उपाय सुचवा!

Submitted by मी_आर्या on 11 December, 2013 - 01:09

आजकाल घरात नकोसे झालेले, रस्त्यावर विमनस्क अवस्थेत फिरणारे,कुठेतरी वेळ घालवायचा म्हणुन घालवणारे वृद्ध दिसले की मन विषण्ण होते.
आजचीच गोष्ट. शेजारच्या कॉलनीतल्या एक विधवा आज्जी(वय साधारण ६५-६७) आमच्या आईकडे नेहमी येत असतात. त्या आल्या होत्या. ५ मिनिट का असेना, कधी कधी उभ्या उभ्या आईला भेटुन जातात. आईजवळ मन भडाभडा मन मोकळं करतात. सून कशी त्रास देते हे आईला ऐकवतात. आज तर "मला आता मरायचय, जगुन काय उपयोग!! असं म्हणुन रडायलाच सुरवात केली. त्या कधीही आमच्यासमोर रडत नाहीत, किंवा आम्हाला गार्‍हाणे सांगत नाही. आई समवयस्क असल्याने त्यांना फक्त तिच्याजवळच त्यांचं मन मोकळं करायचं असतं. त्यांना ऐकु कमी येते पण जेवढं कानावर पडेल तेवढं ऐकुन समाधान मानतात. आजचं कारण तसं मोठं नव्हतं. काल रात्री त्या ८.३०-९ ला घरी गेल्या तर घराला कुलुप. मग या थंडीत कुडकुडत जीन्यात बसुन राहिल्या. त्यांना भुक खुप लागलेली. पण सांगणार कुणाला? खुप वेळाने नातसुन दिसली तर म्हणे सून्-मुलगा घरातच होते. पण नातु- नातसुन रात्री बाहेर जेवायला जाणार होते आणि उशीर होईल म्हणुन बाहेरुन लॉक केलं होतं. यांना माहितच नाही. या इतका वेळ बाहेर बसुन होत्या, आतुन नातीचा/ सुनेचा आवाजही आला असेल तर केवळ 'ऐकायला कमी' येते यामुळे हा प्रकार झाला. आजही सकाळी दोघींनी (सून्-नातसून) गरमागरम नाष्टा केला. व आज्जींना अगदी खालची चिकट झालेली चपाती दिली. बिचार्‍या !तेवढीच चहाबरोबर खाऊन आल्या होत्या. गॅसवर गरम करुन खाण्याइतका हक्क नाही. सून लगेच ओरडते गॅस वाया घालवतात म्हणुन.
त्यांना दोन मुली व एक मुलगा. दोघी मुलींची लग्न झालेली असुन त्या सासरी सुखात आहेत. सून अतिशय कजाग, कर्कश आवाजाची. घरात भांडण कायम चाललेली. हमरीतुमरीवर येणारी सून. अगदी नवर्‍याचीही कॉलर पकडते असं त्या म्हणतात. त्यातल्या त्यात नातसून बरीये. कधी मधी ती सासुच्या नकळत या आज्जींना गरम गरम नाष्टा देते. तेव्हा कौतुकाने आम्हाला सांगतात. पण तीही आपल्या सासुच्या धाकात रहाते. आजी लहानपणी ईंग्लीश मेडीयम मधे ४-५वी शिकल्या होत्या असं ऐकलय.
नवर्याने रिटायरमेंटचे पैसे मुलाला देवुन टाकले. त्यात त्या मुलाने स्वतःच्या नावावर एक वन बी एच के फ्लॅट घेतला. आता आज्जींना नातसून सुद्धा आहे. त्यामुळे आज्जी बिचार्या छोट्याश्या किचन मधे झोपतात. आजींनी त्यांचं १२ तोळे सोनं नातुचं लग्न झालं तेव्हा नातसुनेच्या अंगावर घालण्यासाठी मुलाला देवुन टाकले. इतर काही अंगावरचं सोनं होतं. मोहनमाळ, कानातले इ. वर काढुन ठेवल्याने व वयोमानामुळे विसरल्याने घरातल्या घरात हरवले .मुलाला, नातुला चांगली नोकरी आहे. आजींना नवर्‍याचं पेन्शन सुमारे ५०००/- मिळतं त्यातले त्या मुलाला ३०००/- देतात आणि उरलेल्या २०००/- मधे त्यांची औषधं, कधी मुलींना/ नातवंडांना काही देण्याघेण्यासाठी यासाठी खर्च होतात.
आज्जी हडकुळ्या असल्या तरी बर्‍यापैकी काटक आहेत अजुन. घरात अडचण होऊ नये म्हणुन दिवसभर बाहेर घालवतात. कितीही वेळा जीने चढ -उतर करणं, गल्लीतुन कितीतरी चकरा मारणं चालु असतं. घरी स्वत:ची साडी स्वत: धुतात. नाश्ट्याची भांडी घासुन मग त्या चौकातल्या गणपतीमंदीरात जाण्यासाठी रोज सकाळी ९लाच निघतात. दर्शन घेउन, तिथे मंदीरातच बसणार्‍या एका वृद्धेला (तिची सग्ळी इस्टेट मुलगी-जावयाने घेतली आहे आणि उलट तीलाच घराच्या बाहेर काढलय) वडा-पाव वै. स्वतःच्या पैशातुन खाऊ घालतात. मग येता येता गल्लीच्या कोपर्यावर असलेल्या खुर्च्यांवर उन्हं सहन होईस्तोवर बसायचं, आणि जेवणाच्या वेळेशी घरी जायचं. जेवण झालं की भांडी घासुन किचनमधे जरा पडतात. ४ वाजले की पुन्हा गल्लीच्या कोपर्‍यावर. मग एक एक समवयस्क महिला तिथे येतात. गप्पा-टप्पा मारतात. नंतर जातांना घरच्यांसाठी/ नातवंडांसाठी भाजी, किंवा टोस्ट ई. नेतात.
आईकडे नाष्ट्याच्या वेळेत किंवा चहा-पाणी करत असतांना आल्या तर आई लगेच त्यांनाही चहा-पराठा, किंवा नाष्टा देते. त्यांना संकोच वाटतो. पण घरी सांगायची सोय नाही. म्हणुन आम्ही 'नका आणु' म्हणतो तरीही आमच्यासाठीकधी कधी टोस्ट/ केक/ नानकटाई आणुन देतात.

