अध्यात्म म्हणजे नेमके काय

Submitted by विनायक. दि.पत्की. on 31 December, 2013 - 01:58

.........प.पु. गुरुमाउली सद्गुरू श्री ब्रम्हचैतन्य महाराजांच्या उपदेशा नुसार मला समजलेले अध्यात्म ........
(१) सर्वसाधारण पणे हा देह मन चालवत असतो त्यामुळे त्या मनात येईल ते आपण करत असतो ते बरोबर कि चूक हे त्याचा परिणाम ठरवत असते तेव्हा प्रत्येक गोष्टीचा परिणाम चांगलाच येण्यासाठी त्या मनालाच चालवायला आपण शिकले पाहिजे ते शिकवणारे शास्त्र म्हणजेच अध्यात्म......१
(२) परमेश्वराने निर्मिलेल्या सर्वच गोष्टी सकारात्मक.त्या गोष्टीस जे आपले मन नकारात्मक विचाराने किंवा गोष्टीने झाकू पाहते तेंव्हा त्या नकारात्मक गोष्टी किंवा विचार नष्ट करण्यास लागणारे सत्य व कृती म्हणजेच आध्याम होय. -2
(३) परमेश्वर निर्मित सृष्टीच्या रचनेस व नियमावलीस समजू घेणे व त्यावर (जन्म,मृत्यू,संकटे,आनंद,दु:ख इ)पूर्ण विश्वास ठेवणे,त्याने डोके रिकामे ठेवण्याची म्हणजे अनावश्यक गोष्टींवर वर अजिबात लक्ष न देण्याची आठवण होऊन पूर्णतः दुर्लक्ष करण्याची सवय लावून घेण्याचे शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म. अध्यात्म म्हणजे श्रध्दा जाग्रुत करणे.-3
(४) मनासारखे कोणालाच जगता येत नसते,परस्थिती नुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म.-4
(५) मनात चांगल्या विचारामुळे चांगल्या इच्छा निर्णाण होतात .चांगल्या इच्छा म्हणजे ज्या मनाला फक्त समाधानच देतात त्यांचा दुष्परिणाम नसतोच अशा सर्व इच्छा पुरतीचा मार्ग म्हणजे अध्यात्म....५

(६) मन शांत व स्वतःला स्थिर करण्याची व एकाच परमानंद भावनेत राहण्याची कला म्हणजे अध्यात्म.-६
(७) समस्या नष्ट करणारे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान .तेव्हा कुठल्याही परिस्थितीला सक्षम पाने तोंड देण्यास ह्या देहाला तयार करते ते आत्मज्ञान आणी ते शिकवणारे शास्त्र म्हणजेच आध्यात्म-७ .
(८) मनुष्य चुकीचा विचार करून चुकीच्या मार्गाने जाऊन अनावश्यक परिस्थिती ओढावून घेत असतो कारण मनुष्य भावनेत जगत असतो .भावनेमुळेच तो सुखी अथवा दुखी होतो .सुखी भावना जर सुखी करते तर सर्व च भावना सुखकारक करण्या साठी काम करणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म.-८
(९) सत्य जाणून घेणे. वस्तू स्थिती हि सत्य व माया हि असत्य तेव्हा मायेच्या मोहातून बाहेर पडण्याचा अभ्यास करणे आवशक असतेच म्हणून खरे सुख काय व कशात आहे हे जाणण्याचा सराव म्हणजे अध्यात्म.-९
(१०) नि:शंक व निर्भय मन शरीराला पुरेशी झोप/ताकद/आरोग्य देते. भीती फक्त मनात असते , अन्य कोठे हि नसते .नको ते विचारच पराभवाला कारण असतात. ते काढुन टाकायला शिकवणारे शास्त्र आणी मग हे नि:शंक मन सतत परमेश्वराची आठवण ठेवते मग त्या आनुशंघाने परमेश्वराच्या सानिध्यात राहणे व याच रीतीने नि:शंक होऊन निर्भय होण्याचा मार्ग म्हणजे अध्यात्म -१०
(११ ) द्विधा मनस्थितीत माणूस बेचैन राहतो तर एकच मनोमन पटलेली गोष्ट करण्यास तो केव्हाही तयार असतो अशा द्वैता कडून अद्वैताकडे म्हणजे मी श्रद्धा युक्त अंत:करणाने कोणत्या ही देवाला कोठेही,केव्हाही नमस्कार केला तर तो माझ्या मनोदेवतेला च असतो हा विश्वास शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म
(१२ ) समोर सर्वच जण सर्वांनाच चांगले म्हणत असतात पण माघारी चांगले म्हणवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म.

