Submitted by शरद on 21 December, 2013 - 09:29
आज २१ डिसेंबर, २०१३. नवीन वर्षासाठी फक्त दहा दिवस राहिले. या नवीन वर्षात काय करायचे, काय सोडायचे याचा काही विचार - अर्थातच न्यू ईयर रिझॉल्यूशन चा विचार - प्रत्येकाने केला असेलच! तोच आपण इथे लिहूया. कदाचित यावर पूर्वी धागा निघाला असेल; पण मला तो ठाऊक नाही.
फक्त खिल्ली न उडवता, सिरियसली काही रिझॉल्यूशन केले असेल तर ते लिहावे अशी (किमान माझीतरी) अपेक्षा. कदाचित आपण एक-दुसर्याकडून काहीतरी शिकू! 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
१.मी चहा सोडला होता तो पुन्हा
१.मी चहा सोडला होता तो पुन्हा सुरु केला. तो बंद करणार. (हे पुन्हा सूरु केलेले/लागलेले व्यसन सोडणे कठिण जाते एकदम हा अनुभव येतोय ;तरी बघुया). त्यात चहा बरोबर गोड क्रीमची बिस्किटे खायची सवय लागलीय. ती सोडणार.
(बरेच जीव खुष होतील. होवोत बिचारे; तेवढाच त्यांना आनंद.)
२. फेसबूक वापरायचे 'कमी' करणार.
३. व्हाट्सॅप कमी वापर
४. २०१४ पासून मायबोली वर कमी येणार किंवा येणारच नाही.
५.सहा तास झोपणार कमीत कमी. वरील सर्व गोष्टीत वेळ घालवून झोपेचे खोबरे झालय नाहक.
सध्या एवढेच इस्शु आहेत पुढे.(आता झोपते)
(पुढच्या मुंबई मॅरेथॉनमधे भाग
(पुढच्या मुंबई मॅरेथॉनमधे भाग घेण्याची तयारी म्हणुन.) >>>>>>
माझा पण तो इरादा आहे (मुंबई ऐवजी पुणे असे वाचावे). पण कितपत शक्य होईल याबाब्त साशंकता असल्याने मी ५ कि.मी वर थांबायचे असा संकल्प केला आहे. जर सारे काही व्यवस्थित झाले तर ... इन्शाअल्ला, पुढच्या वर्षी पुणे मॅरॉथॉन धावेनसुद्धा!
सकाळी लौकर उठणार.
सकाळी लौकर उठणार.
वजन कमी करणार मुंबई पुणे
निस्पात, तुम्ही सर्वच
निस्पात, तुम्ही सर्वच गोष्टींचा नि:पातच करायला निघालात.
लहान असताना कोणी डाएट करत आहे
लहान असताना कोणी डाएट करत आहे म्हणत असेल तर सगळीकडे (सिरियल्स , आजुबाजुला) त्याची थट्टाच केलेली ऐकली .. त्यामुळे लहान असताना वाटायच की ज्याना सुंदर दिसायचे फिगर ई. मेंटेन करायचे (जे चुक नाही) तेच डाएट वगैरे फॉलो करतात.. पण जस जस वाचन वाढल .. अनुभव येत गेले त्यातुन जाणवल .. डाएट प्लॅनिंग गरजेच्च आहे..
वजन आवाक्यात असल की असणारा उत्साह , ऊर्जा याला तोड नाही..
मग हे वर्ष डाएट नीट करुन .. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी च्या प्रयत्नांसाठी आणि आहार निश्चिती साठी..
मी ह्या आधी कधी संकल्प केला
मी ह्या आधी कधी संकल्प केला नाहिये, पण ह्या वर्षी करणार.....
१. रागावर नियंत्रण ठेवणार
२. वजन ५५किलो तरी करणार.
मा. बो. वरील अर्धवट
मा. बो. वरील अर्धवट कथा/गोष्टींचा (राहिलेल्या/ठेवलेल्या) नाद सोडून देणार.
मा. बो. वरील अर्धवट
मा. बो. वरील अर्धवट कथा/गोष्टींचा (राहिलेल्या/ठेवलेल्या) नाद सोडून देणार.
>> अगदी अगदी.. मी पण.. वैताग आला वाट बघुन..
मा. बो. वरील अर्धवट
मा. बो. वरील अर्धवट कथा/गोष्टींचा (राहिलेल्या/ठेवलेल्या) नाद सोडून देणार.>>> माझा २०१३ चा संकल्प होता. माय्बोलीवरील प्रत्येक कथा पूर्ण करणारच.
सगळ्यांचे संकल्प वाचायलाच छान
सगळ्यांचे संकल्प वाचायलाच छान वाटताहेत.
त्याच नव्याने पुन्हा.
मी काहीच नवा संकल्प केला नव्हता हे वाचेपर्यंत.बस्स जमेल तसं वाचणं , लिहिणं , शांत निवांत गाणी ऐकत राहणं या रोज रोज रोजच्याच इच्छा
१. वजन वाढू द्यायचे नाही.