असो. तर त्यांना हल्ली एक धाक बसलाय की त्यांची सून त्यांना गळा दाबुन मारुन टाकणार. खखोदेजा. पण त्या म्हणतात की कधी त्या किचनमधे पाठमोर्‍या काम करत असल्याकी त्यांच्या खांद्याला, पाठीला 'तीचा' ओझरता स्पर्श होतो. कदाचीत यांचे असे भासही असतील. त्यांच्या शेजार पाजारचे लोक, त्यांना म्हणतात की ही सुन इतकं तुम्हाल घा.पा. बोलते ती तुम्हाला मारायलाही कमी करणार नाही. तुम्ही पोलीस कंम्प्लेंट करा. लेकीही म्हणतात की 'त्यांनी' काही करु तर दे, मग आम्ही बघतोच त्यांच्याकडे!पोलीसातच नाव देउ. ई.ई. पण हे काही खरं नाही. एकदा 'काही' झाल्यावर तक्रार करुन काय फायदा?

मला त्यांच्यासाठी काय करावं हे सुचत नाही. घरच्यांना समजावणं बेकार आहे. उगाच तुम्ही कोण?आमच्या कुटुंबाच्या भानगडीत पडुन तुम्हाला काय करायचय? असं ऐकुन बोळवणुक करतील. वर घरातल्या भानगडी गल्लीत सांगते म्हणुन शेवटी आजींनाच त्रास. ते लोक इतके सुशिक्षित नाहीत, त्यामुळे समुपदेशन व्यर्थ आहे. आजींना तिथे दिवस काढायचेत. एकदा पोलीस कम्प्लेंट केली की मला नाही वाटत घरचे सुधरतील. उलट जास्त भडकतील, त्रास जास्त वाढेल. आपण काय २४ तास त्यांच्यावर नजर ठेउ शकत नाही.चार भिंतीच्या आड काय घडतय हे आपल्याला कळणार नाही.
त्यामुळे वृद्धाश्रमाचा पर्याय सोपा वाटतो. पण हे त्यांच्या घरच्यांना पचनी पडेल की नाही शंकाच आहे. ते . 'लोक काय म्हणतील','आम्हाला नावं ठेवतील'...ई.ई. एकदा घराबाहेर पाऊल टाकलं तर घरचे कधीच त्यांच्याकडे बघणार नाहीत. मधुन मधुन सुट्टीवर घरी जाऊ म्हणाल्या तर घरात घेतात की नाही ही पण शंकाच. मुली जावुन भेटुन येउ शकतात.