(१३) देह बुद्धीच्या पलीकडे जाणे/ स्वानंद, म्हणजे मनाला ज्या गोष्टीत आनंद वाटतो त्यात सतत रणमान असणे अशी एकाच गोष्ट म्हणजे आध्यात्म.देह बुद्धी विसरणे म्हणजे देह विसरणे नव्हे तर एक प्रकारे देहाच्या अनावशक क्रिया विसरणे याने काही नुकसान न होता अध्यात्मा त प्रगतीचे असणारे पहिले महत्वाचे पाउल आहे..
(१४) मनाची तगमग थांबवण्याचे शिकण्यासाठी अध्यात्म. अध्यात्म हे मनाला बंधन नसून चुकीच्या मार्गापासून वाचून जीवनाचा खरा आनंद घेण्याचे प्रभावी साधन आहे.प्रत्येक माणसाला कसली तरी चिंता, काळजी आहेच. ती दूर करण्याचे शास्त्र अध्यात्मात आहे. आणि संपूर्ण अध्यात्म हे नामात आहे!

(१५) अध्यात्मातील व्यक्ती वरकरणी जरी वेडगळ वाटत असली तरी आतुन ती अत्यंत ज्ञानी असते व इतरांचे अज्ञान न्याहाळत असते व ते दुर करण्याच्या प्रयत्नात असते आपण आपली पात्रता वाढवण्यास शिकावे.पात्रता वाढवण्यासाठीच आध्यात्मात हि प्रतिस्पर्धी हवा.
(१६) थोडक्यात सकारात्मक जगायला शिकवते ते अध्यात्म.अध्यात्म या शब्दाची फोड अधि म्हणजे शरीर व त्यात वास असणाऱ्या चे अयन करणे म्हणजे शिकणे ते अध्यात्म.
(१७) वरील १६ व्याख्यांपैकी ................. काहीच न समजले पण हवा तसा परिणाम येण्यासाठी फक्त लक्षात ठेवावे कि- ज्याला पैसा लागत नाही ते म्हणजे आध्यात्म..प.पु. ब्रम्ह चैतन्य.महाराज म्हणतात परमेश्वरावर विनाकारण प्रेम करायला पैसा लागतो का?..म्हणजे परमेश्वरावर अकारण प्रेम करणे म्हणजे अध्यात्म.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थोडक्यात सकारात्मक जगायला शिकवते ते अध्यात्म. बाकी अध्यात्म म्हणजे काय? यावर शतकानुशतके गुर्‍हाळ चालूच आहे. असो आपले मुक्त चिंतन आवडले.

मला पटले.
पण इतरांचे अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न कसा करणार? त्यांच्या अज्ञानाबद्दल आपण का काळजी करा? होईलच ते आपोआप दूर असे समजावे. उगाच त्यांना काही सांगायला जावे तर ते न समजल्याने त्यांचे अज्ञान अधिकच वाढायचे,

प्रतिस्पर्धी कोण?
खरे तर आपले आपणच विचार करून समजावे की आपल्यात काय कमी आहे, व ती दूर करण्याचा प्रयत्न करावा.

>> म्हणजे मनाला ज्या गोष्टीत आनंद वाटतो त्यात सतत रणमान असणे अशी एकाच गोष्ट म्हणजे आध्यात्म>>
मला प्रवास करायला नेहेमीच आनंद होतो.
हे आध्यात्म ( मला वाटते- अध्यात्म ???) आ हे का?

विनायक. दि.पत्की.,

अध्यात्म या शब्दाची फोड अधि + आत्म अशी होते. आत्मतत्त्व कसे कार्य करते याचे अध्ययन (अधि + अयन) करणे म्हणजे शिकणे ते अध्यात्म.

आपण स्पष्ट केलेल्या अर्थछटा आवडल्या! Happy

आ.न.,
-गा.पै.

स.न.
सर्वांना धन्यवाद .गोंदवल्यात सर्व पहिल्यापासूनच आहे फक्त ते पहाणाऱ्याच्या दृष्टीकोनावर अवलंबून असते इतकेच .त्याला मी पामर काय करणार सर्व त्यांचेच त्यांना ते अर्पण करून घेत आहेत.

>>पण इतरांचे अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न कसा करणार? त्यांच्या अज्ञानाबद्दल आपण का काळजी करा? होईलच ते आपोआप दूर असे समजावे. उगाच त्यांना काही सांगायला जावे तर ते न समजल्याने त्यांचे अज्ञान अधिकच वाढायचे,

ज्ञानेश्वरांनी एक सुंदर उपमा दिलेली आहे अज्ञानाला.
अज्ञान म्हणजे "लवणाची मासोळी" = मिठाचा मासा
तो जर पाण्यात असेल तर विरघळून नष्ट होईल
आणि पाण्याबाहेर राहिला तर तडफडून नष्ट होईल

आत्मतत्त्व कसे कार्य करते याचे अध्ययन (अधि + अयन) करणे म्हणजे शिकणे ते अध्यात्म.
एकदम correct . त्या परमतत्वाचा शोध घेणं, त्याला जाणून घेणं म्हणजे अध्यात्म

काही गोष्टी नाही पटत........................

