Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29
झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काय ते ध्रुव तार्याचं नाटक
काय ते ध्रुव तार्याचं नाटक सुरू होतं काल
अतिच जरा.
आणि चित्रकला, भूगोल.. या सर्वां विषयी जे काही ज्ञान आहे ते फक्त या मेघनीला. बाकी सगळे आडाणी ढेंगेच जणू
बाप रे एव्हढ्या मोठ्या देशात
बाप रे एव्हढ्या मोठ्या देशात निवडणुका होऊन अभूतपूर्व असे सत्तांतर झाले तरी मेघनाला आदे की आन यातील एकाची निवड करता येवू नये? कठीण आहे!
बाप रे एव्हढ्या मोठ्या देशात
बाप रे एव्हढ्या मोठ्या देशात निवडणुका होऊन अभूतपूर्व असे सत्तांतर झाले तरी मेघनाला आदे की आन यातील एकाची निवड करता येवू नये? कठीण आहे! >>>>> अहो सत्तांतर करायला भारतातले काही कोटी लोक एकत्र होते हो! इथे ही एकटीच...
ते ही बरोबरच आहे!
ते ही बरोबरच आहे!
दक्षे आणि ते ध्रुवताऱ्याचे
दक्षे आणि ते ध्रुवताऱ्याचे नाटक मेघनाची सासू आणि नवरा किती कौतुकाने बघत होते मी channel बदलले पार डोक्यात गेले आमची मेघना कित्ती हुश्शार.
सुजा लगोरीमध्ये चैताली गुप्ते आहे.
लगोरी धागा सुरु केला
लगोरी धागा सुरु केला आहे.
http://www.maayboli.com/node/49048
बाप रे एव्हढ्या मोठ्या देशात
बाप रे एव्हढ्या मोठ्या देशात निवडणुका होऊन अभूतपूर्व असे सत्तांतर झाले तरी मेघनाला आदे की आन यातील एकाची निवड करता येवू नये? कठीण आहे!>>>>>> हे पण "तू तिथे मी " च्या वळणावरच आहे… दोन वर्षानंतर अचानक जाग येईल आणि दोघांना महाबळेश्वर ला हनिमून ला पाठवतील.
तू बघत राहा …। हि हि हि
हो ग अंजू .बरोबर .बघणार
हो ग अंजू .बरोबर .बघणार आत्ता . अधून मधून बघत होते
तु तिथे मी सारखी इथेदेखिल
तु तिथे मी सारखी इथेदेखिल काही वर्षांची लिप घेतली तरी मेघना आदित्य देसाईच्या घरी राहुनच आदु आदु करत बसलेली दिसेल.
हा बाफ उघडला की सानीचा पहिलाच
हा बाफ उघडला की सानीचा पहिलाच प्रतीसाद लगेच वाचायला मिळतो, पण आता जाणवत की मेघना नावाच भेदरलेले कोकरु मोठी बकरी बनलय, तरी बे बे नीट करत नाहीये.