तुम्ही यावर काय सुचवाल?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नातसूनेशी बोला. तिला विचारा सासू खरच कजागपणे वागते की आजींना तसे वाटते. तिच्या मनात सासू बद्दल भीती असू शकते. तिला विश्वास द्या की ती जे बोलेल ते तिच्या घरी पोहोचणार नाही. आजींच्या मनातली भीती किंवा भ्रम असू शकतो हा.

पण खरच जर असं असेल तर त्यांच्या मुलींना एकदा मुलाशी नातवाशी बोलायला सांगा. सूनेला एकदा दमात घ्यायला सांगा की तू आज धडधाकट असलीस तरी तुझे पण असे दिवस येणारेत. तुम्ही फक्त आजींसाठी कान बनू शकता आणि त्यांच्या घरातल्यांना मुलाला, नातवाला, मुलींना जाणीव करून देऊ शकता.

ष्ठ शी सहमत आहे.

वाईट तर वाटलेच वाचून, पण ह्या असल्या प्रकारांमध्ये बाहेरचे लोक तोवर हस्तक्षेप करू शकत नाहीत जोवर हाती काही सबळ पुरावा आहे. म्हणजे जर एखाद्या घरातून किंचाळण्याचे वगैरे आवाज आले तर माझ्यामते आपण दार ठोठावू शकतो व कौटुंबिक हिंसाचाराविरुद्ध आवाज उठवू शकतो.

पण बरेचदा असेही असते की दुसरी बाजू ऐकल्यावर पहिली कमकुवत वाटू लागते.

अवांतर - माझे आवडते मत या निमित्ताने येथे द्यावेसे वाटत आहे.

अनेक वृद्ध माणसे जे काही सहन करत असतात तो त्यांचा खरा मृत्यू असतो व प्रत्यक्ष मृत्यू होणे ही सुटका असते. हे भोग आहेत जे भोगल्यानंतर मृत्यू आला की माणसाचा जन्म न्यूट्रल अवस्थेत संपतो.

माझे हे मत निव्वळ संस्कार, कंडिशनिंग यामुळे झालेले असणार असे मलाही वाटते, पण काही वेळा ते मला फारच पटते.

उदाहरणार्थ, मरणासन्न अवस्थेत एखाद्या वृद्धाने जर आठ वर्षे काढली व नंतर तो वारला तर त्याचा प्रत्यक्ष मृत्यू आठ वर्षे होत होता व शेवटी शरीराला आलेला मृत्यू ही त्याची त्या मृत्यूतून सुटका होती असे मला वाटते.

थोडं स्पष्टीकरण. आपण नेहमी.....अगदी नेहमी एकच बाजू पाहतो की घरातल्या वृद्धांचा मुलांकडून छळ. या गोष्टीला अगदी घरगुती गप्पांपासून ते थेट टीव्ही मालिका आणि सिनेमा अशा सगळ्याच माध्यमांत टीआरपी चांगला असल्याने तीच बाजू लावून धरली जाते. दुसरी बाजूही असू शकते हे कुणी मान्य करायलाच तयार होत नाही.

ही माणसं त्यांच्या मुलांशी कसं वागलेली आहेत, त्यांना किती त्रास दिला आहे हे बंद दाराआड आपल्याला ठाऊक नसतं. मग वयोमानपरत्वे किंवा काही कारणाने त्यांना मुलांचा आधार घ्यायची वेळ आली आणि अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही की यांच्या दुसर्‍यांकडे जाऊन चुगल्या सुरू होतात. म्हणूनच ती आजी तुझ्या आईशी बोलते, तुझ्याशी नाही. कारण तुझा वयोगट वेगळा आहे, तुम्ही लोक तिच्या समस्या समजून घ्याल याची तिला अजिबात शाश्वती नाही. अर्थात ती आजी असंच वागली असेल असं नाही, पण अशी उदाहरणे बघितली आहेत म्हणून म्हणतोय.

माझ्या अगदी जवळून पाहण्यातलं एक घर.

आजी, आजींची ४-९ शिकवण्या करणारी मुलगी, मुलीच्या दोन मुली एक नोकरी करणारी ७ वाजता घरी येणारी. दुसरी काही तरी कोर्स करनारी रात्री ९ वाजता येणारी. घर तळमजल्यावर.

आजींची मुलगी फोनला कुलुप लावून आणि घराच्या सेफ्टी दरवाजाला बाहेरून कुलूप लावून जायची. आजी बाहेर दिसणार्‍या येणार्‍या जाणार्‍या बायकांना सांगायची, बघा मला कसे बंद करून जातात, फोनला कुलूप लावून जातात.

