Submitted by शरद on 21 December, 2013 - 09:29
आज २१ डिसेंबर, २०१३. नवीन वर्षासाठी फक्त दहा दिवस राहिले. या नवीन वर्षात काय करायचे, काय सोडायचे याचा काही विचार - अर्थातच न्यू ईयर रिझॉल्यूशन चा विचार - प्रत्येकाने केला असेलच! तोच आपण इथे लिहूया. कदाचित यावर पूर्वी धागा निघाला असेल; पण मला तो ठाऊक नाही.
फक्त खिल्ली न उडवता, सिरियसली काही रिझॉल्यूशन केले असेल तर ते लिहावे अशी (किमान माझीतरी) अपेक्षा. कदाचित आपण एक-दुसर्याकडून काहीतरी शिकू! 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझे स्वतःचे काही (सिरियस)
माझे स्वतःचे काही (सिरियस) रिझॉल्यूशन्स!
१. व्यायामः रोज १ कि.मी धावणे, ५ सूर्यनमस्कार आणि १० सिट अप्स पासून सुरवात करून दर आठवड्याला वाढवत जाऊन ५ कि.मी. धावणे, २५ सूर्यनमस्कार आणि ५० सिट अप्स वर ४ ते ५ महिन्यात पोचणे आणि तो व्यायाम सातत्याने राखणे.
२. डायरी. रोज कामाची डायरी आणि वैयक्तिक डायरी लिहून ती टेबल वर बाळगणे आणि ती रोज अपडेट करणे.
३. मायबोली. मा.बो. वर खूप वेळ वाया जातो. रोज फक्त दोन तास (शक्यतो संध्याकाळी ६ ते ८) मा.बो. साठी देणे. त्यातच गज़ला, 'आम्ही कोल्हापुरी' आणि इतर सर्व आवडीची सदरे वाचणे व प्रतिसाद देणे.
४. वाढदिवसः सर्व संबंधितांचे वाढदिवस आणि लग्न-वाढदिवस डायरीत नमूद करणे आणि त्यांना 'पत्रे' पाठवणे ( एस.एम.एस.) नव्हे.
५. वाचनः अवांतर वाचणासाठी किमान दोन तास देणे. शक्यतो रात्री ९ ते ११.
रागवायच ना ही...
रागवायच ना ही...
वेळेचे नियोजन करायचे आहे...
वेळेचे नियोजन करायचे आहे...
टुकार हिंदी सिनेमे न
टुकार हिंदी सिनेमे न बघणे.
मेकप वापरणे सोडून देणे.
लिखाणाला वेळ देणे -
लिखाणाला वेळ देणे - आठवड्यातून किमान पाच तास,
प्रकृतीकडे अधिक लक्षं देणे - रोज व्यायाम आणि पथ्य
दर्वर्षीप्रमाणेच यायाम कराचा
दर्वर्षीप्रमाणेच यायाम कराचा हेच ठर्वलोय मी.
नेमीप्रमाणे बोम्बलनार हे ठावुक हायेच..
बघु..
वजन कमी करणार आणि रागवायचं
वजन कमी करणार आणि रागवायचं कमी करणार....बडबड पण जमली तर कमी करणार....
समाजकार्य
समाजकार्य
वजन कमी करणार. हातातली कामे
वजन कमी करणार.
हातातली कामे adhoc, मूड असेल त्याप्रमाणे करायची सवय मोडून प्लॅनिंग करून पूर्ण करणार. एरवी कामाचे प्लॅनिंग केले की ते काम बोंबलतेच. पण तसं होऊ नये म्हणून प्रयत्न करणार.
वजन कमी करणार >>>>>>>>
वजन कमी करणार >>>>>>>> अनिश्का.. ?
मी शांतचित्ताने राहण्याचा प्रयत्न करणार आहे....... अलबत माझ्यावर कोणी पेट्रोल टाके पर्यंतच
नेमाने लिहायच ठरवायचय ,(
नेमाने लिहायच ठरवायचय ,( नव्या वर्षाची वाट न पहाता लगेच सुरु करते अस मी दिवाळीपासून म्हणतेय खर तर)
मी एक सांगू? रागाला येऊ नका
मी एक सांगू? रागाला येऊ नका कुणी.
पण... रिझोल्युशन करताना अगदी नेमकं करावं. क्वान्टिटेटीव्ह.
म्हणजे.... सहा महिन्यात ४ किलो वजन कमी करणार.
रोज अर्धा तास प्राणायम करणार... असं.
शांतचित्ताने रहणार - रोज किमान ५०% बाबतीत शांतचित्ताने रहाणार. हे अधिक नेमकं झालं. म्हणजे ट्रॅक ठेवायला बरं जातं. आणि आपण न जमणारं काही ओढवून घेत असलो तर आधीच कळतं....
उदा. मी कित्येक वर्षं म्हणतेय... साखर कमी खाणार.... म्हणजे काय? किती कमी?

अर्थात ते जमलच नाहीये. त्याऐवजी आठवड्यातून दोनच गोड पदार्थं खाणार, सकाळचा सोडल्यास चहात साखर घेणार नाही. हे अधिक नेमकं झालं... मला जमेल (बहुतेक)... पुढच्याच्या पुढल्या वर्षी
कवितासंग्रह(गझल आणि कविता
कवितासंग्रह(गझल आणि कविता एकत्र) प्रकाशित करणार.
