बँक अकाऊंट बाबत

Submitted by दक्षिणा on 3 December, 2008 - 00:05

माझ्या मैत्रिणीचे सेव्हींग अकाऊंट बॅंक ऑफ महाराष्ट्र - हडपसर मध्ये होते. २००३ ते २००६ च्या शेवटीपर्यंत. कारण तिचं ऑफिस तिथे होतं. मग तिने जॉब चेंज केला, म्हणून फक्त तेच अकाऊंट घराच्या जवळच्या शाखेत ट्रान्सफर केलं. त्यात बर्‍यापैकी अमाऊंट होती. २००७ मध्ये तिला पैशांची गरज होती, पण या जवळच्या शाखेतून पैसे काढताना खूप त्रास झाला. बँकेच्या सांगण्यानुसार त्यांच्याकडे तिच्या सहीचे प्रूफ नाहीए. तर म्हणून तिने एखादं फोटो आयडेंटीटी दाखवावं आणि सिद्ध करावं की ती तिच आहे.

एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे ती पुण्याची नाही. गाडी चालवत नाही, त्यामुळे लायसन्स नाही, रेशन कार्ड आहे पण त्याचा उपयोग नाही, पासपोर्ट पण नाहीए. पॅन साठी ऍप्लाय केलं होतं पण ते रिजेक्ट झालं कारण पुर्ततेसाठी त्यांना पुण्याच्या ऍड्रेस ची कागदपत्रं हवी आहेत.

काल आमची चर्चा झाली त्यावरून आम्ही असा निर्णय घेतला की ते अकाऊंट बंद करायचं, पण ते करता येईल का? त्या अकाऊंट वर २००७ नंतर काही ट्रँज्झॅक्शन केलेलं नाही. बँक अशी जास्त काळ ऑपरेट न केलेली खाती बंद करते का? अर्थात तसं करताना खातेदाराला पत्र पाठवतंच असेल, पण आम्हाला शंका आहे की हडपसरच्या बँकेतून इकडे ट्रन्सफर करताना इंटर्नलीच कागदपत्रं दिली नसतील (त्या शाखेने या शाखेला) तर पता नसेल ही कम्युनिकेट करायला. Sad

याबाबतीत कोणी मार्गदर्शन करू शकलं तर खूप बरं होईल.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे वरील प्रश्न बँकेत जाऊन तिथेच विचारलेले बरे.

....
An eye for an eye makes the whole world blind.

ते तर उघडच आहे, पण पुर्वतयारी म्हणून विचारतेय. म्हणजे बॅंकेत तयारीनिशी जाता येईल. नाही का?

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नयी तहज़ीब में दिक़्क़त ज़ियादा तो नहीं है I
मज़ाहिब रहते हैं क़ायम, फक़त ईमान जाता है II
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

I am sorry for replying in english since I can not type fast in Marathi. Bank doesn't close any account till they hear from the customer.. atleast not for 5-6 years so don't worry. You can close the account by visiting personally to the branch with an application for closing the bank account. You need to carry savings pass book, balance cheque leaves to be submitted back. Your friend can cancel all balance cheque leaves by writing "cancel" across the cheque. Please ensure that signature tallies with bank account.

खातं ट्रांन्सफर नक्की कशाप्रकारे केलं होतं. कारण, मी जेंव्हा बॅंक ऑफ महाराष्ट्र मध्ये चौकशी केली होती तेंव्हा मला असे सांगण्यात आले होते की या शाखेत नविन अकाउंट उघडा आणि दुसर्‍या शाखेतील अकाउंट नंबर द्या म्हणजे तिकडची रक्कम इकडे इंटर्नली जमा केली जाईल.

असे जर असेल तर याचाच अर्थ दोन्ही अकाउंट चालू रहात असणार.. अर्थात याबाबत तेच लोक जास्त व्यवस्थित सांगू शकतील कारण प्रत्येक शाखा स्वतच नियम बनवत असतात असे मला अनुभवांती उमजले आहे..

