जात्यामधले दाणे रडती....

Submitted by नितीनचंद्र on 19 January, 2014 - 03:43

जात्यामधले दाणे रडती सुपातले हसती हे गीत मधुकर जोशींचे आहे. याला संगीत दशरथ पुजारी व आवाजही दशरथ पुजारींचाच लाभला आहे.

जेव्हा दोलायमान परिस्थिती निर्माण होते तेव्हा आपण जात्यात आहोत आणि भरडले जाणार आहोत किंवा सुपात आहोत याची जाणिव माणसाला विचार करायला प्रवृत करते.

मधुकर जोशी म्हणतात त्याप्रमाणे जात्यामधले दाणे रडतात आणि सुपातले हसतात ही कल्पना दाणे ह्या पदार्थाला मन, भावना, किंवा जाणिव नसते या अर्थाने समर्पक आहे. माणसाला मन, भावना आणि जाणिव असल्याने मात्र पोत्यातुन किंवा कणगीतुन सुपात म्हणजेच सुस्थितीतुन दोलायमान परिस्थीती येताच त्याची जाणिव नक्की होते.

यातही दोन प्रकार आहेत. जे आयुष्यभारासाठी दोलायमान अवस्थेत रहातात त्यांना त्याची सवय होते पण केव्हातरी अशी अवस्था झाल्यावर मात्र माणुस हवालदिल होतो.

आजच्या ललित लेखनाचा विषय काहिसा वेगळा आहे. मी आज सकाळी पहात होतो खाटकाला कोंबड्या पाठवणारी गाडी. त्यागाडीतल्या कोंबड्या ज्या पोत्यात आहेत किंवा कणगेत आहेत म्हणा सुस्तावलेल्या होत्या.

माझ्या समोरच गाडी थांबली तश्या कोंबड्या सावध झाल्या. त्यांचा कलकलाट वाढला. मग ड्रायव्हर किंवा त्याचा मदतनीस उतरला. त्याने एका पायाला धरुन काही कोंबड्या गाडीतुन खाली ओढल्या आणि त्यांच्या पायाला फास बांधला. फासाला लटकलेल्या उलट्या झालेल्या कोंबड्यांचा कलकलाट काही क्षण वाढला मग मात्र त्या असहाय दिसु लागल्या. दुसर्‍या फासाला आणखी काही कोंबड्या लटकल्या. कोंबड्यांचे एका पायाला फास लाउन उलट्या लटकलेल्या अवस्थेत वजन झाले. कोंबड्या खाटकाच्या स्वाधीन झाल्या. काही लिखापढी झाली आणि गाडी पुढे निघाली.

मांसाहार वाईट का चांगला हा विषय नाही. कधीतरी मी ही कोंबडीची तंगडी चाखतो त्यामुळे मी यावर भाष्य करण योग्य ही नाही.

एखादा कारखानदार कारखाना टाकतो. अनेक वर्ष चांगला चालल्यावर मंदीमुळे, अन्य कारणांमुळे चालु कारखाना बंद पडतो किंवा काही कर्मचार्‍यांना / कामगारांना व्ही आर एस किंवा रिट्रेंचमेट ला सामोरे जावे लागते.
यात सुपातले सुध्दा भेदरलेले असतात हे अनुभवले आहे. ही अवस्था कुणाच्या करमणुकीसाठी किंवा भोजनाची व्यवस्था म्हणुन निर्माण होत नाही. यात असते एक अपरिहार्यता.

या उलट मांस खाणे याला पर्याय असताना मात्र मानव पर्याय न निर्माण करता तो अंतीम उपाय असल्यासारखे वर्तन करत असतो. मी असे ऐकले आहे की परदेशात मांसासाठी होणारी हत्या ही दुसर्‍या प्राण्याच्या किंवा पक्षाच्या समोर होत नाही. किंबहुना हत्ये आधीची मिळणारी व्यवस्था चांगली असते.

आपण भारतात मात्र दुष्टपणाने वागुन प्राणी किंवा पक्षी यांना हत्येच्या आधी त्रास देतो. अनेकवेळा त्यांची वहातुक चुकीच्या पध्दतीने करुन, त्यांना त्रास देतो. हत्येच्या पध्दती किती चांगल्या आहेत ह्यावर माहिती काढायला हवी.

बारा किलो धान्य खायला घालुन एक किलो मास तयार होते असा प्रचार कितीही शाकाहार वाल्यांनी केला तरी मांसाहार हा कायद्याने असो किंवा संस्कृती निर्मीतीने बंद होणे अशक्य वाटते पण किमान हत्या होणार्‍या पशु किंवा पक्षांचा त्यापुर्वीचा छळ थांबवता येईल का इतका विचार आज सकाळी मनात आला.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे लेख.
परदेशात प्राण्याना हत्येच्या आधी मिळणारी व्यवस्था चांगली असते>>>> हे तितकसं खरं नाही,फक्त आता नजीकच्या काळात लोकांचा अवेअरनेस वाढला आहे. आपण फुड इन्क. ही डॉक्युमेंटरी जरूर पहा

http://en.wikipedia.org/wiki/Food,_Inc.