'कृतज्ञता' यादी आणि 'आग लागो' यादी

Submitted by हर्पेन on 31 December, 2013 - 04:59

मंडळी नवीन वर्षाच्या सुरुवातीला संकल्प-यादी करण्याचे काम आपण बरेच जण करतोच पण मी गेले दोन वर्षे करत असलेल्या कृतज्ञता यादी (Gratitude List) आणि आग लागो यादी (Burnout List) ह्याबाबत माहिती देण्यासाठी हा प्रपंच. आपल्यापैकी काही मायबोलीकर ऑलरेडी अशा याद्या बनवतही असतील कोण जाणे!

ह्या याद्या होता होईल तो जानेवारीच्या पहिल्या आठवड्याच्या आत कराव्या.

मला ह्या दोन याद्या करण्यामुळे चांगला अनुभव आलेला आहे. विशेषतः कृतज्ञता यादीचा.

कृतज्ञता यादी म्हणजे नावाप्रमाणे मागील वर्षातील संकल्पसिध्दींसंदर्भात अथवा त्या वर्षात आपणा सोबत किंवा आपल्या हातून जे काही चांगले घडले त्यासंदर्भात आपल्याला ज्या कोणा व्यक्ती, घटना, संस्था यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची असेल किंवा जे घडले त्याबद्दल देवाचे किंवा आपण ज्या कोणत्या शक्तीचे आभार मानायचे असतील तर त्याची यादी.

सरत्या वर्षातील चांगल्या घटनांचा आढावा ह्या निमित्ताने घेतला जातो तो मन-प्रवास खूप छान असतो. ही एक सुंदर संधी असते चांगल्या आठवणीत रमण्याची. ही यादी जितकी मोठी करता येईल तितके चांगले.

उदा. नवीन घर, गाडी, नोकरी, पगारवाढ, मॅरॅथॉन पुर्ण करणे अशा मोठ्या घटनांबरोबरच आपण ज्या गृहित धरतो अशा स्वच्छ पिण्यायोग्य पाणी, आरोग्य, गृहसौख्य, कुटुंब, मित्र-मंडळ, मायबोली अशा गोष्टींचाही आवर्जून समावेश करावा. (मी हे पहिल्यांदा वाचले तेव्हा 'पिण्यायोग्य पाणी' या बद्दल काय कृतज्ञता व्यक्त करायची असे वाटले पण ट्रेकिंगला जाऊन आल्यावर, मेळघाटात जाऊन आल्यावर 'स्वच्छ पिण्यायोग्य पाण्यासाठी किती त्रास कष्ट आणि वणवण करावे लागते हे पाहिल्यावर आपण शहरात राहणारी माणसे किती भाग्यवान आहोत हे जाणवते.

माझी या वर्षाच्या शेवटीस केलेली (उदाहरणादाखल), (अपुर्ण) यादी

मी कृतज्ञ आहे खालील कारणांसाठी
मेळघाट 'मैत्री'
मैत्री मुळे मेळघाटात करता आलेली स्वयंसेवकगिरी
मैत्री संदर्भात मायबोलीकरांकडून प्रत्यक्ष ओळख देख नसताना विश्वासाने दिलेली वस्तूरूप मदत
आयुष्यात पहिल्यांदाच धावलेले दोन आ़कडी अंतर
अर्ध-मॅरॅथॉन पुर्ण केली (२१ किमी धावणे)
नवीन गियरवाली सायकल घेतली,
अर्ध-ट्रायथलॉन पुर्ण केली (७५०मी. पोहोणे, २० किमी सायकलींग, ५ किमी धावणे),
आम्ही संयोजन करत असलेल्या रक्तदान शिबीरात यावर्षी आम्ही रक्तदात्यांचा ५० हा आकडा गाठला,
मायबोली,
मायबोलीवरच्या निबंध स्पर्धेत मिळालेला दुसरा क्रमांक,
'मायबोली'मुळे पहावयास मिळालेले दोन मराठी चित्रपटांचे पुण्यातील प्रथम-खेळ आणि त्या निमित्ताने दिसलेली / भेटलेली / फोटो काढायला मिळालेली कलाकार मंडळी आणि इतरही दिग्गज माणसे उदा. भावे-सुखथनकर, मोहन आगाशे, मिलींद सोमण, नितीश भारद्वाज, सुधा मुर्ती, अनिल अवचट, मंगेश तेंडुलकर, कविता गाडगीळ ई.,
पुण्यातल्या टेकड्या,
स्वच्छ पिण्यायोग्य मुबलक पाणी,
(सकाळी लवकर उठल्यास जाणवणारी) अजूनही मस्त असलेली पुण्याची हवा,
व्यक्तीगत आरोग्य,
कुटुंब आणि गृहसौख्य,
विस्तारते मित्र-मंडळ,
सोशल नेटवर्कींग,
फेसबूक,
व्हॉट्सअ‍ॅप,
वाचनात आलेली अनेक उत्तम पुस्तके,(यांची वेगळी यादी देखिल करू शकता)