>>>
रच्याकने मला असं वाटतय की फायनली आदे आणि मेदे नीट रहातील आणि आदुचं लग्न त्यी शेजारणीशी (जिचा नवरा सैन्यात आहे. तो मरेल... मग या मेदेला 'नवरा' असणं किती गरजेचं असतं याची (:अओ: ) जाणीव होईल आणि मग ती आदेवर प्रेम आहे हे कबुल करुन टाकेल) होईल आणि मग आदे, आन, मेदे तिघं मिळून देसाईवाडीत सुखाने संसार करतील
सत्यजित मुधोळकर, मी नीट ऐकलं, ते झिंगल तानानीनी रे ताना नाना ना असं आहे
तिला आदे आवडत आहे तसेच तिला
तिला आदे आवडत आहे तसेच तिला आदु कोठे आहे-काय करतो याचे काहीही पडलेले नाही...तरीही वेळ घेतेय....
तु तिथे मी सारखी इथेदेखिल काही वर्षांची लिप घेतली तरी मेघना आदित्य देसाईच्या घरी राहुनच आदु आदु करत बसलेली दिसेल.>>>
आणि मग त्यांची मुलं तिला विचारतील....'कधी निर्णय घेणार?'
रिया, कशाला गं मारतेस त्या
रिया, कशाला गं मारतेस त्या सैन्यातल्या माणसाला? पुन्हा तिच्या पुनर्वसनाची (?) जबाबदारी देसाई वाडीवर येऊन मालिका आणखी लांबेल ना!
सोनाली, तिला आदे आवडत आहे तसेच तिला आदु कोठे आहे-काय करतो याचे काहीही पडलेले नाही...तरीही वेळ घेतेय....
असं नाही म्हणायचं गं, लेखक मालिकेत पाणी घालतो आहे असे म्हणायचं!
जर ती मेघना आदे कि आन हेच ठरवु शकत नाही तर मुलांचा प्रश्नच येत नाही. आदे सदैव रडका चेहरा घेऊन बसणार आहे.
जर आदे मेघनाच्या आईवडिलांचा सांभाळ करायला तयार आहे तर मेघनाने सरळ त्याला सांगायचं ना कि मी तर तुला सोडुन माझ्या आदुकडे जाणार आहे. मग तु कशाला माझ्या आईवडिलांची काळजी करतोस, माझा आदु घेईल ना माझ्या आईवडिलांची काळजी. तु जर माझ्या आईवडिलांची काळजी घेणार असशिल तर आत्ता जाते मी माझ्या आदुकडे. मी माझ्या आदुकडे गेल्यावर दुसरे लग्न करायला तु तुझ्यासाठी दुसरी मुलगी शोध.
बाबाजी फोटोत गेल्याशिवाय हि मालिका पुढे सरकणे अशक्य आहे.
सारिका, आम्ही सत्य सांगतो
सारिका, आम्ही सत्य सांगतो
ताणत राहू रेशीमगाठी
ताणत राहू रेशीमगाठी
बेफिकीर.... ताणत राहू
ताणत राहू रेशीमगाठी >>>>
ना तोडू ना जोडू ना संपवू ,
त्रिशंकू अवस्थेत टांगून ठेऊ,
झी मालिकांची परंपरा चालवू,
मा.बो. धाग्यावरी गंमत पाहू,
अखंड अनंत....ताणत राहू रेशीमगाठी
रच्याकने....आदे-मेदेंची
रच्याकने....आदे-मेदेंची घिसीपिटी कोर्टशिप पाहता 'यादें' मधल्या सुभाष घईंसारखं दिग्दर्शकाने दर्शन देऊन ' ये तो होगा जी, ये तो होगा ' असं म्हणायचं राहिलं आहे फक्त....
हाहाहा! या सगळ्या प्रतिक्रिया
हाहाहा! या सगळ्या प्रतिक्रिया तो मालिकेचा लेखक वाचेल तर वाचेल!
ताणत राहू रेशीमगाठी >>>
ताणत राहू रेशीमगाठी >>>
ताणत राहू रेशीमगाठी>> हम दिल
ताणत राहू रेशीमगाठी>>
हम दिल दे चुके सनम कसा २ तासात संपवला होता. त्याचे काहीशे भाग करायचे म्हणजे येर्यागबाळ्याचे काम नाही.
अत्यंत भंगार सिरियल. आता ही
अत्यंत भंगार सिरियल. आता ही मेघनी त्या आदित्यच्या प्रेमात पडायला लागली आहे.
रच्याकने मला असं वाटतय की
रच्याकने मला असं वाटतय की फायनली आदे आणि मेदे नीट रहातील आणि आदुचं लग्न त्यी शेजारणीशी (जिचा नवरा सैन्यात आहे. तो मरेल... मग या मेदेला 'नवरा' असणं किती गरजेचं असतं याची (अ ओ, आता काय करायचं ) जाणीव होईल आणि मग ती आदेवर प्रेम आहे हे कबुल करुन टाकेल) होईल आणि मग आदे, आन, मेदे तिघं मिळून देसाईवाडीत सुखाने संसार करतील फिदीफिदी
सत्यजित मुधोळकर, मी नीट ऐकलं, ते झिंगल तानानीनी रे ताना नाना ना असं आहे फिदीफिदी
हे वाक्य वाचून डोळ्यापुढे चित्र उभ राहील
:खोखो::D

एका बाजूला आदे एका बाजूला आन आणि मधे मेघना दोघांचा हात धरून त्यांच्या मधे उभी आहे।
आणि माई अतिशय कौतुकाने त्या तिघांकडे बघतायेत
मनरंग आणि मागे तानानीनी नी
मनरंग आणि मागे तानानीनी नी तानानानाना वाजतय हे राहिलंच की
आज काय ती झुरळ बघून आरडाओरड !
आज काय ती झुरळ बघून आरडाओरड ! तो सीन कशाबद्दल होता काहीच कळलं नाही.
ताणत राहू रेशीमगाठी>> माई
ताणत राहू रेशीमगाठी>>
माई अतिशय कौतुकाने त्या तिघांकडे बघतायेत >>
आज काय ती झुरळ बघून आरडाओरड !
आज काय ती झुरळ बघून आरडाओरड ! तो सीन कशाबद्दल होता काहीच कळलं नाही.>>>>>>>>>>> फुग्याचा सीन आणि रॉकेट प्रकरण का घुसवलेलं ते ही कळलं नाही....वेळ काढायला होते हे दोन्ही सीन्स
चला सध्या बघत नाहीये ते बरं
चला सध्या बघत नाहीये ते बरं आहे.
ते झुरळ दिसल्यानंतर चा
ते झुरळ दिसल्यानंतर चा आरडओरडा तर फुल तू पकाऊ होता

एवढ काय झुरळाला घाबरायचंय
आणि माई त्या झुरळाला जाओ जाओ
आणि माई त्या झुरळाला जाओ जाओ अस हिंदीत बोलत होत्या
गिरिश ओक पेपरवर झुरळ घेऊन
गिरिश ओक पेपरवर झुरळ घेऊन गाणं म्हणत जातात तेव्हाच हसू फुटलं ..
आज मेघनाने नवीन(असावा कदाचित)
आज मेघनाने नवीन(असावा कदाचित) टॉप घातला होता.आगदि बेड्शीट च शिवल्यसारखा वाटत होता.त्या पेक्षा तिचा आइ चा साड्या बर्या वाटतात.
Pages