लोणावळा ते पुणे दरम्यान गटग ठिकाण सुचवा

Submitted by वेल on 8 January, 2014 - 06:57

२८ मार्च - ३१ मार्च दरम्यान पुण्याजवळ जवळ ३ दिवस २ रात्री असे गटग आयोजित करायचे आहे. नवर्‍याचे मित्र आणि त्यांचे कुटुंबिय असे. (लोणावळा ते पुणे ह्या टप्प्यात हायवे जवळ कुठेही चालेल.- नाशिक, कोल्हापूर, लातूर इथून लोक येणार) वॉटर रिसोर्ट नको पण खेळायला बाग, स्विमिंग पूल हवा. ड्रींक्स आणि खाण्यासाठी पंजाबी वेज आणि नॉन वेज असे तिनही ऑप्शन हवेत. पंच तारांकित - सप्ततारांकित हॉटेलं नकोत. (जाधवगड सारखे महागडे ऑप्शन बाद) मला कोणी एखादे चांगले ठिकाण सजेस्ट करू शकाल का? फक्त महाराष्ट्रीयन पद्धतीचे जेवण मिळेल असेही ठिकाण नको.जवळपास फिरण्याची ठिकाणे, एखादे साधेसे ट्रेकिंगचे ठिकाण असेल तर उत्तम. (आमच्यासाठी सिंहगड प्रतापगड पायर्‍यांनी चढणे हे पण ट्रेकिंग आहे बरं) -

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुळापूर कसे वाटते

किंवा

कोळवण, पवना डॅम व तिकोना

amaa - laatoor valyaanna laamb padel mhanoon loNaavaLyaaparyatch Thevaayachay.

कोळवण, पवना डॅम व तिकोना- hyaachyaa javaLapaas raahaayachee kaay soy aahe. Trekar type raahaaNe naahee. family type raahaaNe nivaant

कोळवण जवळ गणेशवाडी येथे अत्रे यांचे उत्तम रिसॉर्ट आहेत. ३ डॅम आहेत हाडशी, कोळवण आणि पवना [पोहता नसावे येत] एका डॅम मध्ये बोट असतात. तिकोना १०-१५ किमी वर असावे कोळवण पासून.

रहाण्यासाठी खंडाळ्यात बर्‍या पैकी हॉटेल-ऑपशन्स आहेत. पैकी काही म्हणजे Dukes Retreat, Dukes Nest, Velvet Country... खाण्या-पिण्याची उत्तम सोय होऊ शकते. जवळपास बरेच ट्रेकिंग पॉइण्ट्स आहेत. (पैकी Dukes Retreat मधे काही वर्षां पूर्वी मी स्वतः नोकरीला होतो... Happy )

.

धागा चांगला आहे.
लोकहो अंदाजे बजेटही लिहा की. की ब्वा अमुक ठिकाणी अमुक भावात खोली मिळेल, असे.

खडकवासला डॅमच्या बॅकवॉटर्सवर एक होटेल आहे.
डोणजे गावाजवळ. Aquarious Resort असे नांव आहे.
जेवण थोडे महाग साईडला वाटले, पण बार ही आहे.
रूम्स २५०० पर्यंत.
अँबियन्स चांगला आहे.

सिंहगड जवळच आहे..

Aquarious Resort >> मला खूप आवडलं कदाचित खडकवासला इथे आहे म्हणून. सिंह्गडावर घेऊन जाता येईल मुलांना, सोप पडेल. (वरपर्यंत गाडी जाते ना...)

स्वच्छंद सुद्धा वेब्साईट प्रमाणे आवडलं - फोन करून चौकशी करते. जेवायचे काय ऑप्शन्स आहेत विचारावं लागेल.मी तिकोनाला गेले आहे. आता तेवढाही स्टॅमिना आहे की नाही माहित नाही. शिवाय लहान मुले आहेत तोही विचार करावा लागेल.

खंडाळ्याच्या ड्युक्सचा विचारच नव्हता केला. ऑट ऑफ बजेट जाईल असे वाटल्याने. तरी एकदा फोन करून विचारून घेते.

रश्मी - मी फेब मध्ये जाणार आहे. तेव्हा तिथे कसे वाटेल. तिथे फिरायला असेल, काही खास बघायला असेल तर नक्की जाऊ पण मंदिरात जाण्याचे अ‍ॅट्रॅक्शन नाही म्हणून विचारले.