..............यादी अपूर्ण

'आग लागो' यादी

'आग लागो' यादी ही संकल्पना ज्यांनी कोणी 'जब वी मेट' नावाचा चित्रपट पाहिला असेल त्यांना नक्कीच माहित असेल. (करीना शाहिदला आपल्या दगाबाज प्रेयसीचे नाव लिहिलेला कागद जाळून फ्लश करायला सांगते तो सीन)

मी करतो ती यादी, सरत्या वर्षात आपल्या सोबत झालेल्या वाईट गोष्टी आणि त्याचबरोबर पुढील काळातदेखिल ज्या आपल्यासोबत होऊ नये अशा वाटणार्‍या गोष्टी यांची एकत्रित यादी. ही अक्षरशः जाळायची. मी फ्लश करत नाही पण कोणाला करायची असल्यास करू शकता.

ह्या 'आग लागो' यादीमधे अगदी वैयक्तीक स्वरूपाचे मुद्दे असल्यास गुपचूप कोणास न दाखवता जाळावी. तसेच ह्या यादीचा फायदा देवासारखा आहे, मानला तरच...;)

आपण या यादीमधे दहशतवाद, प्रदूषण, भ्रष्टाचार इथपासून ते सर्दी, पडसे, दाढदुखी, जोडीदाराबरोबर भांडण यासारखे अगदी वैयक्तिक मुद्दे देखिल घेऊ शकतो.

माझ्या 'आग लागो' यादीतले मुद्दे
कर्ज
गुढगेदुखी
कॅश-फ्लो क्रंच
सुट्ट्या न मिळणे
शनिवार कामाचा वार असणे
जॉब सॅटीस्फॅक्शनचा अभाव
नोकरीतली अस्थिरता
कुठल्याही तर्‍हेची अभावग्रस्तता
वैयक्तिक पातळीवर करावा लागणारा भ्रष्टाचार

तर मग मंडळी लगोलग लिहा बरे, आपापली यादी इथे टाका....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्रे वा सहेली!

तर मग सहेली आणि इतरही मंडळी आपापल्या कृतज्ञता याद्या टाका की इथे...

मुंबईत कसे गाडीनी (लोकल ट्रेन) जात असताना पहिल्यांदा आपणच किती त्रास सहन करतो आहे, आपल्यालाच किती लांब जावे लागते आहे असे वाटत असते आणि नंतर सहप्रवासी कुठून येतो हे ऐकले की आपण खरेतर सुखीच आहोत अशी भावना जागृत होते, तसे इतरांच्या कृतज्ञता याद्या वाचल्यानंतर होण्याची शक्यता असते तसेच आपल्या संकल्प याद्यांना नवीन मुद्दे मिळू शकतात त्यामुळे कृपा करून, जमले तर नव्हे Wink शक्यतो नक्कीच आपापल्या याद्या इथे लिहा Happy

<<<<<मी 'मॅजिक' हे पुस्तक सध्या फॉलो करतो आहे.
त्यामुळे ग्रॅटिट्यूड लिस्ट मी दररोज १०गोष्टी ह्याप्रमाणे तयार करतोय.
आग लागो यादीची आयडिया मात्र छान आहे.
'लुई हे' या लेखिकेचे 'यू कॅन हील युअर लाइफ' हेही पुस्तक वाचनीय आहे.
त्यात 'आग लागो' यादीच्या जवळपास जाणारा फंडा आहे.
आपल्याला अनावश्यक गोष्टी (बहुतांशी इमोशनल लेव्हलवर) आपण उगाच साठवून ठेवत असतो.
तर अशा गोष्टी मानसिक पातळीवर "सोडून द्यायच्या".
उदा. एखाद्या व्यक्तीबद्दलचा आकस, एखाद्या भूतकाळातल्या घटनेबद्दलचा राग्/पश्चात्ताप/ अपराधीपणाची भावना इ.
काही गोष्टी (व्यक्तिगत आयुष्यातल्या) सहज सोडता येत नाहीत. अशा वेळी फक्त स्वतःच स्वतःला
"I am willing to change" असे सांगत रहायचे. काही दिवसांनी याचा नक्कीच फायदा जाणवतो.>>>>>>>>>+ १००
मी पण हे पुस्तक फॉलो करत आहे...त्याचा सकारात्मक परिणाम जाणवतो हे नक्कीच...
'आग लागो' यादी - करुन पाहणार....

