क्विक रवा डोसा/दोसा(फोटो सहित)

Submitted by सीमा on 16 December, 2013 - 14:33
rava dosa
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कप तांदळाचे पीठ
१ कप रवा
१/२ कप मैदा
कोथिंबीर
मीठ
तेल
हिरवी मिरची बारीक चिरून
जीरे
आल (बारीक चिरुन. optional)

क्रमवार पाककृती: 

रवा+मैदा+तांदळाचे पीठ एकत्र करुन त्यात पाणि घालून घ्यावे. कन्सिस्टन्सी अगदी मठ्ठ्या प्रमाणे पातळ असायला पाहिजे. त्यात आता हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, जीरे आणि इतर जे हवे असतील ते घटक घालून घ्यावेत.
नॉनस्टीक तव्यावर थोड जास्त तेल घालून , नेहमी घालतो त्यापेक्षा थोड उंचावरून डोसे घालावेत. वरून तेल घालावे.
मोठा गॅस करून क्रिस्पी होईपर्यंत ठेवावे. उलटु नये. डोसा बाजूने सुटु लागला कि लाक्डी उलथण्याने काढून गरम गरम सर्व्ह (चटणी किंवा मेतकुट सोबत )करावा.

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे
अधिक टिपा: 

जस जसे डोसे घालू तस तस मिश्रन घट्ट होत जाते. पाणी घालून मिश्रणाची कन्सिस्टन्सी पातळच असण गरजेच आहे.
ओनिअन रवा डोसा करताना कांदा बारीक कापून डोसा घालून झाल्यावर पसरायचा. अगदी रेस्टॉरंट प्रमाणे डोसा तयार होतो. रवा डोसा क्रिस्पीच पाहिजे. त्यामूळ गॅस मोठाच असावा.
ही रेसीपी खूप versatile आहे. तुम्ही तुम्हाला हव्या त्या चविप्रमाणे बदल करु शकता.

बरेचजणींनी लिहिलय वेडावेकडा डोसा होतो, त्यांच्यासाठी . डोसा पुर्ण तवा भरून घालायचा. वरती मी पुर्ण चौकोनी तवा भरून घातलाय तसा.

माहितीचा स्रोत: 
असंख्य साउथ इंडिअन मैत्रिणी.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रवा दोसा अत्यंत आवडतो पण कधी केला नाहीये. आता करेन लवकरच.

गॅस मोठा ठेवला तर दोसे क्रिस्पी होत नाहीत असा अनुभव आहे. नुसतेच ब्राउन होतात तव्याकडच्या बाजूस पण पानात वाढेपर्यंत मऊ झालेले असतात.

तांदळाच पीठ कस वापरायच हा प्रश्न वारंवार युक्ती बाफ वर येतो. त्यावर हे एक सोल्युअशन.
फोटो असेल. मिळाला कि टाकते.

असे करुन पाहिले पाहिजे. मी तिन्ही पिठे समप्रमाणात घेऊन दही किंवा ताक + पाणी घालून रात्रभर भिजवून मग करते. हे सोप्पे आहे त्यापेक्षा .

आली आली रवाडोश्याची रेसिपी आली. हे मी आजच करीन. काल मी इंग्रो मधून प्रथमच रेडीमेड इडलीचं पीठ आणलं आणि इडल्या केल्या. सांबार आणि दीपची खोबर्‍याची चटणी आहेच घरी.

आवांतरः
इंग्रोतल्या पीठाच्या इडल्या भयानक झाल्या. चिकट, रबरी. फेकून दिल्या सर्व. Uhoh

मी चितळ्याचं इडली मिक्सही वापरलंय. ठीक आहे. पण घरी डाळी भिजवून, आंबवून जशा इडल्या होत्यात त्याची सर नाहीच.

मस्त Happy पण सिंडी + १. बारीक गॅसवर केले तर कुरकुरीत होतात असा अनुभव आहे. ह्या पद्धतीत जराही बदल न करता करुन बघेन मोठ्या आचेवर कुरकुरीत होतात का.