माझ्या मते अध्यात्म म्हणजे तुमच्या मनाला जे आवडते ते करा,
तेच करा मग माझ्या मनाने काय करावे किंवा कएरु नये हे सांगायला कोण्या गुरु ची गरज आहे का ?

उदा.
मला निसर्ग आवडतो आणि तो जवळून पाहण्यासाठी मी रानोमाळ भटकलो तर ते अध्यात्मच आहे कारण त्यातून मिळणारं मनाचे समाधान आणि आनंद हा कुठे आश्रमात किंवा देवळात बसून मिळणारच नाही.

(४) मनासारखे कोणालाच जगता येत नसते,परस्थिती नुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म.-4...
इथे परिस्थितीनुसार एखाद्या ठिकाणी मला खोटे बोलावे लागले किंवा चक्क चोरी करावी लागली तर ते परंपरागत रुढीनुसार पाप ठरवले जाईल. पण मग इथे अध्यात्माचा काय संबंध.

काही बाबीत अध्यात्मामुळे कमकुवत बनण्याची शक्यता असते . म्हणजे तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण मिळविले आणि एखाद्याने येवून तुमच्या मुस्काटात मारली तर तुम्ही त्याला अध्यात्माच्या गोष्टी सांगणार कि त्याला तसेच उत्तर देणार ??

क्र.१४ मधे लिहलेच आहे कि,अध्यात्म हे मनाला बंधन नसून चुकीच्या मार्गापासून वाचून जीवनाचा खरा आनंद घेण्याचे प्रभावी साधन आहे .

आणी जिवनात आनंद नको असे म्हणणारा शोधुन सापडणे कठीण आहे

सामान्य माणसात कोणी हि परीपुर्ण नसल्यामुळेच प्रत्येकाला गुरुंची आवशकता आहेच.

अध्यात्म हे आश्रमात अथवा देवळात बसुनच साधते असे कोणी ही म्हणणार नाही तर तुम्हाला जे केल्याने समाधान मिळत असेल व त्याने कोणी समाधानी जरी नाही झाला पण कोणाचे मन दुखावले जात नसेल तर ते अध्यात्मच आहे.

अध्यात्मी व्यक्ती स्वतःच्या समाधानापेक्षा दुसर्याचे मन दुखावणार नाही याची दक्षता घेण्यात धन्यता मानत असते. कारण त्याला स्वतच्या मनाला सुधारावयाचे असते .महत्वाचे म्हणजे अध्यात्म हे दुसर्याला सांगण्यासाठी नसुन स्वत साठीच असते. अध्यात्माचा मुळ उद्देशच मनावर ताबा मिळवणे हा आहे

अध्यात्म हा वाद विवादा चा मुद्दा नसुन तो अनुभव घेउन पहण्याचा विषय आहे. ज्याला हवा त्यानेच तो समजाउन घेउन आचरणात आणण्याचा विषय आहे.येथे बळजबरी नसते .अध्यात्माची परिपुर्णता जस जसे आपण त्याच्याशी जस्तीत जास्त समरस होउ तस तशी अनुभवास येते. जेथे परिपुर्णता असते तेथे कमकुवतता नसते.येथे अंध श्रद्धेला मुळीच वाव नाही मात्र श्रद्धा असल्या शिवाय त्याची गोडी कळणार नाही हे ही तितकेच खरे आहे. हा विषय अमर्याद आहे . त्याची गोडी अवीट आहे .प्रत्येकाचा अनुभव सुद्धा वेगवेगळा असु शकतो

विनायक नमस्कार,

आपल्या वरिल लेखातला ९ व्या क्रमांकाचा जो भाग आहे आणि त्यात " वास्तुस्थिती ही सत्य ", हे वाक्य सोडून आणी
गामा ह्यांनी दिलेली अर्थ फोड ह्यांचे मतितार्थ अध्यात्म म्हणजे काय ह्याचा अर्थ सांगण्यास अति उपयुक्त आहे.

ईथुनच सुरुवात होते हे १००% निश्चित आहे.

आधी ही एक उपाधी, स्थिती, जाणीव / अनुभव आहे आणि ह्याचेच अध्ययन करतांना
आत्मा ~ परमआत्मा म्हणजेच परमात्मा हे दोन नसुन एकच कसे आहे, आणि सर्वत्र कसे व्यापुन आहे म्हणजेच त्याला ओळखण्यास मी म्हणजे तोच हे कळते ( जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे ) तेच आहे अध्यात्म.

खरी तळमळ असेल तरच पुढे बोलुया ............डोकावुन पाहुन परत यायचे मन असेल तर काहि उपयोग नाही.

आपल्या शुभ मनोकामना पूर्ण होवोत........ Happy

मी दीलेली लिन्क केवळ तुम्च्या वाचना करता आहे!
पण सद्बुगुरू शिवाय काहिच उपयोग नाहि.
"पोथि पढि पुरान पढि पंडित भये न कोय "