काही काळाने ह्यमागचे कारण समजले. आजींना आजूबाजूच्या कोणालाही घरात घेऊन गप्पा मारत बसायची सवय. गप्पा मारण्यासाठी दोन वेळा दार उघडं ठेवून शेजारच्या घरी जाऊन बसल्या होत्या. शेजारच्या घराचा दरवाजा वेगळ्या दिशेला. दोन तीन वेळा सांगूनही ऐकले नाही. शेवटी सेफ्टी दरवाजाच्या आतून जितक्या गप्पा मारायच्या तितक्या मार असा पवित्रा घ्यावा लागला.

त्या आजी काही काळ वृद्धाश्रमात राहात होत्या. तिथल्या मैत्रिणींना रोज फोन करून त्यांच्याशी तासन तास गप्पा मारायच्या आणि मुलीच्या तक्रारी सांगायच्या. मला खायलाच देत नाही, वेळेवर आंघोळीला जायला देत नाही. वगैरे वगैरे. मुलीला हे महिन्याच्या शेवती कळले जेव्हा बिल जास्त आलं तिने आयटेमाइज्ड बिल मागवलं. मग फोनला कुलुप लावावं लागलं.

बाहेरून पाहाणार्‍याला काय दिसतं आणि खरं काही वेगळच असू शकतं म्हणून लिहिलं.

<<काल रात्री त्या ८.३०-९ ला घरी गेल्या तर घराला कुलुप. मग या थंडीत कुडकुडत जीन्यात बसुन राहिल्या. त्यांना भुक खुप लागलेली. पण सांगणार कुणाला? खुप वेळाने नातसुन दिसली तर म्हणे सून्-मुलगा घरातच होते. पण नातु- नातसुन रात्री बाहेर जेवायला जाणार होते आणि उशीर होईल म्हणुन बाहेरुन लॉक केलं होतं. यांना माहितच नाही. या इतका वेळ बाहेर बसुन होत्या, आतुन नातीचा/ सुनेचा आवाजही आला असेल तर केवळ 'ऐकायला कमी' येते यामुळे हा प्रकार झाला>> हे नाही पटलं घरात आजी नाही, ती कधीही येईल हे माहित असताना घराला कोण कुलुप लावेल? बहेरून कुलूप असताना आजी घरात कशी येणार?

आर्या, या गोष्टीला दुसरी बाजु असण्याच्या अनेक शक्यता आहेत.

एक उदा. सांगते.
एका ओळखीच्या सुशिक्षित कुटुंबात आज्जींना हॅल्युसिनेशन्स व्हायची. त्यांना आपल्याला मारायला कोणीतरी येतेय असे वाटायचे. एरवी त्या ओके असायच्या. काही दिवसांनी तर आपली सुन भूत आहे असे त्यांना वाटायला लागले होते. आधी त्यांचा भूताखेतावर विश्वास नव्हता. या गोष्टी त्या इतर नातेवाईकांना सतत सांगत त्यामुळे मग घरातले इतर ( मुलगा सुन ) वैतागत. त्यांना जेवायलाही व्यवस्थित देत होते , काही पथ्य होती. ती पथ्य पाळुन घरातल्या सगळ्यांचा स्वयंपाक व्हायचा. तरी नंतर आज्जी म्हणायला लागल्या की मला जेवायला शिळं देतात. यामधे घरी काम करणार्‍या कामवाल्या, आया, बाहेर भेटणारे लोक यांचे कानभरणे आणि सतत सासु सुन या विषयावर निगेटिव्ह बोलणे आहे असे आम्हाला तरी वाटले होते. पण कोणालाच काही समजावुन फायदा नव्हता. आज्जी वयोमानापरत्वे बदलणार नाहीत हे ही दिसत होते.

इथे तुम्ही सांगितलेल्या केस मधे असेच असेल असे नाही. पण काही गोष्टीमधे आज्जी स्वतःच त्रास करुन घेत असण्याची शक्यता आहे.

