विश्वरूप

Submitted by बागेश्री on 8 January, 2014 - 10:29

सांजेचं अस्ताव्यस्त रूप
पाहून चर्र झालं..

तिची ती ओढत नेलेली पाऊले
पायात ना मावळतीच्या चपला,
ना खांद्यावर मेघांचा पदर..
आकाशी भाळावरचं,
भलं मोठं बिंबही... फिकूटलेलं
झटापटीत पुसल्या गेल्यासारखं मलूल
विरत विरत चाललेलं..

काळोखाचे पडदे झरतील आता..

परतेल तीही, तिच्या घरी..
जरा अवघडली- जरा बरी

तिच्या ह्या विश्वव्यापी रुपाला
मेणबत्त्यांचा मोर्चा पुरेल?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केवळ अप्रतीम. खास बागेश्री शैली ............... !! Happy

तिची ती ओढत नेलेली पाऊले
पायात ना मावळतीच्या चपला,
ना खांद्यावर मेघांचा पदर..
आकाशी भाळावरचं,
भलं मोठं बिंबही... फिकूटलेलं
झटापटीत पुसल्या गेल्यासारखं मलूल
विरत विरत चाललेलं..

हा तर वर्णनाचा कळसच !! कुणीही प्रेमात पडाव असा !!