अफ़लातुन चित्रकार Salvador Dali आणि त्याची विलक्षण Paintings भाग १

Submitted by मुग्धमयुर on 14 December, 2013 - 09:10

मित्रांनो !!!

सर्वप्रथम एक गोष्ट नम्रपणे नमुद करतो की मी चित्रकला या विषयातील तझ नाही केवळ एक साधा रसिक आहे. त्यामुळे या लेखनात उणिवा-चुका असु शकतील, जाणकारांनी त्या भरुन-सुधारुन दिल्यास माझ्या व रसिकांच्या आकलन-आस्वादात वाढ होइल....!

The first man to compare the cheeks of a young woman to a rose was
Obviously a Poet; the first to repeat it was possibly an idiot. - Salvador Dali

दाली चे बालपण-कुटुंब-जन्मभुमी

साल्वादोर दाली या महान प्रतिभाशाली परंतु अत्यंत विक्षीप्त अशा चित्रकाराचा जन्म ११ मे १९०४ ला फ़िगारेस या स्पेन मधील एका छोट्याश्या निसर्गरम्य शहरात झाला. या घटनेला दाली मोठा झाल्यावर “ The most significant event “ असे म्हणत असे आणि वर असेही म्हणत असे की “ मला जन्माला येतांनाच्या वेदना अजुनही स्प्ष्ट आठवतात ”. याचे वडील अतिशय नास्तिक आणि आई प्रचंड धार्मीक असा पेच आयुष्याच्या सुरुवातीलाच आला.या जोडप्याच पहिल बाळ २२ महीन्याचं असतांनाच दगावल्याने या दुसर्या् बाळाचे दालीचे अति लाड झाले.त्याची प्रत्येक हौस पुर्ण केली जात असे.त्याला लहानपणी वडील चार्ली चॅप्लिन चे सिनेमे बघायला नेत असत.त्याला एक बहीण ही झाली तीचे नाव अँना मारीया या आपल्या बहीणीची अनेक सुंदर चित्रे त्याने नंतर काढली. दालीला मुंग्या आणि नाकतोडा यांची फ़ारच भीती बालपणी वाटत असे. त्याच्या अनेक पेंटींग्ज मधुन हे भयाच नकारात्मक प्रतिक म्हणुन वारंवार येतं. याच कारण एकदा कुठुनस एक जखमी वटवाघुळ छोट्या दाली ने आणुन बादली त ठेवल, काही दिवस त्याला जगविण्याचा आटोकाट प्रयत्न केला अन एके दीवशी बघतो तर त्याच्या डोळ्यादेखत मुंग्यानी ते जीवंत वटवाघुळ आख्ख फ़स्त केलं. ही घटना कदाचित त्याच्या मनावर मोठा परीणाम करुन गेली असावी.दालीचे आपल्या आई वर अतोनात प्रेम होते तो तिला “Honey in the family ” म्हणत असे. हे फ़िगारेस ज्या प्रदेशात होत त्याचं नाव कॅटोलोनीया आणि त्याची राजधानी बार्सीलोना, हे एक अनेक सुंदर कॅथेड्रल्स असलेल शहर सर्व कलांचं माहेरघर च होत.दालीचे वडील त्याला नेहमी मौजमजे साठी बार्सीलोना ला नेत असत तेथे ते नेहमी “Four Cats” नावाच्या कॅफ़े त जात असत, या कॅफ़ेत पिकासो, मिरो इ.पेंटर्स तसेच लेखक, बुदधीजीवी कायम पडीक असत. कॅटोलोनीया व बार्सीलोना ला दाली कधीही विसरु शकला नाही.पुढे एकदा कॅटोलोनीया स्पेन पासुन वेगळा करावा या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने दालीने महीनाभर जेल ची हवा ही खाल्ली.

