बँक अकाऊंट बाबत

Submitted by दक्षिणा on 3 December, 2008 - 00:05

माझ्या मैत्रिणीचे सेव्हींग अकाऊंट बॅंक ऑफ महाराष्ट्र - हडपसर मध्ये होते. २००३ ते २००६ च्या शेवटीपर्यंत. कारण तिचं ऑफिस तिथे होतं. मग तिने जॉब चेंज केला, म्हणून फक्त तेच अकाऊंट घराच्या जवळच्या शाखेत ट्रान्सफर केलं. त्यात बर्‍यापैकी अमाऊंट होती. २००७ मध्ये तिला पैशांची गरज होती, पण या जवळच्या शाखेतून पैसे काढताना खूप त्रास झाला. बँकेच्या सांगण्यानुसार त्यांच्याकडे तिच्या सहीचे प्रूफ नाहीए. तर म्हणून तिने एखादं फोटो आयडेंटीटी दाखवावं आणि सिद्ध करावं की ती तिच आहे.

एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे ती पुण्याची नाही. गाडी चालवत नाही, त्यामुळे लायसन्स नाही, रेशन कार्ड आहे पण त्याचा उपयोग नाही, पासपोर्ट पण नाहीए. पॅन साठी ऍप्लाय केलं होतं पण ते रिजेक्ट झालं कारण पुर्ततेसाठी त्यांना पुण्याच्या ऍड्रेस ची कागदपत्रं हवी आहेत.

काल आमची चर्चा झाली त्यावरून आम्ही असा निर्णय घेतला की ते अकाऊंट बंद करायचं, पण ते करता येईल का? त्या अकाऊंट वर २००७ नंतर काही ट्रँज्झॅक्शन केलेलं नाही. बँक अशी जास्त काळ ऑपरेट न केलेली खाती बंद करते का? अर्थात तसं करताना खातेदाराला पत्र पाठवतंच असेल, पण आम्हाला शंका आहे की हडपसरच्या बँकेतून इकडे ट्रन्सफर करताना इंटर्नलीच कागदपत्रं दिली नसतील (त्या शाखेने या शाखेला) तर पता नसेल ही कम्युनिकेट करायला. Sad

याबाबतीत कोणी मार्गदर्शन करू शकलं तर खूप बरं होईल.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मग सिटी नको तर दुसरी कुठली चांगली बँक आहे जिथे इथे पैसे ठेवता येतील, नि तइथून काढता येतील? तिथे पैसे जर उरले तर त्याचे परत डॉ. नाही केलेत तरी चालेल. तसे राहू देत तिथे.

कुणाचे सुदैव, कुणाचे दुर्दैव काहीहि असले तरी जाणे होणार एव्हढे नक्की. कदाचित् पुढल्या वर्षी. जरा मनाची तयारी करावी लागेल एव्हढेच.

एस बी आय एकदम भिकार बँक आहे... मला मालदीव मध्ये बेकार अनुभव आहे... मी शेवटी दुसर्‍या बॅन्केत अकाउंट उघडले....

सिटी ची सर्व्हिस चांगली आहे....

आयसीआयसीआय ला NRI लोक प्रिय आहेत, पण खर सांगायच तर भारतात online banking, sms,phone banking साठी आयसीआयसीआय सारखी मस्त सर्व्हिस कोणीही देत नाही अजून...

हां, थोडे जास्त चार्जेस घेतात ते...

शंभर पैकी ८०-८५ आय.सी.आय.सी.आय. ब्यांकांची सेवा रद्दड आहे असे माझे अत्यंत प्रामाणिक मत आहे.

शरद

मला D-Mat A/c उघडण्या बाबत माहिती हवी आहे. ट्रेडींग सुरु करायच आहे पण ह्या आधी कधीहि ट्रेडींग केलेल नाही, ट्रेडींग करण्यास डि-मॅट अकाऊंट लागत एवढच महित आहे. हे अकाऊंट कुठल्याहि बँकेत उघडाव कि या साठी हि चांगली वाईट बँक अस आहे.

समु,

हे अकाऊंट कुठल्याही बँकेत उघडता येत नाही. ज्या बँका ब्रोकर पण आहेत अश्यामध्येच उघडता येते. उदा ICICI, kotak, hdfc इ काही इतर जसे शेअरखान, १ पैसा, रिलायन्स मनी इ सारखे ब्रोकर तुम्हाला हे ऑनलाईन ट्रेडिंग अकाउंट उघडू देतात. ऑनलाईन मध्ये डि मॅट आपोआप येते.
प्रत्येक बँकेचे काही फायदे तोटे आहेत. जसे ब्रोकरेज कमी किंवा जास्त. ते पाहून अकाउंट उघडा. Happy शुभेच्छा.

एटीएम च्या नवीन नियमांबद्दल मटामधली ही चांगली लिन्क. एटीएम किंवा डेबिट कार्ड वापरणार्‍यांनी जरूर वाचावी.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9559858.cms

कार्ड वापरून जेव्हा जेव्हा पैसे काढले जातील तेव्हा तेव्हा एसएमएस करण्याची सक्ती व एटीएम वापरताना प्रत्येक स्वतंत्र व्यवहारासाठी (Transaction) पुन्हा पासवर्ड लागणे हे दोन अतिशय चांगले बदल आहेत.

कार्ड वापरून जेव्हा जेव्हा पैसे काढले जातील तेव्हा तेव्हा एसएमएस करण्याची सक्ती
--- सर्वंकडे एसएमएस मिळण्याच्या सुविधा असायला हव्यात. सर्व कार्डधारकां कडे मोबाईल किंवा इंटरनेट आहे असे गृहित धरले आहे का?