जून २०१४ अखेरीपर्यंत अजून सात किलो वजन कमी करणार(७ किलो आतापर्यंत झालेलेच आहे).
वाचन वाचन वाचन आतापर्यंत करत
वाचन वाचन वाचन आतापर्यंत करत आलो तसे
रागावर नियंत्रण ठेवणार......
मला मात्र वजन वाढवायचेय..........
नवीन कॅलेंडर वर्ष असा बदल करा
नवीन कॅलेंडर वर्ष असा बदल करा शीर्षकात.
रच्याकने, हे आपले नवीन वर्ष नसल्याने माझा काहीही संकल्प नाही. मी दिवाळी, दसरा, पाडवा, शिवजयंती अशा सणांना/दिवशी संकल्प करतो.
रिझॉल्यूशन्स........दर्वर्षीप
रिझॉल्यूशन्स........दर्वर्षीप्रमाणेच एकच ठरवते आहे रोज घरातुन लवकर निघुन ऑफिसला चालत जायचे पण अजुन हि नाहि जमत.....
नवीन वर्षाचे संकल्प असे
नवीन वर्षाचे संकल्प असे शीर्षक द्यायला हवें खरंतर.
येणाऱ्या वर्षी मी एक नवी भाषा
येणाऱ्या वर्षी मी एक नवी भाषा (परदेशी) स्वतःला शिकवायचे ठरवले आहे!
या आधी न्यू ईयर रिझॉल्यूशन फक्त 'decide' होतं , यावेळी 'do' (कृतीत आणणार) आहे.
झरबेरा - जबरी संकल्प! मी
झरबेरा - जबरी संकल्प!
मी कालपासून एक नियम अस्तित्वात आणला आहे. कितीही दमलो असलो, कंटाळलो असलो तरीही लिफ्ट वापरायची नाही. घर पाचव्या मजल्यावर आणि एकुण पंचाऐशी पायर्या! पण तूर्त तरी हा नियम पाळत आहे. घरातून मी एका दिवसात किमान पाच वेळा तरी बाहेर पडतो.
बेफी-----भारी नियम आहे
बेफी-----भारी नियम आहे ...मि २०१३ मधे बर्याच वेळा केला आणी मोडला पण
....... आपल्याला शुभेच्छा ... .मला पण सुरसुरी आली तर करिन हाच नियम....

रोज किमान ६ किमी चालायचे. तीन
रोज किमान ६ किमी चालायचे. तीन महिन्यांनी धावणे सुरु करायचे. (पुढच्या मुंबई मॅरेथॉनमधे भाग घेण्याची तयारी म्हणुन.)
वा भ्रमर, मनापासून शुभेच्छा!
वा भ्रमर, मनापासून शुभेच्छा!
सुहास्य, तुम्हालाही
माझे तसे बरेच संकल्प
माझे तसे बरेच संकल्प आहेत.....
पण सध्या तरी केलेले संकल्प पूर्ण करणार हा संकल्प करत आहे
माझे पण बरेच
माझे पण बरेच आहे................. पुर्ण झाले की पुढच्या वर्षीच्या डिसेंबर मधे जाहीर करेन
फेसबूकवर फ्रेंडलिस्ट १०००
फेसबूकवर फ्रेंडलिस्ट १००० करायची आहे. ज्यात किमान ६० टक्के मुली असतील.
लग्नाआधी ऑर्कुटवर डिस्टिंक्शन असायचे. आता फर्स्टक्लास तरी जमवावा म्हणतोय.
वहीनी ऐकत आहे का
वहीनी ऐकत आहे का
तिने ऐकले वाचले तर चांगलेच
तिने ऐकले वाचले तर चांगलेच आहे.. पण ६० टक्के एवढ्या छोट्या आकड्यावर विश्वास कितपत ठेवेल याची खात्री नाही..
भ्रमर आपने तो हमारे मन कि
भ्रमर आपने तो हमारे मन कि बात बोल दी. २०११ च्या डिसेंबर नंतर पळायचे बिल्कुल बंद झालेय. या वर्षी परत नक्कि सुरु करेन. (च) आणि दाद म्हणताहेत त्याप्रमाणे ५ किमी अॅटलिस्ट आठवड्यातुन २ वेळातरी.
झरबेरा छान. शुभेच्छा. कोणती शिकताय आणि प्रोग्रेस इकडे कुठेतरी लिहित जा.
सर्वांचे संकल्प पुर्ण
सर्वांचे संकल्प पुर्ण होवोत.
दाद, मी साखर सोडण्याचा निर्णय अंमलात आणला. आता बिनसाखरेचेच पदार्थ गोड लागतात. थोडे दिवस त्रास होतो पण नंतर सवय होते. खरं तर कुठलाही संपर्क पुर्णत्वाला विरोध होतो तो आपल्याकडूनच. तोही काही दिवसच. पण निग्रह केला तर काहीही अशक्य नाही.
आता बिनसाखरेचेच पदार्थ गोड
आता बिनसाखरेचेच पदार्थ गोड लागतात<<<
Pages