'पितृऋण' - दर्जेदार अभिनय , उत्तम कलाकृती

Submitted by सामी on 7 December, 2013 - 05:38

मायबोली माध्यम प्रायोजक असलेल्या 'पितृऋण' या चित्रपटाच्या निमित्तानं जाहीर झालेल्या स्पर्धेत भाग घेतला आणि ध्यानिमनी नसताना, चक्क चित्रपटाच्या शुभारंभाच्या खेळाची दोन तिकिटं मिळाली. या बद्दल सर्वात पहिल्यांदा मायबोली चे मनापासून आभार.

प्रख्यात लेखिका सुधा मुर्ती या आवडत्या लेखिकांच्या यादीत. त्यांची काही पुस्तके संग्रही आहेतच. एका चांगल्या कथेच्या शोधात असलेल्या नितिश भारद्वाज यांना, सुधा मुर्ती च्या कथा न भावल्या तरच नवल. मूळ कन्नड असलेल्या ’ऋण’ या कथेवर आधारित सिनेमा बनवायचा असे त्यांनी ठरवले, आणि ती कथा सिनेमाच्या माध्यमातून आपल्या कोकणात खुलली. कथेतील पात्र सचिन खेडेकर, ज्येष्ठ अभिनेत्री तनूजा , सुहास जोशी असे दिग्गज कलाकार साकारतात आणि कतर्व्य आणि प्रेम या भावनांतून एक मन हेलावणारी रोमांचकारी कथा निर्माण होते.

ज्येष्ठ अभिनेत्री तनूजा यांची भागीरथी च्या भुमिकेसाठी निवड इथेच सिनेमा बाजी मारतो. अतिशय वेगळ्या रुपात, डोक्याचे मुंडन करून ज्या ताकदीने त्यांनी भागीरथी उभी केली आहे, त्याला तोड नाही. सुहास जोशी यांची भुमिका ही तितकीच परिणामकारक, बायकोची घुसमट त्यांनी खूप योग्य रितीने व्यक्त केली की त्या अभिनय करत आहेत असे वाटलेच नाही. सचिन खेडेकर चा वावर दुहेरी भूमिकेत नेहेमी प्रमाणेच कॉन्फिडंट.

पहिल्या पंधरा मिनिटातच पुढे काय घडणार याचा आपल्याला अंदाज येतो , पण सिनेमा कुठेही रेंगाळत नाही. कथा समजून ही आपण त्यात गुंतून जातो. आता रहस्य कसे उलगडणार आणि भुतकाळात काय घडले असेल याचा विचार करत करतच आपण मध्यंतरात पॉपकॉर्न घेऊन घाईघाईत सिनेमा हॉल मधे येतो आणि इथेच सिनेमा जिंकतो. सिनेमाचा वेग , फ्रेश चेहरे आणि ज्येष्ठ अभिनेत्री तनूजा यांचा अभिनय तांत्रिक चुका विसरायला भाग पाडतो आणि एक छान कलाक्रुती बघितल्याचा आंनद नक्किच देतो .

लोकेशन्स ची निवड हा या सिनेमाचा महत्वाचा पैलू. भागीरथी चा तपोळ्याचा वाडा, पुरातत्वखात्यात कामाला असलेल्या व्यंकटेश कुलकर्णी यांचे पुण्यातील घर आणि जुन्या पुण्यातील चाळ यांचाही कथे मधे महत्वाचा सहभाग आहे. वाई आणि वेंगुर्ला येथील लोकेशन्स ही मस्तच.

एक चांगली कलाकृती बघितल्याचं समाधान हा सिनेमा नक्किच देतो.

शुभारंभाचा प्रयोग असल्यामुळे या कलाकांराना प्रत्यक्ष बघायची संधी मायबोलीमुळे मिळाली. ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा आणि सई परांजपे यांच्या सोबत छायाचित्र काढायची संधी नाही तरी कधी मिळणार होती. त्यांचे मोकळे बोलणे आणि नैसर्गिक हास्य मनात कायमचेच कोरले गेले.

ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांच्या अप्रतिम अभिनयासाठी हा सिनेमा नक्कीच बघण्यासारखा आहे.

- सारिका देसाई

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान परीचय. सुहास जोशी पोस्टरवर पण का नसाव्यात ?

ज्या काळात स्टाईलबाज अभिनय प्रचलित होता त्या काळातही तनुजा पडद्यावर नैसर्गिक अभिनय करत असे.
अगदी कमी चित्रपट करूनही ती सर्वांची आवडती अभिनेत्री होती.

सिनेमाचा वेग , फ्रेश चेहरे आणि ज्येष्ठ अभिनेत्री तनूजा यांचा अभिनय तांत्रिक चुका विसरायला भाग पाडतो >>>>>>>>> तांत्रिक चुका????
---------------------------------------------------------
असो......

रेटिंग पण लिहा ना सारिका जी.....!!!

सुहास जोशी पोस्टरवर पण का नसाव्यात ? > दिनेशदा , त्या प्रिमीअर ला पण न्हवत्या. त्यांना भेटायला खूप आवडलं असतं.

सिनेमाचा वेग , फ्रेश चेहरे आणि ज्येष्ठ अभिनेत्री तनूजा यांचा अभिनय तांत्रिक चुका विसरायला भाग पाडतो >>>>>>>>> तांत्रिक चुका????
---------------------------------------------------------
असो......>>>>>>>>>>>>
मधुरा, सिनेमात काही गूफअप्स आहेत आणि काही टेक्निकल फ्लॉझ. त्यालाच मी 'तांत्रिक चुका' म्हटले. योग्य शब्द सुचवलात तर आवडेल.

रेटिंग देण्याएवढी माझी योग्यता नाही.

सामी,

तांत्रिक चुका म्हणजे काय हे मला नक्की कळले नाही....चित्रपट पाहीन तेव्हा कळेलच म्हणा.
आणि रेटिंग देण्याची योग्यता नाही असे का म्हणता ??

प्रत्येक प्रेक्षक त्याच्या दृष्टीने, चित्रपट किती छान झाला यावर रेटिंग देऊच शकतो. Happy

आणि रेटिंग देण्याची योग्यता नाही असे का म्हणता ?? >मधुरा रेटिंग देण्यासाठी सिनेमा या विषयात तज्ञ असणे आवश्यक आहे , किंवा मी तज्ञ आहे हे इतरांना माहीत असणे आवश्यक आहे. कोणत्या बेस वर मी रेटिंग देणार आणि इतरांना त्याचा काय फायदा होणार? काही समिक्षकांच्या नुसत्या नावामुळे आपण त्यांचा समिक्षणावर विश्वास ठेऊ शकतो. ते नेहेमीच बरोबर असते असे नाही पण ते लोक अभ्यास करून अगदी संयतपणे समिक्षण करतात.
उदाहरणादाखल, मी या सिनेमा ला पाच रेटींग दिले, ते वाचून जर उद्या तुम्हाला सिनेमा आवडलाच नाही तर तिकिटांचे पैसे मागायला घराच्या बाहेर रांगा लागतील Happy

सुहास जोशी बहुदा अमेरीका/परदेश वारी वर असाव्यात (हा माझा अंदाज आहे, नक्की माहिती नाही). डिसेंबर १४ , २०१३ ला ऑस्टीन मराठी मंडळामध्ये त्यांचा कार्यक्रम आहे.
सर्व कलाकांराच्या अभिनयासाठी बघावाच असा चित्रपटाची ओळख करुन दिल्याबद्दल आभारी आहे. छान परिक्षण.

--

कमळी.

छान सिनेमा.

ते गाणे आणि ब्याकग्राउंडला गोरख कल्याण रागाची धून आहे. अगदी योग्य वाटते.