मी नुसत्या तांदळाच्या पिठाचे करते, पण ते अर्थातच, कुरकुरीत होत नाहीत. रवा घातल्याने कुरकुरीत होत असतील. करून बघते.
मैदा का घालायचा? घातला नाही तर चालेल का? (घरात मैदा नाहीये आणि एरवी विशेष वापरला जात नसल्याने मैदा आणणे टाळता येईल का हा विचार हे एकमेव कारण आहे या प्रश्नामागे.) Happy

रवा मैदा सारख्या प्रमाणात घेऊन अर्धा तास आंबट दह्यात भिजवायचे. आत जिरे मिरची मीठ वाटून घालायचे. ऐश करायची असेल तर वरून कांदा आणि बारिक चिरलेले ओले खोबर्‍याचे काप. झाकन
ठेवून शिजवायचा मग पलटून बारिक गॅसवर क्रिस्प करायचा. तांदुळाच्या पिठाचीच काही गरज नाही.

हेच मि श्रण घ टट करून त्याचे मैसूर भज्जी करता येतात. पण ती तळावीच लागतात. बेक होत नाहीत.

ह्याच्यात काय क्विक आहे?
रवा डोसा असाच तर बनवतात... उगाच क्विक वगैरे नाव कशाला ते..>>> पारपारिक रवा डोसा उडद डाळ भिजवुन वाटुन
त्यात रवा मिसळून ...फर्मेन्ट करुन ़करतात..
हा क्विकच आहे.

मी हे डोसे कालच केले. ऑस्सम रेसिपी आहे सीमा. तुला धन्यवाद द्यायला रात्री फोन पण केला होता पण तू भटकायला गेली होतीस. मग मालकांना सांगितलं की मालकीण बाईंना धन्यावाद द्या म्हणून Happy

मला फ्रीजरमध्ये एक पीठ मिळालं ते मी मैदा म्हणून वापरलं. ते मैद्यासारखं शुभ्र सफेद नव्हतं. थोडं रवाळ आणी डार्कर रंगाचं होतं.काय होतं कोण जाणे. शेरलॉकला बोलवायला हवं मिस्टरी सॉल्व्ह करायला.

चौघांनाही फार आवडले डोसे.

तू भटकायला गेली होतीस. मग मालकांना सांगितलं की मालकीण बाईंना धन्यावाद द्या म्हणून >>>> च्च! टार्गेटच्या "कस्टमर केयर"ला फोन करायचास की Wink

दोसे मोठ्या आचेवर केलेस की कसं?

सीमा, मस्त रेसिपी. Happy

शूम्पे, म्हणजे रेसिपीत 'मैदा किंवा हाताला लागेल ते कुठलंही पीठ' असं लिहायला हरकत नाही. Lol

हो हो मी रेसिपीत लिहिल्याप्रमाणे हाय फ्लेमवर केले. पीठ सीमा ने लिहिलय तसं पातळ हवं मात्र म्हणजे मस्तच जाळी बिळी पडते.

मी आता शोध लावणार आहे कसलं पीठ होतं ते त्याचा. मी नेहेमी स्प्राउट्स मधून अनब्लिच्ड मैदा आणते तो नेहेमीसारखा पांढरा शुभ्र नसतो. पण कालचा त्यापेक्षाही डार्कर होता. पण नशिबाने त्या पिशवीवर ४ नंबरी प्रॉडक्ट कोड आहे तेव्हा मी शोधमोहीम तडीस नेणारच.

नाही सिंडाक्का. अंदाज चुकला. मी बारीक रवा फ्रीजरमध्ये ठेवत नाही. बहुतेक मैदाच असणार पण नक्की कोणती व्हरायटी शोधायला हवं.

पण तो फ्रीझरमधे का होता?
इथलं अनब्लीच्ड ऑल पर्पज फ्लोअर असू शकेल. नाहीतर मग ज्वारीबिरीचं पीठ. (शिळं झालं की भाकरीला विरी जाते म्हणून आईने फ्रीझरमधे ठेवलं असणार. Happy )

किती ते प्रश्न. मैदा मी फ्रीजर मध्ये ठेवते. का ते माहित नाही. बहुतेक फारच क्वचित वापरला जातो वर्षाकाठी ३-४ वेळा म्हणून असणार.

maida nahi waparala tar chalel ka? maida nakki kashyasathi ghalaycha?

Pages