अपूर्ण कविता...

Submitted by हर्षल_चव्हाण on 29 December, 2013 - 12:42

काल आणि परवा, दोन जुन्या मैत्रिणी भेटल्या,
एकीने हळवं होत, डोळ्यांत पाहत विचारलं, "अजुनही कविता करतोस का रे?"
दुसरीने शुन्यात पाहत, कोरडेपणानं विचारलं, "अजुनही कविताच करतोस का रे?"
आणि मी स्वतःत डोकावून पाहिलं,
आठवणींच्या खोल तळाशी जाऊन, अपूर्ण राहिलेल्या दोन्ही कवितांना कवटाळलं...

एक लिहून खोडलेली,
दुसरी चिडून फाडलेली...
त्यानंतर मला आठवत नाही; एकही कविता सुचलेली,
कुणासाठी लिहिलेली, कुणापर्यंत पोचलेली...
-हर्षल (२३/१२/१३ - रा. १०.४०)
ब्लॉग लिंक

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल आणि परवा, दोन जुन्या बाटल्या दिसल्या,
एकीने हळवं होत, डोळ्यांत पाहत विचारलं, "अजुनही पितोस का रे?"
दुसरीने शुन्यात पाहत, कोरडेपणानं विचारलं, "अजुनही डोसतोस का रे?"
आणि मी स्वतःत डोकावून पाहिलं,
आठवणींच्या खोल तळाशी जाऊन, अपूर्ण राहिलेल्या दोन्ही चपट्यांना कवटाळलं...

एक पिऊन रिकामी केलेली,
दुसरी पिऊन फोडलेली...
त्यानंतर मला आठवत नाही; एकही चपटी रिचवलेली,
कुणासाठी पितोय, कुणा कुणाना पाजलेली...

एक लिहून खोडलेली,
दुसरी चिडून फाडलेली...
त्यानंतर मला आठवत नाही;
एकही कविता सुचलेली,

कुणासाठी लिहिलेली,
कुणापर्यंत पोचलेली...
चुकीच्या हातात पडल्यांमुळे
अर्थाचा अनर्थ झालेली,

अनर्थ म्हणजे नक्की कसा
आयुष्य बदलुन टाकेल असा
आयुष्याची सोबतीनच
कवितेमुळे बदललेली,

ही कविता अपूर्ण कशी?
जोडीदार मिळवुन देणारी
पुर्णत्वाला नेणारी...

मस्तच !
किश्या ह्यांचा झब्बूही मस्तच
ज्जाम हेवा वाटतोय राव ! लोकांना एकाच वेळी दोन दोन मिळतात मला एकही मिळत नाहीये Sad
मी कविता किंवा बाटली बद्दल बोलतोय कृ गै न Wink