चिम्णुताई चिम्णुताई

Submitted by पुरंदरे शशांक on 12 January, 2014 - 00:46

चिम्णुताई चिम्णुताई
कुठेच कशा दिसत नाही ?
चिवचिव चिवचिव गोडशी
कानावरती येत नाही ??

या लवकर इकडे बाई
घर देईन मेणाचे
पाऊस येता जोराचा
गळ्णार नाही एवढुस्से

कंटाळलात भाताला ?
खाऊ देईन छानसा
टिपता येईल चिव्चिवताना
शेवचकली खमंगसा

ये जरा लवकर बाई
तुझ्याशिवाय करमत नाही
अंगणात जाऊन बस्लं तरी
बाळ आमचं जेवत नाही

चिवचिव चिवचिव ऐकल्यावर
बाळ धावेल अंगणभर
म्ममं म्ममं होईल मग
ही अशी भराभर .......

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शो श्वीट!!!!! ही सुद्धा!!!!!!

चिम्णुताई खरंच दिसल्या नाहीत चायनाला कित्येक वर्षांत

पण आता इथे दिस्ताहेत..खूप छान वाटतंय त्यांना पाहून Happy