कूल,
सेम असंच झालं आहे बहुतेक. कारण तिचे दोन्ही अकाऊंट नं. वेगळे आहेत.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नयी तहज़ीब में दिक़्क़त ज़ियादा तो नहीं है I
मज़ाहिब रहते हैं क़ायम, फक़त ईमान जाता है II
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

खातं ट्रान्सफर केल्यावर पहील्या शाखेतलं खातं बंद होतं आणि दुसर्‍या शाखेत नवीन उघडलं जातं, म्हणून नंबर बदलतात. बहुधा ट्रान्सफर करताना पहील्या शाखेन सहीची माहीती पाठवली नसावी. बर्‍याच वेळेला काही काळानंतर सही बदलते. अशा वेळी परत नवीन सही बँकेत देण्याची सोय असते. त्याबाबत शाखेत चौकशी करता येईल. सहीचं प्रुफ नसेल तर बँक खातं बंद करू देणार नाही. बँकेला खातं बंद करता येत नाही. खात्यावर ट्रॅन्झॅक्शन नसेल तर बँक काही काळानंतर थोडी फी चार्ज करू शकते.
यावरती एक उपाय म्हणजे जुन्या शाखेत जायचं (तिथलं जुनं पासबुक असेल तर फार उत्तम) आणि त्यांच्याकडूनच सही verify करून घ्यायची. जुन्या शाखेत सही बाबत माहीती अजून ठेवलेली असेल असं गृहीत धरलेलं आहे.

चिगोखले,

धन्यवाद. जुनं पासबुक आहे.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नयी तहज़ीब में दिक़्क़त ज़ियादा तो नहीं है I
मज़ाहिब रहते हैं क़ायम, फक़त ईमान जाता है II
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

देशात SBI, CITI Bank, ICIC Bank, या पैकि कोणत्या बँकेच जाळ जास्त आहे, आपल्या महारष्ट्रात यापैकी कोणत्या बँकेच्या जास्त शाखा आहेत, कुणी सांगु शकेल का प्लीज Happy

मा. बो. वर NRE Bank Account ची लींक होती ती सापडत नाही आहे Sad

सास देशात ICICI bank च जाळ जास्त आहे. sbi च पण आहे पण सगळ्याच शाखांमधे NRE ची सुविधा नसते.

हा प्रश्न कुठे विचारावा न कळल्याने इथे विचारत आहे.
कुणी पेपाल (Paypal) अकाऊंटला SBI debit card link केलं आहे का?

>>सास देशात ICICI bank च जाळ जास्त आहे. sbi च पण आहे पण सगळ्याच शाखांमधे NRE ची सुविधा नसते.<<
SBI more than 10,000 branches in addition to 5000 branches of its associate banks like
SB HYDERABAD , SB INDORE, SB MYSORE , SB PATIALA , SB TRAVANCORE.
हे जाळं ICICI पेक्षा फारच मोठं आहे.

मी पुण्यात HBSI मधे अकाऊंट उघडला होता. तिथून Transfer वगैरे काही न करता, मुंबईच्या ब्रँचमधून अकाऊंट बंद केला, सगळे पैसे परत मिळाले. काहीहि अडचण नाही.

हळू हळू सर्वच बँका centralized processing करतील, सर्वांना टर्मिनल्स देतील नि कुठल्याहि कर्मचार्‍याला तुमचे काम करता येईल. पण सध्या इतकी सोपी गोष्ट करायला भारतीय प्रोग्रॅमर्स ना वेळ नाही. ते सगळे इकडे आले आहेत, किंवा येण्याच्या तयारीत आहेत. जर चीनकडे हे काम outsource केले तर स्वस्तात नि लवकर होईल.

मी सल्ला दिला असता...पण त्याचे वेगळे पैसे पडतील बरं का.... Happy

ok....jokes apart...

१. ऑनलाइन चि सोय असेल तर हडपसर मधुन transfer karun घ्यावेत,
२. तुझ्या मैत्रिणीने तुला २५००० चे चेक द्यावेत....पैसे तुझ्या अकौंट वर घ्यावेत, आणि मग आपल्या सोयीप्रमाणे होउदे...
३. अकौंट बंद वगैरे च्या भानगडीत पडू नये.

कुणी पेपाल (Paypal) अकाऊंटला SBI debit card link केलं आहे का >>
वर्षा ते होत नाही... मी ट्राय केले होते.. जरी पेपल डेबिट कार्ड घेत असले तरी.. SBI वैगेरे ची डेबिट कार्ड्स चालत नाहीत..मी ICICI चे पण ट्राय केले होते...कारण ती international नाहीत.. त्यासाठी तुम्हाला क्रेडिट कार्डच हवे आणि ते ही international .. मात्र काही ठराविक अमेरिकितील बँकांचे डेबिट कार्ड्स चालू शकतात.

