्यावर हॉटेल निवडले. नंतर विचार करता
डेली एस्कर्शनस पण बूक करता येतील असे वाटले आणि ती पण बूक केली. हे सगळे अगदी शेवटच्या दिवशी केले.
सगळ्याचे कन्फर्मेशन यायला वेळ लागणार होता.

आधी कबूल केल्याप्रमाणे मी वर्षूच्या घरी जायला निघालो तरी माझ्या हातात तिकिट वा हॉटेल व्हाऊचर नव्हते.
वर्षूने बरीच वर्षे इंडोनेशियात वास्तव्य केले आहे तिच्याकडून काही टिप्स मिळाल्या. रमेशभैयानी ( मि. वर्षू ) मला
तिथे आर्टइफेक्ट्स घ्यायचा सल्ला दिला.. दोघांचे सल्ले नंतर खुपच उपयोगी पडले.

विमानतळावर पोहोचलो तरी हातात काहीच पेपर्स नव्हते. केदार ते सगळे घेऊन आला. ( थॉमस कूकने घरी पाठवले
होते. )

सिंगापूर एअरलाईन्सने सिंगापूरला पोहोचलो. दूध घातलेला मसाला चहा देणारी ती एकमेव एअरलाईन असावी.
सिंगापूरला जेमतेम १ तास स्टॉप ओव्हर होता. देनपसारचे विमान लागलेलेच होते.

सकाळी बालिला पोहोचलो. व्हीसासाठी फक्त २५ डॉलर्स लागतात. फोटो वगैरे लागत नाही. ते काम झटपट होते.
बाहेर आमचा एजंट विजय माडे आलाच होता. विजय खुप बोलका आहे आणि पुढे ५ दिवस त्याने छान माहिती
दिली. माझ्या सर्व प्रश्नांना छान उत्तरे दिली.

तनाह लोट आणि आमचे हॉटेल दोन वेगवेगळ्या दिशांना असल्याने आधी थेट तनाह लोट ला गेलो.

तनाह लोट चा शब्दश: अर्थ समुद्रातली जमीन. समुद्रात असलेल्या एका खडकावर हे देऊळ १५ व्या शकतात, निराथा नावाच्या संताने बांधले. त्याने तिथे हिंदू धर्म स्थापन केला.
विजयने घाई करायचे कारण म्हणजे भरतीची वेळ होत आली होती. भरती असताना तिथे जाता येत नाही.
आम्ही पोहोचलो त्यावेळी भरतीची सुरवात झालीच होती त्यामूळे थेट त्या देवळाजवळ जाता आले नाही.
तसेही बालितल्या देवळात सर्वांना प्रवेश नसतोच. काही उत्सवांच्या दिवशीच ती उघडतात.

या ठिकाणचा सूर्यास्ताचा नजारा खुप छान असतो. पण तेवढा वेळ आमच्याकडे नव्हता. जे काही बघितले त्याचे
शब्दात वर्णन करणे अशक्य आहे.

१) विमानतळाहून बाहेर पडल्यावर दिसणारे एक देखणे शिल्प.

२) नंतर दिसलेला मारुतीराया

३) वाटेतली भातशेती. तिथे वर्षातून भाताची ३ पिके घेतात.

४) बहुतेक घरांच्या बाहेर दिसणारा हा स्तंभ. पण हे वृंदावन नाही. याबद्दल मग लिहितो.

५) तनाल लोटचे एक देऊळ.

६) जरा जवळून

७) दुसरी बाजू

८) त्यावरचा रस्ता

९) तिथले एक शिल्प

१० ) त्या वाटेच्या उजव्या हाताकडचे दृष्य

११ ) वाटेच्या शेवटी असणार्‍या देवळाचे प्रवेशद्वार

१२ ) तनाह लोटचे प्रथम दर्शन

१३ ) तिथे जायची वाट. भरतीमूळे बंद झाली होती. ( तिथे सूचना व घोषणा होत असूनही काही ऑसी लोक
धाडस करतच होते. )

१४ ) तिच वाट

१५ ) आणखी एक शिल्प

१६ ) लाकडावरचे अप्रतिम कोरीव काम

१७ ) उजव्या हाताला दूरवर दिसणारा एक धबधबा.

१८) डाव्या बाजूचे दृष्य

१९) आवारातल्या विसाव्याच्या जागा

२०) देवळाच्या शिल्पकलेशी मेळ खाणारी निवार्‍याची जागा

२१) तिथले सभागृह

२२ ) तेच सभागृह

२३) वॉटर लिली

२४) विस्तीर्ण पटांगण ( नेटवर लिहिल्याप्रमाणे तिथे दुतर्फा दुकाने नाहीत, सर्व दुकाने मुख्य गेटच्या बाहेरच आहेत. तीसुद्धा आवश्यक वस्तू विकणारीच आहेत. ) आतमधे मोजकी दुकाने आहेत. स्वच्छ टॉयलेट आहे.

२५ ) देवळात जायची वाट

२६) उंचावर दिसलेले एक ऑर्किड

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहाहा.. जुन्या आठवणींनी मन भरून आलंय...

उतरताक्षणी बाली च्या प्रेमात पडायला होतं..

सुंदर निसर्ग, अतिशय मनमिळावू माणसं सर्वच भुरळ पाड्णारं आहे

क्रमशः वाचून बरं वाटलं.. और आने दो!!!! Happy

मस्त Happy

ज्यांच्या मनात तिथे जायचे आहे, त्यांना खात्रीने सांगू शकेन कि ही मालिका संपेस्तो तूम्हा सर्वांचा अगदी दृढ निश्चय होणार.
आपण फक्त स्वच्छतेचे सुविचार लिहितो, तिथे ती आचरणात आणली जाते..
बी, तूझ्या बीबीची आठवण आली होती, पण घाईत वाचायचा राहिला.

वर्षू, म्हणतेय ते खरेय.. इतका मोकळा, स्वच्छ, हवेशीर विमानतळ बघितल्याबरोबर आपण योग्य जागी पोहोचलो असे वाटू लागते. एकच सांगावेसे वाटते कि जाताना एप्रिल / मे चे प्लानिंग करा. त्यावेळी हवा सुखद असते. या दिवसात जरा गरम असते आणि पाऊसही असतो. आम्हाला दोन्ही मिळाले.. पण अंगोलातला माणूस काय त्याला घाबरणार ? ( मेली कोंबडी आगीला भिते कि काय ? )

फोटो छान(म्हणून्च ब लेख बघायला मजा येतेय).

>>स्वच्छ टोयलेट आहेत<<< हे महत्वाचं. प्रवासात.

ओह त्या देवळात जायचा रस्ता असा आहे का? मागच्या एका धाग्यावर विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं Happy

मस्त आहेत सगळे फोटो. माहितीही आटोपशीर असल्याने भराभर वाचून, पाहून झालं.

आन्धळा मागतो एक डोळा आणी देव देतो दोन. अशी अवस्था होते जेव्हा तुम्ही आणी इतर मायबोलीकर ट्रिप करुन आल्यावर त्याचे फोटो आणी वर्णन लिहीता. खूपच छान वाटते असे अथान्ग निसर्ग सौन्दर्य पाहुन.

( बाकी ट्रिपचा खर्च ( हॉटेलसकट) लिहीलात तर बरे होईल.)

रश्मी, प्रत्यक्ष खर्च जरा जास्तच झाला पण पुढच्या भागात तो कसा वाचवता येईल त्याच्या टिप्स देतो.

Pages