Submitted by नितीनचंद्र on 14 January, 2014 - 21:19
आजच्या दैनीक सकाळ ( पिंपरी चिंचवड - मावळ परिसर ) यात आलेली बातमी - सुरळीत वहातुकीसाठी मनसेचा रास्ता रोको . बातमी वाचुन आश्चर्य वाटले.
हा प्रकार म्हणजे दारु सोडण्यासाठी दारुतुनच औषध घेणे यासारखा चमत्कारीक वाटला.
लोकांच्या प्रश्नावर लोकांमध्ये जाउन जागरुकता निर्माण करणे, जनमत तयार करणे यासाठी रस्त्यावर उतरणे स्वाभाविक आहे. पण वाहतुक नियंत्रक नाहीत, सिग्नल नाहीत ते बसवुन वहातुकीचे नियंत्रण व्हावे यासाठी रास्ता रोको करणे म्हणजे काहीतरी विचार न करता केलेले आंदोलन असे जाणवले.
मानवी साखळी, धरणे, सह्यांची मोहीम इ कार्येक्रम या प्रश्नी उपयुक्त ठरु शकले असते. दुसर्या बाजुला नगरपलिका ह्या कामांसाठी खर्च करायला तयार असते. फार मोठा खर्च नसतो.
मायबोली करांना काय वाटते ?
खुप शोधुनही ईसकाळवर या बातमीची लिंक शोधुन टाकता आली नाही.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चांगला विनोद आहे. मनसे किंवा
चांगला विनोद आहे. मनसे किंवा इतर राजकीय पक्षांना मागणी करणे आणि त्यासाठी आंदोलन (म्हणजे मारामारी, तोडफोड, रास्ता रोको, वगैरे), इतकच माहीती आहे का?
सामाजिक सुधारणा, राजकीय पक्षाने करुच नये असं काही आहे का? खरं तर प्रत्येक पक्षाकडे कार्यकर्त्यांची जी फौज आहे, त्याचा योग्य वापर केला तर कित्येक गोष्टी सहज होतील.
मनसेच्या वेबसाईटवर बर्याच आधी मी लिहिले होते, की नाशिकमध्ये {सत्ता आहे म्हणुन}, अगदी मनसेच्या नावाने कचरा भरण्याच्या पिशव्या प्रत्येक घरी द्या. त्यात recyclable, non-recyclable आणि food अश्या वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी वेगळ्या पिशव्या करुन त्या एका जागी {जिथे सध्या कचरा फेकतात तिथे} बंद करुन ठेवल्या, तर कचरा उचलणे सोपे जाईल, घाण वास येणार नाही, मोकाट जनावरे तिथे घुसुन कचरा उचकणार नाही, परिणामी शहर स्वच्छ होईल.
अश्या प्रकारे बंगळुरूत आधीच एक संस्था काम करत आहे. बहुदा quick fix नावाने त्यांचा एक व्हिडीओ बघितला होता.
पण लक्षात कोण घेतय.... ते अजुनही संघटना बांधतच आहेत म्हणे.