मामी - तिथल्या ठिकाणांची चौकशी चालू आहे. मल्हार माची आणि मावळसॄष्टी सुध्दा लिस्टवर आहेत. मला तर कोयना रिसॉर्ट जास्त आवडेल पण ह्यावेळेला सगळ्यांचा ट्रॅवलिंग कमीत कमी कसं होईल ते पाहयचय,

कार्ला रिसॉर्टचे पण फोटो पाहिले. चान वाटले. आता पाहू, ग्रूप काय सिलेक्ट करतो आहे. पण खुद्द पुण्यातले आनी पुण्याच्या अगदी जवळचे काही अजून ऑप्शन्स असतील तर सांगा.

लगूनारिसॉर्ट्ची वेबसाईट ऑफिसातून ब्लॉक्ड आहे, घरून पाहेन.

Aquarious Resort छान आहे, आम्ही गेलो होतो एकदा. राहिलो नव्हतो, पण मुलांना खुप आवडले होते.

क्लब महिंद्राचे पवना डॅम रिसॉर्ट, कार्ल्याचे MTDC,
लगूना बरे आहे पण पूर्वीची कळा राहिली नाही.
शक्यतो शनिवार-रविवार टाळा, इट्स हॉरिबल!

Aquarious Resort छान आहे. राहण्यासाठी माहित नाही पण जेवण चांगले.
मल्हार माची - बेस्ट पण बुकिंग आधी करा.
लवासा पण मस्त आहे. तिथे राहण्यासाठी व्हरायटी आहे.
ह्या सगळ्या जागा पावसाळ्यात बेस्ट पण तुम्ही उन्हाळ्यात जात असल्याने a/c आहे ना बघा. खूप गर्मी असू शकते

वेल मन्दिर खरच छान आहे. थोडे आडवाटेला आहे ( स्वतचे वाहन हवे) पण ब्येस. मोठा परीसर आहे, त्याला लागुन एक छोटे हॉटेल आहे. मात्र फक्त चहा/ कॉफी/ नाश्ताच मिळतो, जेवण नाही. पण नाश्ता चान्गला असतो. बाकी कोल्ड्रीन्क्स पण असतात. आम्ही भजी, चहा, कॉफी घेतली होती, चान्गली वाटली. मन्दिर शान्त आहे, स्वच्छ आहे. जवळच तळे पण आहे छोट्टेसे. पार्किन्गची सोय आहे. मनाला खरच शान्त वाटते.

परत तेच.
अरे लोको, पैकं लिवा की! आमा गरीबास्नी कसं सम्जावं का अमुक ठिकानी किती खिसा काप्ला जानार ते?

स्वच्छंद मध्ये फक्त दोन फॅमिली रूम्स आहेत. बाकी नॉन एसी डोर्मेटरिज.
१००० रु प्रत्येकी. जेवणासहित.

अ‍ॅक्वेरियस रिसॉर्ट कमलिनी कुटिर हे ऑप्शन आधीच बाद झाले आहेत कारण तिथे रिनोव्हेशन चालू आहे.

गिरिवन शांतिवनचा विचार करत होतो पण नॉन एसी असल्याने बाद. तसंसुद्धा गिरिवनचे लोक रिस्पॉण्ड करायला खूप वेळ लावतात.

***********

रस्टिक व्हिलेजला कोणी गेलय का? किंवा टिकवुड कॅम्पिंग किंवा नेचरनाईट्स चे तिकोना येथील कॅम्पिंग?

वेल नंतर मला जाणवले की मराठीच पदार्थ स्वच्छंद मधे मिळायचे, शिवाय तसे अडनिडे आहे. म्हणून मी पण फार रेकमेण्ड नाही केले

बरेच अवघड प्रकरण दिसतंय .या रिजॉटवाल्यांना लायसन्सेस (एकूण ५८) आणि "वरकड" गोष्टींसाठी त्रास होतो त्यामुळे महाग होतात .

बराच काथ्याकूट केल्यानंतर राहायचे ठिकाण ठरले - कृष्णाई वॉटर रिसॉर्ट. १२५० रु प्रत्येक दिवस एका कुटुंबासाठी (२मोठे २ लहान) फक्त राहाणे. वॉटर रिसॉर्ट एन्ट्री फी वेगळी, खाण्याचा खर्च वेगळा आणि रिसॉर्टमध्येच डांबून राहायची गरज नाही. एक दिवस वॉटर पार्क एक दिवस सिंहगड आणि त्या संध्याकाळी३ चोखीदानी किंवा संस्कृती किंवा मराठी तडका आणि तिसर्‍या दिवशी पानशेत वॉटर स्पोर्टस असा भरगच्च प्रोग्राम आहे.

२८ रात्री कॅम्पिंगचा बेत आहे. तिकोना जवळचे एक ठिकाण सापडले आहे. सिंहगडाजवळ काही मिळते का ते शोधत आहे.