इंग्रजी नवीन वर्ष जवळ येत आहे त्यामुळे आपापल्या ह्या वर्षीच्या याद्या बनवण्याची आठवण करण्यासाठी,

धागा वर काढण्यासाठी Happy

मस्त कल्पना आहे यादी करण्याची , आगलागो ची कल्पना 'जब वी मेट' पाहिलेला तेव्हाच जाम आवडली होती. यादी करेन पण इथे लिहेन की नाही हे माहीत नाही .एक लिहु शकते मायबोली सदस्य झाले (हे कृतज्ञ मधे) Happy

कल्पना चांगली आहे. आग लागो पेक्षा मी माझ्यात काय सुधारीन याची यादी मी करत असतो (फार मोठी यादी आहे ती)
उदा. राग कमी करायचा, अहंकार कमी करायचा. व्यवस्थितपणा, इ.
(मायबोली जरा कमी करणे हेहि त्यातच येते)
मनःशांती सुधारते. मग आग लावण्याची इच्छा होत नाही, मी सुधारेन नि जमल्यास इतर गोष्टीहि सुधारण्यास मदत करीन. मी रस्त्यावर कचरा टाकणार नाही इ.

आपल्या लाईफमध्ये `आग लागो' काहीच नसते, कारण ते आग लागो हे देखील चिडचिडीतून आलेले असते, त्यामुळे सारेच एंजॉय करतो.

पण काही चांगल्या घटना गोष्टी या वर्षातील.

१) मिड टर्म प्रमोशन, हुद्दा आणि पगार वाढले. कल्पना नसल्याने आनंद जास्त.

२) कायमस्वरूपी ग'फ्रेंड

३) प्रॉपर्टीची मॅटर फेवर मध्ये.. आयुष्यभर बसून खायची सोय झाली. (खरे तर हे गेल्या आणि या वर्षात मिळून टप्प्याटप्याने झालेय)

४) घराचे ईंटिरीयर बदलत नवीनच लूक दिला, त्यामुळे नवीन घरात राहायचा फील येतोय.

५) मायबोली सभासदत्व. (हे आपले उगाचच सेंटी मारायला नाही, तर मजा येतेय तुमच्यात)

६) एका त्रास देणार्‍या आजारावर तोडगा सापडला, त्यानंतर प्रकृतीस्वास्थ उत्तम. (हे लिहिताना अगदी आजोबा टाईल फील येतोय पण इटस ओके, येणारी वर्षेही यामुळे तंदुरुस्त जातील हे नक्की)

७) इन्शाल्लाह आजची पार्टी पण धमाल होईल, आणि हे वर्ष शेवटच्या क्षणापर्यंत मनोरंजक होईल!

आता पुढच्या वर्षीच भेटूया, सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा Happy

२) कायमस्वरूपी ग'फ्रेंड >> हे तिला सांगितल का? बहुतेक मुलीना पुढे बॉयफ्रेंडशीच लग्न करायची इच्छा असते. तस झाल तर कायमस्वरूपीला काय अर्थ? बिचारीला निराश नको करूस Happy
तुला एक्सक्लुजीव्ह म्हणायचे आहे का? म्हणजे (जोवर ही रिलेशनशिप आहे तोवर) यापुढे ती दुसर्या मुलांबरोबर आणि तू दुसर्या मुलींबरोबर डेटिंग करणार नाही?

५) मायबोली सभासदत्व. (हे आपले उगाचच सेंटी मारायला नाही, तर मजा येतेय तुमच्यात) >> +१ तुझे धागे कधी कधी पकाऊ वाटतात पण एकुणात मजेदार असतात.

आपल्या लाईफमध्ये `आग लागो' काहीच नसते >> ऋनम्या हे असे असेल तर लयच भारी बुवा तू Happy

कृतज्ञता यादी मात्र जितकी मोठी करशील तितके चांगले.

