हॅरी पॉटरच्या चित्रपटांमध्ये Owl Post ही भन्नाट कंसेप्ट होती...हा चित्रपट पाहिल्यापासून या रुबाबदार पक्ष्याला एकदातरी याची देही-याची डोळा बघायचं होतं.
यंदाच्या थंडीत हे देखणे पक्षी न्यू जर्सीचे पाहुणे म्हणून आलेत, तसे ते दर वर्षी येतात पण यंदा कदाचित पाहूणचार जास्त आवडला असल्याने जास्त संख्येने आलेत.
बऱ्याच दिवसांनी विंकेंडला तापमान शुन्न्याच्या थोडसं वर गेलं. ही संधी साधून थेट 'सँडी हूक' गाठलं..तिथे पोहचलो तेव्हा समुद्राच्या काही भागाचा बर्फ झाला होता...समुद्रावरुन येणारा गार वारा बोचत होता...चार-पाच तासच्या तंगडतोडी नंतर बाबाजी प्रसंन्न झाले आणि नेत्रसुखद अनुभव मिळाला.
घुबडाला फोटोग्राफी सर्कल मध्ये - बाबाजी असे म्हणतात.
प्रचि १: धृवीय घुबड (मादी) प्रचि २ : मॅनहॅटनच्या पार्श्वभूमीवर ध्यानस्त बाबाजी
काही फॅक्ट्स
- धृवीय घुबड हे पार उत्तर आर्टीक वरुन दक्षिणेला आलेत...हा प्रवास साधारण ५००० किमी इतका आहे. त्याचा मुक्काम सध्या न्यू यॉर्क, न्यू जर्सी, डीसी, पेन्हसिलव्हेन्हिया, कॅरोलीना मध्ये आहे.....मागे एकदा ते फ्लोरीडात पण आढळून आले होते....
- पूर्ण वाढ झालेले धृवीय घुबड फार स्थलांतर नाही करत, ते आर्टीक आणि जवळपासच्या भागातच रहातात.
- नवशिक्यांना मात्र आर्टीक आणि आसपासच्या भागात खायची वानवा होते कारण त्यांच भक्ष एकतर हायबरनेट झालं असत किंवा स्थलांतरीत झालं असतं आणि वडीलधाऱ्यांशी स्पर्धा नको म्हणून हे सूज्ञ नवशिके स्थलांतर करुन द़क्षिणेला येतात.
- इतर घुबडांच्या तुलनेत हे धृवीय घुबड दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेला शिकार करु शकतात. हे पक्षी सपाट भूभागावरुन शिकार करतात, त्यांची घरटीपण जमिनीवर असतात....तीक्ष्ण श्रवणशक्तीमुळे बर्फात किंवा बिळात लपलेली शिकार करण्यात प्रविण.
- उंदीर प्रजातीतले प्राणी हे त्यांच आवडतं अन्न असलं तरीही पंज्यात जे काही येइल ते खातात... मासे,इतर पक्षी साईड डिश म्हणून असतातचं.
- धृवीय घुबडाची मादी एकदा अंड्यांवर बसली की जोपर्यन्त पिल्लू बाहेर येत नाही तो पर्यन्त जागची हलत नाही. डोहाळे पुरवायची सगळी जवाबदारी जोडीदाराची.
- इतर काही पुरोगामी पक्ष्यांप्रमाणे धृवीय घुबडांनी सुद्धा एकपत्नी समाजाची स्थापना केली आहे.
तन्मया.. भारी फोटो.. फेबु वर
तन्मया.. भारी फोटो.. फेबु वर डकवलास तो आवडला.. पण इथे माहितीसकट दिलास ते बरे केलेस.. नि झूमलेन्स घे लौकर.. होउदे खर्च
जडावाच्या दागिन्याइतका देखणा
जडावाच्या दागिन्याइतका देखणा पक्षी ..
Pages