स्टेट ब्यान्केचे डेबीट कार्ड बी एस एन एल मध्ये चालत नाही. म्हणे क्रेडिट कार्ड पाहिजे. मूर्ख लेकाचे. अरे गाढवानो डेबीट कारडात बॅलन्स शिल्लक असतो यामुळे रिस्क नाही. तरीही नाहीच. स्वाईपच होत नाही मशिनमध्ये.

पहिले जुन्या बॅन्केत जा. जाताना प्रूफ ओफ बर्थ, प्रूफ ऑफ रेसिडण्स, जुने पासबुक घेउन जा. डायरेक्ट मॅनेजर ला भेट. त्याला तिथून पुण्याला नवीन अकोन्ट जिथे आहे तिथे फोन लावायला सान्ग. एनीव्हेअर बॅन्किन्ग का नाही म्हणून त्याना फायर कर. I will take my biz elsewhere असे सान्ग. पैसे पहिले काढून घ्या. मग अकाउन्ट नसले तरी चालेल. Switch over to SBI/ CITI/ BARCLEYS/ STANCHART/ICICI immediately. You will def get better service. talk to the new account branch manager and ask whether he will assure continuance of service.

च्च, च्च. et tu रॉबिनहूड. अहो तुम्ही तर सरकारी कामकाजातले तज्ञ. त्यांना समजते, पण कायदा बदलायला कितीतरी वेळ लागतो. तो बदलल्याशिवाय कर्मचार्‍याचे हात बांधलेलेच. आता ते मोकळे कसे करायचे हे तुम्हाला माहित असायला हवे. भारतात कामे म्हणजे काय द्या नी च होतात!

मामी, सर्व बॅन्का, मोबाईल कम्पन्या, वाहन कम्पन्या त्यांचे खाते, वाहन घेईपर्यन्त अत्यन्त गोड बोलतात. नन्तर त्यांची चाल दाखवायला सुरुवात करतात. त्यामुळे स्टेट बँक तशीच, अन महाबँक तशीच. आय सी आय सी आय ही अत्यंत क्रिमिनल नेचरचीबँक आहे तिच्याशी सम्पर्क टाळाच. त्यातली त्यात एच डी एफ सी बरी वाटली.

आय सी आय सी आय ही अत्यंत क्रिमिनल नेचरचीबँक आहे तिच्याशी सम्पर्क टाळाच>> बरोबर. अनुमोदन.
एस बी आय बेस्ट किन्वा स्टॅनचार्ट.

बॅन्क करमचारी तरी अजुन लाच न घेता काम करतात. ( फक्त वैयक्तिक अनुभव)

>>>जरी पेपल डेबिट कार्ड घेत असले तरी.. SBI वैगेरे ची डेबिट कार्ड्स चालत नाहीत

धन्यवाद केदार. अरे इतकी उलट सुलट डिस्कशन्स वाचली होती नेटवर, काहीजण म्हणे अजिबात होत नाही तर काहीजण म्हणतात ते SBI Yuva visa card लिंक करता येतं म्हणे! maestro logo असलेलं कार्ड नाही करता येत वगैरे

आणि पेपालला वेळ कुठाय उत्तरं द्यायला!

आणि पेपालला वेळ कुठाय उत्तरं द्यायला! >> प्रत्यक्ष ट्राय करुन बघा स्वस्त काहितरी विकत घेऊन. भारतातले माहित नाही पण अमेरिकेत तरी डेबीट कार्ड आणी क्रेडीट कार्डाचे क्रमांक सारखेच असतात (१६ आकडी).

<<सिटीबँक पण अतिशय वाईट,criminal आहे..>>
काहो? criminal??
अहो त्याचे सि ई ओ आमच्या नागपूरचे महाराष्ट्रीयच आहेत. ते criminal गोष्टी कसे करतील?
नि त्यांना भला मोठा बेल आउट कसा मिळाला?
मी तर तिथे अकाऊंट उघडणार होतो, म्हणजे दुदैवाने भारतात जाण्याची वेळ आली तर इथे ठेवलेले पैसे तिथून काढता येतील.