कॅडाक्वेस गांव- पिचोट फ़ॅमीली –दाली-लीला (चाळे)

दाली ला लहानपणापासुन च सर्वांचे स्वत:कडे लक्ष वेधुन घ्यायला फ़ार आवडत असे.त्यासाठी तो काय वाटेल ते प्रकार करीत असे कुठे आईची पावडर तोंडाला फ़ास, कुठे राजा चा ड्रेस घालुन फ़िर इ. आता थोडा मोठा झाल्यावर तर हे प्रकार भलतेच वाढले. केस लांब च लांब वाढविणे, एक छोटी स्टीक कायम घेउन फ़िरणे ( ही सवय शेवट पर्यंत टीकली). चित्र काढायला लहानपणीच सुरुवात झाली होती. वडिलांनी कौतुकाने मुलाला तेव्हाच्या मोठ्या चित्रकारांची चित्रे असलेले “ Gowans art books ” चे सर्व महागडे ५२ भाग आणुन दिले होते. दाली दिवसभर ही चित्रे बघत असे. दालीचे सुरुवातीचे चित्र विषय म्हणजे शेत, फ़ॅक्टरीची चिंमणी असे साधेसुधे होते. लहानणी सुटीच्या दीवसांत दाली फ़ॅमिली च फ़िरायला जायच आवडत ठिकाण म्हणजे कॅडाक्वेस हे समुद्र कीनारी वसलेल एक सुंदर गांव. इथे त्यांची ठरलेली भेट म्हणजे “पिचोट फ़ँमिली” च घर “एस सॉर्टेल”. हे दालीच्या वडीलांच मित्र होते.यांच्या फ़ॅमिली त एक रॅमन पिचोट होता. हा एक चांगला इम्प्रेशनिस्ट चित्रकार होता व पिकासो वगैरेंशी याची दोस्ती होती. पिकासोने या घरात राहुन काही चित्रे काढली होती. या अतिशय निसर्गरम्य गावात दाली आणि अँना समुद्र किनारयावर बागडत असत. तेथील खडकांचे निरीक्षण करत असत. जे पुढे जाउन त्याच्या चित्रांचा एक विषय बनले. तर या रॅमन ची चित्रे घरभर टांगलेली असत. दाली भान हरपुन ही बघत बसे. ही पिचोट फ़ॅमीली म्हणजे एक से एक आर्टीस्ट लोक असलेली होती कोणी व्हायोलिनीस्ट कोणी ऑपेरा सिंगर इ..यांच्या बरोबर व्यतीत केलेला काळ म्हणजे दाली साठी पर्वणी च होती. त्याला चित्रकलेतील अनेक नव्या गोष्टी रॅमन कडुन कळल्या. ते सुंदर कॅड्क्वेस गाव आणि पिचोट फ़ॅमिली त्याच्या बालपणीचा सुंदर ठेवा होता.

शिक्षणाची सुरुवात- पहिला गुरु- पहिला स्ट्रोक –पहिल कौतुकं

१९१६ मध्ये दाली ला फ़िगारेस च्या म्युनिसीपल स्कुल ऑफ़ आर्ट मध्ये टाकले. इथे त्याला एक चांगला गुरु मिळाला त्याचे नाव जुऑन न्युनेझ फ़र्नांडीझ. न्युनेझ ने दाली ची असामान्य प्रतिभा अचुक हेरली होती. तो दालीला घरी बोलवित असे आणि रॅंम्ब्रॉट च्या स्ट्रोक्स ची शैली व इतर चित्रकलेतील बरेच काही शिकवित असे.दाली वर न्युनेझ चा मोठा प्रभाव पडला दाली च्या नुसार न्युनेझ ने त्याच्या मनामध्ये चित्रकले साठी एक महत्वाकांक्षा जागविली होती. दाली अखेरपर्यंत या गुरुविषयी कृतज्ञ राहीला. १९१८ मध्ये फ़िगारेस च्या लोकल आर्ट शो मध्ये दाली ने २ पेंटींग्ज लावली होती. यावर तेव्हाच्या “ एम्पोरडीया फ़ेडरल” या पेपर ने त्याची दखल घेत म्हटल होत,” This is a man who can feel light ” आणी आम्ही असा prophetically दावा करतो की हा भविष्यात एक महान चित्रकार बनेल”( पहील्या शो पासुन हे कौतुक ! )