द्क्षे, बँकेतुन पैसे काढलेस ना....? जुना अकाउंट बंद केला का? नविन खात्यातुन आता बँकेचा सर्व व्यवहार सुरळीत आहे ना...?

हे बहुधा मोबाईल ज्यांच्याकडे आहे अशांसाठी. इतरांसाठी ईमेल अ‍ॅलर्ट ची काहीतरी सोय असेल, पण बँकेला विचारायला लागेल. एटीएम वापरणार्‍यांपैकी बहुतेकांकडे मोबाईल असेल असे त्यात गृहीत धरले असावे आणि ते फार चूक वाटत नाही.

दुसरे म्हणजे मोबाईल, इंटरनेट नसेल तर एसएमएस कोठे पाठवणार Happy

आजकाल इंटरनेट बँकिंगने बिल भरताना, थर्ड पार्टी ट्रान्सफर करताना काही बँकांच्या साइटवर दोन पासवर्ड्स लागतात (लॉगिन पासवर्ड,ट्रान्झॅक्शन पासवर्ड) वर तुमच्या मोबाइअलवर त्या ट्रॅन्झॅक्शनसाठी पाठवलेला सेक्युरिटी कोडही द्यावा लागतो.
म्हणजे कुणी तुमचे पासवर्ड्स हॅक केले तरी त्याला गैरफायदा घेता येणार नाही.

बरोबर भरत.

मी एटीएम मधे लोकांना सर्रास ती पावती त्या बिन मधे टाकून देताना पाहिले. ते ही रिस्की वाटते. किमान फाडून टाकायला पाहिजे. नाहीतर प्रिन्टेड रेकॉर्ड घेउच नये.

मी एक चेक जमा स्टेट बँकेत जमा करायला दिला होता तो credit झाला. नंतर debit म्हणुन दाखवला आहे. कारण विचारले तर ज्या शाखेत जमा केला आहे ते म्हणतात मुख्य शाखेत चेक जातात.मुख्य शाखेतले म्हणतात जिथे जमा केला आहे तिथेच प्रोबलेम काय आहे हे समजेल.काय करावे समजत नाही.या लोकांनी माझा चेक हरवला कि काय समजत नाहि. तेथेच fdn loan म्हणुन १०२ रु कापले आहेत. ते काय आहे ते समजत नाही. कोणी तरि मदत करा काय करु ते?

अविगा...

ताबडतोब बँकेत जा. तुम्हाल १०२ रु.पेनल्टी लागली आहे. फक्त हे चेक करा की तुम्ही स्लीप नीट भरली होती आणि चेक बरोबर होता की नाही. कधी कधी चेक क्रेडिट दाखवतात पण नंतर तो काही कारणां स्तव ( सही नीट नसणे, खाडाखोड इ.इ. )तो चेन्ट्रल क्लीयरिंग मधुन परत केला जातो. त्याचा भुर्दंड मात्र ज्याने चेक भरला त्याला लागतो. पण त्यांच्या सीस्टीम मधे नक्की काय झालय ते समजल्या शिवाय फायदा नाही. तुम्हाला बँकेतच जायला लगेल. थोडा आवाज चढवलात तर काम होइल.

त्यावेळी मी दोन चेक भरले होते ८९००५ आणि ८९००८ असे तर त्यांनी ८९००८ आणी ८९०८ असे फिल केले आहे.
बहुतेक त्यामूळे असेल.आणी या गोष्टिला आता दोन महीने झाले आहेत. Sad

एवढ्या मोठ्या रकमेचे चेक आणि तुम्ही इतक्या शांत कश्या काय राहू शकता?

ताबडतोब तुमचा अकाऊंट ज्या शाखेत आहे तिथे जा आणि त्यांच्या ऊरावर बसून हे ट्रान्जॅक्शन क्लिअर करून घ्या. ज्याअर्थी तुमच्या अकाऊंटला क्रेडीट पडलं त्याअर्थी तो चेक गहाळ झालेला नाही, स्टेट बँकेच्या ताब्यात आहे. आणि ग्राहक येऊन विचारत नाही तोवर त्यांच्या सस्पेन्स अकाऊंटला पडून राहील.

८९००५,८९००८ हे चेकची रक्कम नसून चेक क्रमांक असावेत.
चेक बाउंस झाला तर जमाकर्त्याला परत करायची पद्धत असते ना?
ज्यांनी चेक इश्यु केले त्यांना विचारा की त्यांच्या खात्यात चेक डेबिट झाला आहे का?

<त्यावेळी मी दोन चेक भरले होते ८९००५ आणि ८९००८ असे तर त्यांनी ८९००८ आणी ८९०८ असे फिल केले आहे.> त्यांनी म्हणजे कोणी? आणि कुठे फिल केले आहे?

New offer from SBI
Deposit 10 Rupees 100 times to your enemy's account. Every 4th time he will be charged 150 Rs by the bank. You lose Rs. 1,000 but he will lose Rs. 13,400.

Yours faithfully State Bank of India.

but he will lose Rs. 13,400 >> कसे काय? २५ वेळा १५० चार्ज लावला तर ३७५० होतात, शिवाय त्याला १००० जमा झाल्यामुळे निव्वळ तोटा २७५० एवढा होईल ना?

तो लिहायला चुकला आहे

After 4 th transaction every transaction will be charged 150 असे हवे

96 x 150 = 14400 टेक्स जातो
आणि आपण भरलेले 1000 +
म्हणून त्याचा लॉस 13400 होईल

Pages