झक्कीजी..
>>>>म्हणजे दुदैवाने भारतात जाण्याची >>>>./

अमेरिकेतुन भारतात जाणारे दुर्दैवी असतात असे तुम्हाला म्हणायचे आहे का? Happy
Just kidding

झक्कीजी..
>>>>म्हणजे दुदैवाने भारतात जाण्याची >>>>./

अमेरिकेतुन भारतात जाणारे दुर्दैवी असतात असे तुम्हाला म्हणायचे आहे का>> राहुल्दा तुमास माहीत नाही का त्याना भारत नाही आवड्त. जाउ दे ना.

सिटीबँक पण अतिशय वाईट,criminal आहे..>> क्रिमिनल माहित नाही पण त्यान्चा सगळा संसार दोलायमान आहे. फोल्ड होता होता वाचलेली आहे. आपले मेहनतीचे पैसे तिथे न ठेवलेले बरे. मला स्टेन्चार्ट
चा अनुभव चान्गला आहे. फक्त एकदा त्यानी मला भेटायला एक रिलेशनशिप म्यानेजर बाइ पाठ्वली. तिने सर्व चौकशी केली. मग २ दिवसानी मी एका मीटिन्ग मधे असताना फोन करून वार्शिक २.५ लाख प्रीमीयम
चा विमा उतरवायचा सल्ला दिला. का तर मी मेल्यावर मुलीला पैसे मिळतील. मला एव्ढी कमिट मेन्ट नको होती जमेल तसे पैसे साठ्वायचे होते. तर मागे लाग लाग लागली. शेवटी प्रीमीयम कमी करून ३५ - ५० हजार वर आणला. मग मी मला प्लिज पुश करू नका असे सान्गुन रागारागात ब्यान्केतून निघुन आले. डोंबलाची रीलेशनशिप. दे आर आफ्टर युअर मनी. आपण बायकांशी मन मोकळे करून बोलतो त्याचा ते फायदा घेतात.

या वर्शी अमेरीकेत १२४ ब्यान्का मरून पड्ल्यात. पैसे ठेवण्या पुर्वी ही लिन्क जरूर वाचा.

http://money.cnn.com/2009/11/20/news/economy/bank_failure/

>>>>म्हणजे दुदैवाने भारतात जाण्याची >>>>./
अमेरिकेतुन भारतात जाणारे दुर्दैवी असतात असे तुम्हाला म्हणायचे आहे का?
---- अहो म्हणजे भारताच्या दुदैवाने... असे त्यांना म्हणायचे आहे.

आपल्या भारतीय (nationalised) बँका झकपक नसल्या तरी hidden charges वगैरे प्रकार नसतात.
हां त्यांच्या काही मर्यादा असतील पण मंदीच्या काळात देखील त्यांचा performance फार चांगला आहे.
अमेरीकेत वगैरे मिळणार्या बेल आउट पॅकेजविशयी हेच सांगता येईल की this is nothing but privatisation of profits and nationalisation of losses.
The performance of indian nationalised banks in recession is excellent because these
banks are insulated and the credit for that goes to our late Prime Minister Mrs. Indira Gandhi,
and bankmen union like ALL INDIA BANK EMPLOYEES ASSOCIATION which is still fighting against privatisation.

अमृता , विप्रा, आणि सगळ्यांचे आभार Happy

अमेरिकेतुन HDFC NRE Account ऊघडण सोप न वाटल्याने शेवटि ICICI चा सहारा घेतला. HDFC Bank ची अमेरिकेतुन NRE Account उघडायच असल्यास Phone, Cutomer Care सेवा नाही Sad हे खुपच अडचणीच वाटल म्हणुन तीथे खात उघडल आल नाही Sad ..... शीवाय ICIC च जाळ पण जास्त आहे भारतात HDFC पेक्षा ...

ICIC ला कागद पाठवली आहेत आता किती दिवसात खात उघडेल वाट बघतेय Sad

NY SBI ला फोन करुन करुन थकले .... कुणी फोन ऊचलतच नाही Sad ... SBI म्हणजे खरच Babu Attitude, No Customer Service nothing Sad

CiTI bank Customer Care Representatives कडुन बरेच फॉलो अप कॉल आले, आपल्या मा. बो. करांचे CITI बद्दल अनुभव वाचुन CITI नको अस ठरवल Happy

Pages