झाले तितके बस्स!

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

झाले तितके बस्स!

समृद्धीची राख जाहली
किती माणसे नाहक गेली
सुरक्षित भावनाच मेली
फटाका जरी वाजला तरी मनात होते धस्स
झाले तितके बस्स....... १.

विध्वंसानंतरचि पहाणी
प्रसिद्धिसाठी तिची आखणी
"व्होट इच्छुक" हे राजकारणी
कपड्यावरली परिटघडीही होई न टस्स की मस्स
झाले तितके बस्स....... २.

पडझडीखाली चिणले जातो
कोपरानीही खणले जातो
सहिष्णु म्हणुनि गणले जातो
"क्षमाशील" या विशेषणातुन दिसतो पण बेबस
झाले तितके बस्स.....३.

बेशिस्तीशी आमचे नाते
लाचखोरिमधे काहि न चुकते
आतंक्यांचे यात फावते
बेछुट गोळीबार करुनी घालतात हैदोस
झाले तितके बस्स.........४.

ठरवा निश्चय आज मनाचा
बदला याचा जरुर घ्यायचा
वरदहस्त हो न हो कुणाचा
लंघुन सीमा करुन यायचे "कँपस्" तहस नहस
झाले तितके बस्स्.........५.

इथवर झाले तितके बस्स!

-मुकुंद कर्णिक (Mkarnik)

ही कविता मायबोलीकर मुकुंद कर्णिक यांची आहे. नवीन मायबोलीची पूर्ण ओळख नसल्याने त्यांनी मला पोस्ट करायला पाठवली होती, ती मी इथे माझ्या रंगीबेरंगीवर टाकली आहे.

प्रकार: 

लालु, कविता छानच आहे, Happy

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नयी तहज़ीब में दिक़्क़त ज़ियादा तो नहीं है I
मज़ाहिब रहते हैं क़ायम, फक़त ईमान जाता है II
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

कविता खरोखर मनाला लागणारी ! खरोखर आत्ता बस्स ही सर्वांची भावना कर्णिकांनी अतिशय छान व्यक्त केली आहे, त्यांच्या भावना 'शेअर' केल्याबद्दल त्यांना धन्यवाद ! त्याची कविता वाचता आली म्हणून लालू तुम्हासही धन्यवाद !

मुकुंद, कवितेतून अनेकांचे भाव व्यक्त होत आहेत. धन्यवाद.

लालू, तुम्हालाही धन्यवाद.
------------------------------
वाहू तुझिया चरणी भाळ, हेची तुळशीपत्र माझे