आईऽऽ .. भूऽऽक ........

Submitted by पुरंदरे शशांक on 25 January, 2014 - 22:53

आईऽऽ .. भूऽऽक ........

कस्ली भूक लाग्लीये आईऽ
खायला लवकर कर ना काही

शिरा-उप्पीट कर नं काही तरी
तोवर जराशी चाखतो कचोरी

फरसाण चिक्की संपले सारे ??
आत्ता तर होते वेफर्स, कुरकुरे !!!

कुठय या डब्यात लाडू नि चकली ?
कडबोळी तीही एक-दोनंच उरली !!

अशी काय बघतेस मान वेळावून
बघ ना किती मी गेलोय कोमेजून !!

"पोट का पोतं हे म्हणायचं तुझं
आत्ताच जेवण झालंय कोणाचं ?"

"काढतात का कोणी असं कोणाचं खाणं
त्यात मी आहे बाळ तुझं शाणं !!!"

"काय ते बाळ दिस्तंय हो मला...
बकासुराचा जन्म झालाय पुन्हा !!!"

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शशांक मस्त मांड्तोस सगळं!
अगदी पट्लं भावलं!
एक गंमत आठवली.... माझा लेक शाळेतून घराच्या दारात आला की मोठ्यांदा काव ़काव करायचा!