सून्-मुलगा घरातच होते. पण नातु- नातसुन रात्री बाहेर जेवायला जाणार होते आणि उशीर होईल म्हणुन बाहेरुन लॉक केलं होतं.>>>> घरात माणस असताना घर बाहेरुन लॉक? Uhoh

मान्य आहे बेफी आणि दुर्दैवाने माझ्या माहेरी अशी गोष्ट घडत आहे, पण तिथे केस अशी आहे की माझी मावशी मेंटली हँडिकॅप आहे, आई-बाबा आवश्यकच असेल तिथेच एकत्र जातात, पण जिथे दोघापैकी एकजण जाउन चालणार असेल तिथे कोणीतरी एकच व्यकी जाते.... पण आर्याने सांगितलेल्या केसमधली बंद दाराच्या मागची माणस मेंटली आणि फिजिकली फिट्ट आहेत.

१०९१ वर पोलिसात तक्रार करा.

(Pune Senior Citizen Helpline 1091 Pune Police, 022 2421 0683 Aadhar, 020 - 30439100 Dignity Foundation)

एक जबाबदार नागरिक ह्या नात्याने आपण तक्रार करू शकता.

मुग्धा, विषयांतर होत आहे तरीही, फक्त अपंग किंवा मनोरुग्ण असले तरच असे बाहेरून दार लावणारे आढळतात असे नव्हे तर निव्वळ लवकर झोपणार्‍यांना उठण्याचा त्रास नको वगैरे कारणांसाठीही बाहेरून दार लावून घेतले जाते. अनेकदा ही लोकांनी स्वतःची व इतरांचीही बघितलेली सोय असते. दरवेळी ते माणूसकीहीनच असते असे नव्हे. Happy

मात्र, आर्यांनी दिलेल्या कहाणीमध्ये प्रॉब्लेम असा आहे की त्या आजी कोणत्या वेळी येतील ह्याचा अंदाज ठेवून त्याप्रमाणे निरोप पोचवायला हवा होता किंवा दार आतून लावून घ्यायला हवे होते.

सर्वांना धन्स!. Happy
वल्लरीच, तुम्ही म्हणता ते करु शकते. त्यांच्या नातसुनेशी बोलु शकते.
गप्पी, सावली हे ही मान्य की दुसरी बाजु असु शकते. आज्जींचे हे 'गळा दाबणे' हे भास असु शकतील. ते त्यांच्या शेजार्‍यांशी,मुलींशी डिस्कस करुन खरं काय ते काढु शकतो.
पण इतर गोष्टींचं काय? मुलगा, नातु खुप नाही पण व्यवस्थित कमवणारे आहेत. आजी पेन्शन देतायत. घरात कामही करु लागतात. स्वत:च्या औषधांसाठी स्वतः खर्च करतात. नातवांना खाउ घेउन जातात. तरीही खायला पुरेसं न देणं, वारंवार दुर्लक्ष करणं, घरातल्या भांडणात अंगावर धावुन जाणं, दर महिन्याला पेन्शन आली की लगेच ३०००/- देणे त्यांना भाग पाडणे, नाहीतर परत भांडणं हे ही प्रकार कमी नाहीत.
मी मागे त्यांना कानाचं मशिन घेउन देणार होते. हेतु हा की त्या अजुन व्यवस्थित फिरु शकतात तर मंदिरात किर्तन, भजनला जाऊन बसतील आणि त्या निमित्ताने मनातले हे असे भितीदायक विचार जातील.
पण त्याचे उलटही परिणाम होउ शकतात ही शक्यता गृहीत धरली.
आता वाटतय एखादी साधा मोबाईल घेउन द्यावा. त्यावर घरच्यांचे स्पीड डायलवर नंबर सेट करुन द्यावे. खरं तर हे घरचेही करु शकतात्...त्यांच्याबद्द्ल काळजी असेल तर.

मला ते माणुसकीहीन आहे वगैरे वादाचे विषय बोलायचे नव्हते, रादर माझ्या तस डोक्यातही नव्हत... पण का कुणास ठाउक मला नाही पटत... अगदी माझ्या माहेरी जरी हे चालत असल तरी मला नाही पटत.... आणि का कुणास ठाउक आज मला माझा मुद्दा मांडता पण येत नाहिये.

