बा.रा. हिवाळी ए वे ए ठि २०१४

Submitted by वैद्यबुवा on 16 January, 2014 - 09:42
ठिकाण/पत्ता: 
शोनूचे घर
विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शनिवार, February 8, 2014 - 10:00 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती वाजता भेटायचं अमियाला? आमचे टायक्वांडो वीकडेला आवरलं तर वेळेत यायला जमेल नाहीतर १:३० वाजे पर्यंत येऊ शकेन.

अमियाला १२:३० वाजता भेटायचं का? की १२ ठरवू म्हणजे साडेबारा होतील? Proud

नावं कोणी नोंदवलेली नाहीत ती अजून? भाई येणार आहेत का? झक्कींना कळवलं का? बाकी चमन, माणूस-बाईमाणूस-बाळमाणूस, जीएसारती वगैरे कंपनी? फचिनमामा येणार का मामीला घेऊन? चला हला पटापट!

दाजी अमियापुरतं येण्याचा विचार करतायत. नंतर चहाला (गप्पांच्या भीतीने :P) येणार नाहीत.

ठरला का? Lol
मी चहाबरोबर शरलॉकसुद्धा ऑफर केला तरी कोणीच काहीच बोललं नाही. Proud

जोक्स अपार्ट, अगदी नक्की माझ्याकडेच जाऊ. Happy

शेरलॉक बघायला माझी अजिबातच हरकत नाही. पण (तुमच्या) भावोजींचं इतरत्र काम निघालं तर मला बाळ्याला सोबत आणावं लागेल की काय असं वाटतंय सध्या. तो आला तर रागरंग बघून मी अमियातून किंवा चा नंतर कल्टी मारेन.

बुवा काल येऊ शकेन म्हणाले त्यावरून मला वाटलं एकटे येणार की काय.

महिलामंडळाची प्ले डेट आयडिया पण चांगली आहे Happy

मेनू आणि नावं लै भारी!

पण मुर्ग जुगलबंदी! हे काय नाव? टेबलावर दोन कोंबडे आळीपाळीनं आरवून दाखवायला बसवल्यासारखं वाटतं. खजुराओ चिकनबद्दल बोलायलाच नको.

>> टेबलावर दोन कोंबडे आळीपाळीनं आरवून दाखवायला
Lol

खजुराहो चिकन म्हटल्यावर तुला जॉन स्टुअर्टने दाखवलेलं चित्र आठवलं असेल बहुधा. Lol

अरे दाजींना पळवून लावू नका कृपया! सगळे महिलामंडळ कंबरकल्टी झाल्यावर आम्हा कंबरहेटी पबलिकचं काय?
मी सध्या तरी सकुसप म्हणतोय पण ऐन वेळेस काही सांगता येत नाही. तू आणणार असशील इशानला तर मला सांग, मग बारक्याची आई नाही म्हंटली यायला तरी बारक्याला घेऊन येइन मी.

दाजी कम्बरहेटींचे मुखिया म्हणून क्वालिफाय होऊ शकतील. Proud
मी कम्बरफ्यान असल्यामुळे ते हेटी झाले की उलट हे नक्की ठरवणं अवघड आहे. Proud

मी कम्बरफ्यान असल्यामुळे ते हेटी झाले की उलट हे नक्की ठरवणं अवघड आहे. >>>> Lol
म्हणजे तुम्हाला कंबरब्याचवरुन बोअर करणे हे दांजीना मी "गॉड्स वर्क" करतोय असं वाटायला हवं.

मीही बहुतेक सानिकाला घेऊन येणार आहे. तिला बोअर होणार , पण इलाज नाहिये. बाप लेक त्या रोबोटिक्स च्या बिल्ड साइट वर असतात वीकेन्ड ला दिवसरात्र

तुम्ही तिथे चा पिता पिता शेरलॉक बघितलात तर मला फोटो पाठवा कुणीतरी.. (टी सेटचा आणि फुल्यांचा)
हॅव फन!

Pages