Royal academy चे दिवस आणि Lorca बरोबर चा दोस्ताना

दालीला पुढे वडीलांनी “ Royal academy of San Fernando-Madrid ” या अत्यंत प्रतीष्ठीत Art School मध्ये टाकले. या Academy त Guest Lecturer म्हणुन आइनस्टाइन, एच.जी.वेल्स, इकॉनॉमीस्ट केन्स इ. असे दिग्ग्ज येत यावरुन तीच्या दर्जाचा अंदाज यावा.इथे दालीच्या प्रतिभेला भरपुर खतपाणी मीळाल. इथे त्याला अनेक नविन मित्र मिळाले. त्यात खास दोस्त म्हणजे “Federico Garcia Lorca” हा पुढे एक मोठा कवि बनला. दाली पेक्षा ६ वर्षांनी मोठा असलेला लोर्का हा “Gay” होता.या दोघांची फ़ार जमायची. या दोघांना तेव्हाच्या युरोपियन मध्यमवर्गीयां च्या मेन्टॅलीटी चा आर्टीस्टीक टेस्ट चा फ़ार तिटकारा वाटायचा. त्यांच्या ग्रुप ने अशांच एक नाव ठेवल होत putrefactos. पुढील काळात दाली ने अशा putrefactos ची खिल्ली उडविणारी अनेक चित्रे काढली. लोर्का ही या putrefactos च्या विरोधात दणकुन कविता लीहीत असे, यांचा रोमॅंटीसीझम त्यांना नकली वाटायचा.१९२५ च्या उन्हाळ्यात दाली ने लोर्का ला आपल्या समुद्रकीनार्‍या वरील घरी सुटी त बोलवले होते. पुढे लोर्का ने दाली वर Ode to Salvador Dali या नावाची एक कविता ही लिहीली यातील एका ओळीत तो म्हणतो ”….May stars like falcon less fists shine on you, while your painting and your life break into flower….” यांची मैत्री नंतरही टीकली पुढे मात्र नियतीने १९३६ च्या स्पेन यादवी युद्धात लोर्का ला फ़ायरींग स्कॉड पुढे उभे केले..... विरोधाभास म्हणजे ज्या जनरल फ़्रॅंको ने लोर्का ला मारले त्याला दाली ( सुरुवाती पासुन उजव्या विचारसरणी कडे झुकलेला) तरीही पाठिंबा देत असे.

लुइस ब्युन्युएल आणि पहीली टेरीफ़िक Surrealistic Film

दालीचा इथला दुसरा खास मित्र म्हणजे लुइस ब्युन्युएल (Luis Bunuel) (य़ाच एक सुंदर डार्क मुड मधील पोर्ट्रेट दाली ने काढलं आहे.) हा पुढे जाउन एक मोठा सरीयलीस्ट Film-maker बनला. हा लोर्का दाली तीन्ही धमाल करीत असत.माद्रिद च्या नाइट लाइफ़ ची मजा घेण वगैरे या काळातला दालीचा स्टंट म्हणजे दारुच्या ग्लासात नोट टाकायची मग ती थोडी विरघळली की मग दारु गट्ट्म..तर या ब्युन्युएल ने दाली बरोबर मिळुन एक १७ मिनीटांची टेरीफ़ीक सरीयलीस्टक फ़िल्म बनविली जीचे नाव होते An Andalusian dog . जरा यातले सीन बघा, एका माणसाच्या हातातुन मुंग्या बाहेर येताहेत.......एका पियानोवर मेलेल गाढव आहे........ आणि हाइट म्हणजे एका बाईचा डोळा एका रेझरब्लेड ने चिरला जात आहे.....या सीनसाठी प्रत्यक्ष एका बैलाच्या डोळ्याचा क्लोज शॉट चा वापर त्यांनी हा सीन शुट करतांना केला होता. या फ़िल्म मुळे दाली सरीयलीस्टांच्या वर्तुळात चांगला स्थापीत झाला. ब्युन्युएल हा सरीयलीस्ट सिनेमा चा पायोनियर च होता. पुढे दोघांनी मिळुन “Golden Age” हा सिनेमा बनविला मात्र या वेळेस दाली च आणि ब्युन्युएल च बिनसल कारण अस होत की यात येशु ख्रिस्ता च जे चित्रण होत ते Marquis De Sade ( हा तोच ज्याच्या नावावरुन Sadism हा इंग्रजी शब्द बनला याच्यावर वसंत डहाके नी एक कविता ही लीहीलेली आहे आणि जी.ए.कुलकर्णीं ना याचे फ़ार आकर्षण होते ते सॅडे ला त्यांच्या पत्रांत फ़ार discuss करतात )याच्या लेखनावर आधारीत होत. जे अत्यंत भयंकर उग्र अस होत जे काही दालीला (आईचा प्रभाव असावा) आवडल नाही.आणि ब्युन्युएल म्हणजे अतीरेकी नास्तीक आणि कॅथॉलीक धर्माचा द्वेष्टा होता. पुढे काही दोघांनी मिळुन काम केल नाही.पुढे दाली वर ही De Sade चा प्रभाव पडला पण ती पुढची गोष्ट.या ब्युन्युएल ला आयुष्याच्या अखेरच्या काळात विचारल होत की तो अजुनही नास्तिक आहे का? तेव्हा याने दिलेल उत्तर प्रसिध्द आहे ते अस “ Thank God ! I am still an atheist! “ याच्या अखेरच्या वर्षांत याला बर्याळच वर्षांच्या गॅप नंतर दाली ने एक टेलीग्राम पाठविला आणि पार्टनरशीप मध्ये एक सीनेमा बनविण्या ची ऑफ़र दीली त्यावर ब्युन्युएल उत्तरात लिहीतो. Great idea little demon! But I withdrew from cinema 5 years ago. A Pity!!