आर्या राग नको मानुस पण मला सांग त्या आजींच्या सुनेविषयी जे (कजाग आणि कर्कश्य आवज वगैरे) लिहिल आहे ते आजींच सांगण आहे की तुला प्रत्यक्षात काही अनुभव आहे? कारण जर आजींना ऐकु कमी येत म्हणुन त्यांच्याशी बोलताना एखाद्याचा आवाज मोठा असणे स्वाभाविक आहे. माझ्या आजीलाही ऐकु येत नसे त्यामुळे आम्ही सगळेच तिच्याशी मोठ्याने बोलायचो. त्यावेळी अनेकांना अस वाटत असे की आम्ही आजीला नीट वागवत नाही... बर्‍याच जणांनी तर आम्हाला तोंडावर विचारल आहे की तुम्ही आजींवर सारखे ओरडत का असता म्हणुन... म्हणुन विचारल तुला.... रागावु नकोस हां

माझ्या पण एका मैत्रीणीच्या पाहण्यात असे घर आहे जे मुद्दाम हुन आजीला घारबाहेर ठेवतात
असे काही एकले / वाचले तर "आपण म्हतारे होऊ नये असे वाटते ":(

घरात (धडधाकट, फिट्ट माणसे असताना बाहेरुन घराला लॉक लावुन जाणे जरा डेंजरस वाटते मला. समजा घरात काही झाले, घरातल्या कोणाला मेडिकल इमर्जन्सी आली किंवा काही कारणाने आग वगैरे लागली तर हे घरातले लोक बाहेर कसे पडणार? जरी त्यांच्याकडे चावी असली तरी ती बाहेर कोणाला देणे आणि त्याने दार उघडणे हे सहजशक्य नाहीय.

बाकी घरातल्या म्हाता-यांनी उगीचच घरातल्याबद्दल बाहेरच्यांना वाट्टेल ते सांगणे मीही पाहिलेय दोन ठिकाणी. Sad हे सिनियर सिटिझन्स असे का वागतात त्यांनाच माहित.

त्या तुमच्याकडे येतात म्हणून तुम्ही त्यांना जवळचेच आहात. त्यामूळे त्यांच्या वतीने त्यांच्या घरातल्यांशी
बोलायला काहीच हरकत नाही. याचा फॉलो अप पण करावा लागेल. म्हणजे तूम्ही बोलल्यानंतर जर त्यांचा त्रास वाढला तर पोलिस तक्रार करणं ( आणि त्याचाही फॉलो अप करणं ) हे ओघाने आलेच.

धर्मादाय वृद्धाश्रमही असतात. तिथे त्यांना फार खर्च येणार नाही. घरी द्यायचे पैसे तिथे द्यायचे.
जूनी नाती अवघड झाली असतील तर नवी नाती जोडावीत. मुली तिथे भेटायला जाऊ शकतीलच. सोसायटीत कुणाच्याही घरी शुभकार्य असेल तर त्यांना मानाने घेऊन या. म्हणजे त्यांना तुटल्यासारखे वाटणार नाही.
त्यांच्या मुलाच्या घरी न का जाईनात ?

त्यांच्याकडे माणसे जोडायची कला आहे. त्यांनाही असा विचार करायला हवा.
आपल्याकडच्या वानप्रस्थाश्रमाची कल्पना परत आचरणात आणायला हवी.

आर्या म्हणते ते खरे पण असेल.:अरेरे: दुर्दैवाने हे अनूभव माझ्या जवळच्या नात्यामध्ये प्रत्यक्ष बघीतलेत. शेजारी रहाणार्‍या एका शिक्षकाने स्वतच्या आईला ( आईचे आणी त्यान्चे पटत नव्हते, सून मध्ये पडुन भान्डणे सोडवायची) ढकलुन देताना पाहीलेय. सुनेला म्हातार्‍या सासुने देवाजवळचा प्रसाद का खाल्लात म्हणून सन्तापाने थयथयाट करताना पाहीलेय. ( सुनबाई खरेदीला गेल्या होत्या, सासुला दुपारी ३ वाजता चहा दिला, नन्तर रात्री ८ वाजता देवाजवळचा प्रसाद खाल्ला म्हणून आल्यावर रागावल्या महाराणी)

आर्या तुझ्या आईलाच त्यान्च्याशी आणी त्यान्च्या मुलीन्शी मोकळपणाने बोलु दे. नातसून पण कदाचीत खरे सान्गेलच की. शान्तपणे दोन्ही बाजू बघा.

