असा मी तसा मी--भाग-७

Submitted by अविनाश खेडकर on 23 January, 2014 - 16:27

चार आण्याचा प्रसाद
देवाजीच्या दारात अन्
डोंगराएव्हढ्या कामना
भक्ताच्या मनात.

******************************
सगळ्यांच्याच जीवनाच एक
सामाईक धोरण
आयुष्याची दोन टोकं
जिवण आणि मरण.

******************************
साव कुनाला म्हणावं,
सगळेच हात बरबटलेले
साधु-संताचे मठही एथं
गुन्हेगारीत गुरफटलेले.

******************************
अशीच तु मला एकदा
उदास्-उदास दिसलीस
तेव्हा पासुन मला तु
माझ्यासारखीच भासलीस.

*******************************
आजकालचे प्रेमविवाह
चार दिवसात विटतात
त्याच्या तिच्या मनामध्ये
तिचे त्याचे दोष साठतात.

*******************************
भीती नावाची हडळ एक
आपल्याच मनात असते
रस्त्याकडेच झाडही तिला
भुतासारखे दिसते.

******************************

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान