बॉलिवुड ब्युटिज- १ ऐश्वर्या राय-बच्चन (कलर पेन्सिल स्केच)

Submitted by यशस्विनी on 14 January, 2014 - 04:51

नमस्कार मायबोलीकरांनो,

तुम्हा सर्वांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.....

आज तिळगुळ खाउन सर्वांशी गोड बोला Happy

आज मी "बॉलिवुड ब्युटिज" या सदराखाली काही बॉलिवुड सौंदर्यवतींचे कलर पेन्सिल स्केचेस सादर करणार आहे. पहिला मान मिळवलाय ऐश्वर्या राय-बच्चन हिने.... हिच पहिली का? तर असेच, काही ठराविक कारण नाही. इतर सौंदर्यवतींचे स्केचेस जसे काढुन होतील तसे अपलोड करीन.

कलर पेन्सिल पोट्रेट काढायचा हा माझा पहिलाच प्रयत्न तोही स्वअभ्यास करुन... त्या दृष्टीने बघता जे काही आउटपुट मिळाले आहे त्यात मी खुश आहे. केस आणि बुब्बुळे काढायला जमले आहे हे नक्की. मला त्वचेचा पोत, त्यावर दिसणारा प्रकाश व सावली तसेच नाक, कान यात इम्प्रुव्ह करायचे आहे.

चित्राबद्दल :-

माध्यम : कलर पेन्सिल्स
कागद : Bristol Card A3/250 gsm
रंग : Derwent Colorsoft ( 85%) ,Prisma Color Premier (15%), Prisma Colorless Blender

a1---Copy.jpg

धन्यवाद,
वर्षा

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.

वॉव.. मस्तच.. फोटो दिसेपर्यंत धाकधुक होती की ऐश्वर्याचा चेहर्‍याची वाट नसेल ना लागली.
पण तू हे शिवधनुष्य एकदम मस्त पेललंय. अतीशय छान.
डोळे तर अतीशय बोलके आलेत. हॅट्स ऑफ यशु !!!

धन्यवाद मी_चिऊ, शाम्भवी,जाई. Happy

पियू Lol धन्यवाद ग... ट्रायल, एरर चालु आहे, अगदी शिवधनुष्य पेलले असे नाही.. पण जरा चित्र जमलय इतकच Happy

यशस्विनी ऐशु तशी छान जमलीय, पण डोळे अजून टप्पोरे हवे होते. पापण्या लान्बसडक हव्या होत्या आणी स्मितहास्याच्या वेळी देखील ओठ एवढे पसरट वाटत नाहीत ग तिचे. गैरसमज नको, पण वर्षु नील शी थोडीशी सहमत आहे मी. सुधारणा सुचवल्याबद्दल सॉरी. पण तुझी चित्र कायम मनात घर करुन असतात.

आता पुढे माधुरी, रवीना येऊ देत.

यश Happy

अ‍ॅज .....अ ब्युटिफुल फेस म्हणून हे चित्र १ नंबर.
पण ऐश्वर्याची टिपिकल जिवणी नाही जमली. डोळे ़केस मस्त.

का कुणास ठाउक पण यात सोनिया गांधींचा भास होतोय.
माझी चित्रकलेच्या नावाने बोंब आहे, त्यामुळे त्यातलं काहीच कळत नाही म्हटलं तरी चालेल. Happy

केस आणि बुबुळे खुपच छान जमले आहेत, पण डोळे लहान झाले आहेत. चेहरयामधे शेड न दाखवल्याने सपाट वाटत आहे. दोन्ही डोळ्यामधे अंतर थोडे जास्त झाले आहे. गडद [डार्क] भाग दाखवण्यासाठी लाल रंगाचा छटांचा वापर करा. स्केच अधिक काळजीपुर्वक काढ्ल्यास सुंदर चित्रे येतील. पुढील चित्रासाठी शुभेच्छा !!!

धन्यवाद नताशा, स्नेहनिल, अर्जुन

कलर पेन्सिल पोट्रेट काढायचा हा माझा पहिलाच प्रयत्न तोही स्वअभ्यास करुन... त्या दृष्टीने बघता जे काही आउटपुट मिळाले आहे त्यात मी खुश आहे. केस आणि बुब्बुळे काढायला जमले आहे हे नक्की. मला त्वचेचा पोत, त्यावर दिसणारा प्रकाश व सावली तसेच नाक, कान यात इम्प्रुव्ह करायचे आहे.