वरिल अनेकांना अनुमोदन!
आर्यातै , तुझा हा बाफ आला नाही तर मीच बाफ काढणार होते आज मला आलेल्या एका अनुभवाचा.
शनिवारी माझा पेपर संपल्यावर मी घरी आले तेंव्हा घरात कोणी नव्हतं म्हणून मी आमच्या सोसायटीतल्या एका बाकावर बसले.माझ्या शेजारी सोसायटीतल्या एक आज्जी येऊन बसल्या. माझं स्वतःचं शेजारपाजार्‍यांशी खुप कमी इंटरॅक्शन आहे. त्यामुळे अर्थातच मला त्या माहीत नव्हत्या पण आईमुळे, बहिणीमुळे त्यांना मी माहीत होते. त्यांनी बोलायला सुरुवात केली. "तू कधी आलीस केरळहुन,आता इथेच असतेस का? नोकरी बदललीस का" वगैरे बोलत होत्या. मीही उत्तर दिली. काही वेळाने म्हणाल्या, "बरं केलंस बाई आईवडिलांकडे परत आलीस.मुलंच त्यांची संपत्ती असते. इतक्या खास्ता काढुन ते तुम्हाला शिकवतात. तुम्ही शिकता आणि आई वडिलांना एकटं सोडुन लांब निघुन जाता. आता माझा मुलगाच बघ! सुनेला आणि नातवाला चांगलं रहाणीमान हवं म्हणून मला एकटीला सोडुन अमेरिकेला निघुन गेला. तू काही असं करु नकोस कधी."
मला काय बोलावं ते कळेना. नंतर म्हणाल्या, "आता ते फोनवर गॅस बूकिंग करतात का काय ते कसं करायचं तेच मला माहीत नाही.गॅस गेलाय घरचादोन दिवस झाले. शेजारच्या पिंट्याने (नाव आठवत नाहीये काय ते) करुन दिलाय गॅस बूक आता त्याचीच वाट पहातेय. दोन दिवस ब्रेड खाऊन कंटाळा आला आणि वय झालं तसं सोसवतही नाही"
मला खुप वाईट वाटलं.. वाटलं बिचार्‍या अजी एकट्या रहातात त्यांना काही झालं तर Sad
नंतर समोरच्या काकुंशी यावर चर्चा करत होते तेंव्हा त्यांनी काय ते सांगितलं.या आजींचं घर खेड्यात होतं कुठे तरी. खेड्यात शिक्षण मिळेना तेंव्हा मुलाने गाव सोडलं. पुण्यात आला, पडेल ते काम करुन शिक्षण पुर्ण केलं.आयटीत नोकरीला लागला. मग त्याचे वडिल गेले तेंव्हा आईला पुण्यात घेऊन आला. लग्न केलं.. मुलगा झाला आणि काही वर्षांनी ऑनसाईटची संधी आली. आधी काही वर्ष तो एकटाच गेला आणी मग कुटुंबाला घेऊन जाण्यासाठी आला. तर या आज्जी काही जायला तयार होईना मी तिथे कशी रहाणार हा एकच प्रश्न यांना. मुलाने सांगितलं गाव सोडुन पुण्यात यायलाही तू तयार नव्हतीस. आलीस आणि रुळलीस तशी तिथेही रुळशील. चल ! येऊन तर बघ. नाही करमलं तर परत ये. पण हीच एकच म्हणणं कोणीच जायचं नाही.
आणि मुलाला जायचं असेल तर त्याने एकटंच जायचं. सुनेला आणि नातवाला इथेच ठेवायचं!
किती हा आडमुठेपणा. या आजींना मुलगा पैसे पाठवतो तर त्या आधी घेत नाहीत. मग अगदीच काहीही नस्तं तेंव्हा त्याच्यावरच उपकार केलेत अश्या आविर्भावात पैसे घेतात. आणि जगभराला गोळा करुन मुलाने आणि सुनेनं कसं वागवलं ते सांगत बसतात Sad
अशा म्हातार्‍यांचं काय करावं? Sad

रिया.

आता वय वाढल्यावरचे विचार आहेत हे माझे.

आजींचे मन वळवायचा प्रयत्न करावा, रोज संपर्कात रहावे चौकशी करावी आणि त्या तिथे जायला नाहीच तयार झाल्या तर त्यांची इथे काळजी घेण्यासाठी कुणाला तरी तयार करावं.