माझी यादी पण तयार होत्ये. झाली की टाकेनच इकडे

सीमंतिनी, कायमस्वरूपी ग'फ्रेंडचा अर्थ आयुष्यभराचा जोडीदार या अर्थानेच. Happy

तसेही मुलगी पटवणे, फिरवणे आणि तिच्या "इच्छेविरुद्ध" तिला सोडून देणे हे माझ्या ना स्वभावात आहे ना कॅरेक्टरमध्ये. त्याहूनही मला जी आयुष्यभर झेलू शकते अश्या मुली सोडणे हा मुर्खपणाच Happy

हर्पेन,
यादी मोठी करायची म्हटली तर हनुमानाची शेपटीसारखी जाईल, रोजचे रोज डायरीसारखे लिहिता येईल. म्हणून मोठाल्या घटना इथे मांडल्या ईतकेच. बाकी मला प्रत्येक दिवशी झोपताना आज काय घडले याचा हिशोब मांडण्यापेक्षा आता उद्या काय धमाल आहे याचा विचार करून झोपायची सवय आहे. मग ते उद्या डब्यात चिकन आहे किंवा ईंडिया-ऑस्ट्रेलिया मॅच आहे एवढेही पुरेसे असते. याच विचारांत शांत समाधानाने झोप येणे यापेक्षा चांगले पॅरामीटर नाही सुख-समाधान मोजायचे. गत वर्षाचे ३६५ दिवस ती मला आली हाच त्या भल्या मोठ्या कृतज्ञता यादीचा सारांश ठरेल.

धन्यवाद हर्पेन दादा.... बरी आठवण करून दिल्याबद्दल....मी गेल्या वर्षी पण तुमचे वाचूनच केली होती.... आता पण करणार....

चैतन्य दीक्षित खरोखच दोन्हीही पुस्तके अप्रतिम आहेत...मी पण वाचत असते... सकारत्मकता वाढवायला नक्कीच उपयोग होतो....

आपल्या लाईफमध्ये `आग लागो' काहीच नसते...>> म्हणजे जगातील सर्वांत हॅपी गो लकी इंन्सान आहात तुम्ही .... आमची आग लागो लिस्ट इतकी आहे की जाळायची ठरवली तर मोठ्ठी शेकोटी होईल. Proud

एक चांगली गोष्ट यादीत लिहायची राहिली आहे ऋन्मेऽऽष यांची. ती मी लिहिते .
८) कॉपीराईट कायदा आणि नियम यांची जाणीव झाली आणि ब्लॉग काढला. (या वर्षी) Happy

हर्पेनजी, खात्री बाळगा ते प्रामाणिक पणे आपल्या कायमस्वरुपी ग'फ्रेन्ड बरोबरच लग्न करणार आहेत. Proud Happy

लग्नाला बोलवा + १ मलापण Happy आणि पत्रिका जरा कलात्मक आणि सुंदर छापा ,ब्लॉग सारख्या अगदि साध्या नको.

शाखा चं नाव बदनाम करायचं नाही .असा दमच मी दिलाय विपुतुन सगळ्यांना, तुम्ही आदरणीय आहात त्यामुळे देउ शकत नाही , मला वाट्लं तुम्ही माझ्या सारखे विचारी असाल ..तर तुम्हीच शाखा ची काडी टाकताय ..:फिदी: Happy

शाखा दिदेनी लिहिलेले बघितल्ल्यावर मला संघाची शाखा आठवली Wink

पण नको रे बाबा नको, दोन्ही शाखा नको Happy

माझी कृतज्ञता यादी -

माझे कुटुंब, संपुर्ण कुटुंबासोबत गावाकडच्या घरात घालवलेली सुट्टी,
माझे मित्र आणि मित्रांसोबत घालवलेला प्रत्येक क्षण
सलग चौथ्या वर्षी भाग घेताना, मुंबई मॅरॅथॉन पुर्ण मॅरॅथॉनमधे गाठलेली ४ तास १२ मिनीटाची सर्वोत्तम वेळ.
फेसबुक आणि मायबोलीवर मैत्री संस्थेकरता केलेल्या आवाहनास मिळालेला भरघोस प्रतिसाद
'खार्दुंग ला' चॅलेंज करता मिळालेल्या सदिच्छा
'खार्दुंग ला' चॅलेंज करता केलेल्या सरावधावांच्या वेळी मिळालेला पाठिंबा आणि प्रत्यक्ष मदत
हिमालयातल्या स्टोक कांगरी बेस कँप पर्यंत केलेला ट्रेक आणि तो करताना मिळालेले मैत्र
'खारदुंग ला' चे ७२ किमी चे चॅलेंज सुखरूप रित्या पार पडणे
त्या दरम्यान / संपल्यानंतर मिळालेली मदत
ऑफिस मधून त्या करता मिळालेली रजा
हिमालयात ट्रेक आणि 'खारदुंग ला' चॅलेंज दरम्यान भेटलेली उत्तुंग माणसे आणि अनेक सुंदर अनुभव

Pages