***संपादीत
प्रताधिकाराचा भंग होत असल्याअने चित्रे काढून टाकली आहेत.
-अ‍ॅडमीन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चित्रे कुठून घेतली ते तरी लिहा .नाहितर चित्रे काढून टाका आणि पुढील वाचनासाठी संदर्भ ग्रंथांची नावे द्या . फक्त लेख चालेल .

लेख आवडला. छान ओळख करून दिलीत.

अशा जगप्रसिद्ध चित्रांबाबतच्या प्रताधिकारांबाबत मायबोलीचे नियम काय आहेत? शिवाय या चित्रांच्या प्रताधिकारांवर काही मर्यादा असते का? उदा. १९३६ सालचं चित्र एव्हाना प्रताधिकार मुक्त झालेलं असू शकतं का? हे कोठे कळेल?

वर Srd यांनी म्हणल्याप्रमाणे जालावरच्या लिंका देता येतीलच. पण नाहीतर ' आंतरजालावरून साभार' असं लिहून चालतं का? जामच कन्फ्यूजन आहे. कृपया यानिमित्ताने खुलासा करावा.

'आंतरजालावरून साभार' असं लिहिलेलं चालत नाही. रीतसर परवानगी लागते.
वर या चित्रांच्या प्रताधिकाराच्या मालकीबाबत लिंक दिली आहे.
http://www.salvador-dali.org/fundacio/en_drets.html इथे अधिक माहिती आहे.

चित्रकार जगप्रसिद्ध असो किंवा अप्रसिद्ध, प्रताधिकाराचे नियम आणि त्याबद्दल मायबोलीचं धोरण यांत तफावत नाही. Happy

ओके. माझं पोस्ट लिहून होईपर्यंत तुमची वरची पोस्ट आली. ती मी नंतर पाहिली.

खुलाश्याबद्दल धन्यवाद चिनूक्स.

लिंक कुठेही दिलेली चालते. थेट चित्र दिलेलं चालत नाही. फेसबुकालाही प्रताधिकार कायदा लागू होतो.
इथे लेखात अधिकृत लिंका दिल्यास हरकत नाही.

मला पण लेख बघून पहिले हीच शंका आली होती. शिवाय असे विकिपी डिया भाषांतर टाइप लेख इथे देउन काय उपयोग?

मला ह्या चित्रकाराचे काम फार आवडते. त्या बद्दल लेखकांशी सहमत.

जीवसंरक्षक औषधे पंधरा वर्षांनंतर हक्कमुक्त होतात यावरून थोडासा गैरसमज झाला असेल .

अगदी तोंडी पैज लावली तरी ती पूर्ण करायची ही वृत्ती परदेशात आहे याउलट लेखी दिलेल्या अधिकारांबद्दल नंतर कार्यान्वित करतांना टाळाटाळ करण्यासाठी दोन हात मागे ठेऊन विरामात तासनतास उभे राहून वितंडवाद घालण्यासाठी आम्ही दक्ष आहोत .