दिनेशदा, त्या आजींचा मुलगा रोज फोन करतो तर त्या बर्‍याचदा घेत नाहीत. किंवा उपकार केल्यासारखा घेतात. (दोन वर्ष झाले) आणि एखाद्या दिवशी त्याने फोन नाही केला तर तो मला फोनही करत नाही म्हणून डिंडोरा पिटत बसतात.
अर्थात मलाही या गोष्टी मुळापासुन माहीत नाहीत्त अगदी वर वर मी ही याच्या त्याच्या कडुनच ऐकल्यात.
तरीही मी त्या मुलाजागी असते तर असा विचार केला तर माझ्या एकच गोष्ट लक्षात येतेय की मी ही काही करु शकले नसते. त्या बिचार्‍या मुलाने शक्य तितके सगळे प्रकार केले असं कळालं. त्या आजींना सुनच जवळ हवी. मुलाने जवळची मेस लावुन दिलेली. दोन वेळेला घरी जेवण आणुन द्यायचे ते.. यांनी बंद केली आणि होतं नाही तरी स्वतः करुन खातात नाही तर हाल करुन घेतात. आणि वर जगाला ऐकवतात की मुलगा -सुन लक्ष देत नाहीत. असं कसं ना? मुलाला, सुनेला स्वतःचं आयुष्य नाही का?
या स्वतः काहीच अ‍ॅडजस्ट नाही करणार पण फक्त त्यांचं वय झालय म्हणून इतर सगळ्यांनी अ‍ॅडज्स्ट करावं का?
कित्ती वयाने म्हातारे लोकं आहेत या जगात ज्यांच्यासाठी आपली मुलं , त्यांचं सुख म्हणजे सर्वस्व असतं.किती अ‍ॅडज्स्ट करतात ते. यांना करायला काय होतं? आपला मुलगा कशा परिस्थीतीतुन वर आलाय हे माहित आहे ना त्यांना? मग इतकं अ‍ॅडजस्ट नाही करु शकत त्या? बरं तुम्हाला नाही जायचं देश सोडुन तर किमान मुलाची, सुनेची अशी बदनामी करत तरी फिरु नये Sad
या आजींच्या बाबतीत तर मला चक्क दुखावलेला इगो आणि हट्टी स्वभाव इतकंच दिसतंय.

अमा, खरं सांगु? मला अशा माणसांची भिती वाटते. स्वतःची मुलं इतकं करतायेत तरी यांना किंमत नाही. पुन्हा आपल्याला नको काही बोलायला.
मी तरी अजिबात यात मध्ये पडणार नाहीये. त्यांना हवं ते करु देत.
मी सहज विचार करत होते की काही वर्षांनी समजा मी अशी आई बाबांपासुन दुर दुसर्‍या देशात गेले तर माझ्या मागेही असंच काही होईल का?
पण नाही. माझे आई बाबा असले नाहीयेत. पण सगळ्यांचेच आई बाबा माझ्या आई बाबांसारखे नसतात.
एकंदरच माझ्या पिढीची थोडीशी काळजी वाटली मला.

जेरॉन्टॉलॉजी अर्थात वृद्धत्वशास्त्र हा एक वेगळाच विषय आहे. त्याचे आकलन तरुण व वृद्ध दोघांनाही व्यवस्थित न झाल्याने पिढ्यातील वैचारिक गॅप अधिकच रुंद होते. प्रत्येक व्यक्ती ही निसर्गनियमाने वृद्ध होणारच आहे ( त्या आधीच गचकले तर गोष्ट वेगळी ) जेष्ठ नागरिकांचा प्रश्न हा दिवसेंदिवस जटील होत चालला आहे. आपल्या हयातीत वारसांना काही देउन टाकू नये हा व्यावहारिक विचार त्यांना समजत नसतो असे म्हणता येणार नाही पण अपत्यप्रेमापोटी ते आंधळे होतात. मुल चांगली असतील तर वृद्धांना ते खरोखरच जपतात. अगदी लहान मुलासारखं. जगात घडत असलेल्या घटना पाहिल्या कि दीर्घायुष्य हा शाप वाटायला लागतो. इच्छामरण जर कायदेशीर झाले तर जगण नकोस झाल म्हणुन नाही तर जगण पुरेस झाल या दृष्टीने त्याचा 'लाभ' घेणार्‍यांची संख्या वाढेल

रीया.
मग अश्यावेळी खरेच काही उपाय नसतो. ज्यांना मुलाची बाजू माहीत असते त्यांना काही वाटणार नाही. ज्यांना नसते ते मुलांना दूषणे देणारच... आज्जीना तेच तर हवे असते.

घाटपांडे सर,
रोचक प्रतिसाद.
'ग्रोइंग अप' शिकवलेच जायला हवे असते, पीपल जस्ट ग्रो ओल्ड...नॉट अप. नाही का?

म्हणूनच म्हणलं ना की ही म्हातारी माणसं अशी का वागतात? Sad

प्रकाश दादा, छान पोस्ट!
इच्छामरणाला खरचं पुर्णपणे परवानगी हवीच!

Pages