मना, कर सुटका जाता जाता

Submitted by बागेश्री on 30 December, 2013 - 09:30

चैतन्य सोबतीला घे,
अन् श्वासोच्छवास माझे,
श्वासाच्या गाजेने, नुसता
वाजतो देहाचा भाता..
मना, जा दूर जा तू आता

हा पडो सुनासा देह
अवसान नको कशाचे,
मातीशी राखले, जुने
चाखेन नाते आता..
मना, ने भान जाता जाता

किट्ट भावना, प्रश्नही क्लिष्ट
सुरूवात जेथे तेथेच अंत
छेदून वर्तुळाला, फुटावे
फसवे परिघ आता.
मना, कर सुटका जाता जाता

आयुष्याचे जुने बहाणे
जीर्ण गाणे, मिटते तराणे
सळसळून नवचैतन्याचे,
दे सूर नवेसे आता..
मना, हो गीत जाता जाता

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा ! मनाला छान आवाहन केलंय.
शेवटचं कडवं सर्वात छान.

वृत्तबद्ध कविता हळूहळू चांगल्या हाताळायला लागली आहेस, हे पाहून बरं वाटलं.
या कवितेची लय नीटशी समजली नाही. बहुतेक कुठल्यातरी गाण्यासारखी चाल असावी असे वाटले.

किट्ट भावना, प्रश्नही क्लिष्ट
सुरूवात जेथे तेथेच अंत
छेदून वर्तुळाला, फुटावे
फसवे परिघ आता.
मना, कर सुटका जाता जाता
Happy

स्ट्रक्चर आणि कथन ह्यात कशाला प्राधान्य द्यायचे ह्या गोंधळात असल्याप्रमाणे कविता उतरली आहे.

चूभूद्याघ्या.