१. वजन वाढू द्यायचे नाही. (कमी झाले नाही तरी चालेल एकवेळ
)
२. शाररिक तंदुरुस्ती वाढवणे (फिटनेस, ह्यासाठी सध्या थांबलेले रोज ३० मिनिटे चालणे पुन्हा सुरू करेन, १ मार्चपासून)
३. २० जनेवारीपासून २० मार्च्र पर्यंत पूर्ण नेट सन्यास घेऊन पहायचा आहे. जर नीट जमले तर पुढचे अख्खे वर्ष हेच धोरण राबवणे.
२०१४ पासून मायबोली पडीक रहाणे
२०१४ पासून मायबोली पडीक रहाणे कमी करणार.रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न करणार.
इथे बर्याच लोकांचा संकल्प
इथे बर्याच लोकांचा संकल्प वजनावरच दिसतोय

माझा सुद्धा ह्याच संकल्पाला हातभार लावायचा प्रयत्न असणार
मी 'दार ठोठावून परतलो : भाग -
मी 'दार ठोठावून परतलो : भाग - ०२' लिहिण्याचा संकल्प सोडला आहे.
-गा.पै.
मी 'दार ठोठावून परतलो : भाग -
मी 'दार ठोठावून परतलो : भाग - ०२' लिहिण्याचा संकल्प सोडला आहे.>>> गामाजी, भाग १ मध्ये बरेच प्रश्न पडलेत लोकांना त्याची उत्तरे द्यायचा पण करुन टाका लागोलाग
>>माझा सुद्धा ह्याच संकल्पाला
>>माझा सुद्धा ह्याच संकल्पाला हातभार लावायचा प्रयत्न असणार
जयवी...
म्हणजे वजन वाढवायचा की घटवायचा?
दादच्या योग्य सूचनेनुसार... शक्य तितका प्रिसाइज संकल्प करायचा प्रयत्न करतोय.
१) रोज किमान १ तास बासरीची प्रॅक्टिस करणार.
२) आठवड्यातून किमान २ तास संस्कृतच्या अभ्यासासाठी देणार.
३) चहा आटोक्यात आणणार- दिवसातून २ पेक्षा जास्त कप चहा घेणार नाही.
४) शिफ्टमधला जॉब असल्याने व्यायामात नियमितपणा येत नाही... तरीही शक्य तेव्हा २० सूर्यनमस्कार, १० बैठका- एवढा तरी व्यायाम करणार.
५) पॉझिटिव्ह थिंकिंगची एक-दोन खूप आवडलेली पुस्तके आहेत. पण ती फक्त वाचली आत्तापर्यंत.
त्यातील किमान ५०% गोष्टी अंमलात आणणार.
गामा_पैलवान | 30 December,
गामा_पैलवान | 30 December, 2013 - 21:45 नवीन
मी 'दार ठोठावून परतलो : भाग - ०२' लिहिण्याचा संकल्प सोडला आहे.
-गा.पै.
<<
हुस्श!
बरे झाले सोडलात ते.
नव्या वर्षात सोडून देण्याच्या बाबींपैकी ती एक महत्वाची बाब ठरो.
सगळ्यांचे संकल्प सिद्धीस जाओत
सगळ्यांचे संकल्प सिद्धीस जाओत महाराजा !!!!
माझे संकल्प
१. वजन आजून १२ ते १५ किलो कमी करणार मे महिन्या पर्यंत ( ऑगस्ट १३ ते डिसें १३ ह्या कालावधीत १७ किलो कमी झालच आहे!!!)
२. सध्या फ्रीलान्स लेक्चरर आहे. तो उद्योग अजुन वाढवणार
३. छोटे ऑफिस भाड्याने घेवुन तिकडे मैत्रिणी बरोबर शेअरिंग मधे पर्सनॅलिटी ग्रुमिंग व मेडिटेशन ची प्रॅक्टिस करणार ( हा जरा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. बघु कितपत जमतय)
४. टॅरो रिडर ची करीअर डेव्हलप करणार.
चैतन्य अरे शुभ बोल
चैतन्य अरे शुभ बोल रे..........
वजन वाढतं आपोआप. कमी करायलाच प्रचंड मेहनत लागते.
वजन आजून १२ ते १५ किलो कमी
वजन आजून १२ ते १५ किलो कमी करणार मे महिन्या पर्यंत ( ऑगस्ट १३ ते डिसें १३ ह्या कालावधीत १७ किलो कमी झालच आहे!!!)>>> प्रचंड हेवा! ( हेवा न वाटून घेणे असा संकल्प सोडलेला नाही.)
आमचा संकल्प : ह्यावर्षी (
आमचा संकल्प :
ह्यावर्षी ( म्हणजे खरेतर मार्च मधील एक डीलीव्हरेबल पुर्ण झाल्यावर )
मी काहीही संकल्प करणार नाही ... मस्त मोकळं जगणार ... कोणतेही नियम बियम नाही .... आली लहर केला कहर ष्टाईल ने !!
नो प्लॅन इज द प्लॅन !!
मोकीमी... अदृष्य व्हायचय की
मोकीमी... अदृष्य व्हायचय की काय?
Pages