Br Ba

Submitted by तृप्ती आवटी on 5 December, 2013 - 10:46

If you aren't watching "Breaking Bad" at the moment, you need to reconsider your life choices!

Braking-Bad--620x400.jpg

"ब्रेकिंग बॅड" ही अमेरिकन टीव्हीवर सहा सीझन्समध्ये प्रसारित झालेली मालिका. वॉल्टर व्हाइट हा एक साधारण आयुष्य जगणारा 'फॅमिली मॅन'. उपचारांपलीकडे पोचलेल्या फुफ्फुसांच्या कर्करोगाचे निदान होते आणि वॉल्टरचे आयुष्य बदलून जाते. हायस्कूलमध्ये रसायनशास्त्र शिकवणारा शिक्षक आणि त्याच्या आयुष्यात येणार्‍या ब्रिलियन्ट घडामोडी म्हणजे 'ब्रेकिंग बॅड'!

ब्रेकिंग बॅड अधिकृत - http://www.amctv.com/shows/breaking-bad/where-to-watch

ब्रेकिंग बॅड क्रू - http://www.imdb.com/title/tt0903747/fullcredits?ref_=tt_ov_st_sm

ब्रेकिंग बॅडबद्दल अधिक माहिती - http://en.wikipedia.org/wiki/Breaking_Bad

http://breakingbad.wikia.com/wiki/Breaking_Bad_Wiki

साऊंडट्रॅक - http://breakingbad.wikia.com/wiki/Music

गिलिगनची मुलाखत - http://www.writermag.com/2013/06/19/raising-hell/

http://www.youtube.com/watch?v=5ujPobTnOB0

ब्रेकिंग बॅडबद्दल गप्पा मारण्यासाठी हा धागा.

brba.jpg
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुठला फोटो?

Btw, Br Ba संपल्याने प्रचंड पोकळी आल्ये आयुष्यात. ती कशाने भरावी?

रायगड, हाऊस ऑफ कार्ड्स पाहिलंय? २४?
२४ मध्ये सतत अ‍ॅक्शन अतिशय गुंतवून ठेवते. सिझन्सही बरेच असल्याने फार अ‍ॅडिक्टिव्ह प्रकरण होतं. रूटिन, झोप पार बोर्‍या वाजतो. पण भारी आहे.
मी ही सध्या लॉस्ट बघून संपवल्याने असंच रिकामं वाटतंय. पण आत्ता लगेच काही सुरूही करवत नाहीये.

कोणी Prison Break fans नाहीयेत का इथे?

पोकळी भरण्यास अतिसुंदर. भयंकर व्यसन लागते. पहिले ३ सीझन्स तर अशक्य आहेत. ४था पण एकदा बघण्यास छान आहे. नंतर नंतर मग कैच्या कै वाटू लागतो मात्र.

सिझन ५ मध्येच तर काही महत्वाच्या घटना घडतात. सगळ्याच भागांवर तेवढीच पकड टिकवून ठेवणं खूप जमलेलं नाही. काही भाग फार ड्रॅग होतात.

अ‍ॅमॅझॉन वरच्या सीझन्स् वर पोचले आहे .. (फेब एण्ड ला नेटफ्लिक्स् वर येणार म्हणे ते .. )

* अलर्ट*
वॉल्ट चा ५२वा वाढदिवस दाखवलाय .. म्हणजे काहितरी कलाटणी देणार परत ..

जिंकला का .. वा वा! छान! Happy

आज बघितलेल्या तीन एपिसोड्स पैकी शेवटचा बघून उद्विग्न व्हायला झालं ..

व्हेन वन गोज् बॅड, देअर इज् नो टर्निंग बॅक ; देअर इज् नो एण्ड टू इट! :| नवरा म्हणतो तुला हवा होतं तशी स्टोरी वळली नाही म्हणून फ्रस्ट्रेशन आलंय तुला .. कदचित हो, पण आता फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून बघून पूर्ण करणार .. अदरवाईज् माय इंटरेस्ट इज् ओव्हर ..

यो! Happy

ओरिजिनल स्टोरी बदलून आलेल्या 'हाऊंड ऑफ बॅस्करविल' ने खूप निराशा केली, मोरिआर्टी कायम बोअरिंग डायलॉग मारतो. मायक्रॉफ्ट मधूनच फार विनोदी वागतो.

पण सेंट बार्थ वरून मारलेल्या ऊडीबद्दल प्रचंड ऊत्सुकता आहे हे मान्य करतोच. बघू १९ जाने. ला का होतं ते.

पण कंबरबॅच रॉक्स हे नक्की.

If he isn't careful, he'll find himself a decade from now opening a Wal-Mart in Terre Haute, Ind., with the words, "Bargains, bitch!"

Biggrin

संपवलं एकदाचं ..

वॉल्ट ला ग्लोरीफाय करायला बरीच लिबर्टी वापरल्यासारखं वाटलं शेवटच्या सीजन मध्ये .. पण ड्रामा मात्र अप्रतिम!

ब्रेकिंग बॅड संपवलं परवा. शेवटचे दोन एपिसोड अगदी अंगावर आले. काय अ‍ॅक्टिंग केलीये क्रॅन्सटननी! जबरदस्त! बाकी सगळेच चांगले आहेत पण क्रॅन्स्टन एकदम कट अबव आहे.

स्पॉयलर अलर्ट

आपल्याला सगळे व्युपॉईंट्स माहित असतात, वॉल्ट बर्‍याच वेळा आधी खरं बोलतो तेव्हा ते त्याच्या फॅमिलीला पटत नाही. शेवटी आधी केलेल्या गोष्टींमुळे जे काही प्ले आऊट होत असतं त्या सगळ्या भयानक वास्तवात तो त्यांना जे हवं असतं ते उत्तर देतो ते बघून पार वाट लागते आपली.
आधी कित्येक वेळा वॉल्ट I did this for our family म्हणतो आणि ते टोटली खरं असतं पण ते करत असताना त्याच्या फॅमिलीलाही (स्कायलर) प्रचंड त्रास होतो (होणार असतो) त्यामुळे स्कायलर तर दर वेळी चिडतेच त्याच्यावर आणि पुढे जुनियर सुद्धा त्याला वाईटच समजतो.
शेवटच्या एपिसोड मध्ये, वॉल्ट एकदा शेवटचं म्हणून स्कायलरला भेटायला येतो तेव्हा "I did this for ..." अशी सुरवात करतो तेव्हा ती फाडकन " Don't you dare to say you did this for our family..." असं म्हणते त्यावर वॉल्ट "No, I did all this for myself. Because I wanted all this" असं म्हणतो तेव्हा अक्षरशः गलबलायला होतं. (अजून बरेच पॉईंट्स लिहिता येइल खरं पण थांबतो)
स्कायलरचा अवतार ही भयानक घेतलाय शेवटच्या एपिसोड मध्ये.अगदी बघवत नाही तिच्याकडे.

एपिसोड संपल्यावर त्यातून बाहेर यायला जरा ३-४ तास लागले.

एपिसोड संपल्यावर त्यातून बाहेर यायला जरा ३-४ तास लागले >> काय करत होतात आत एवढ्या वेळ? Proud

पण बुवा,

आधी कित्येक वेळा वॉल्ट I did this for our family म्हणतो आणि ते टोटली खरं असतं >> हे तेवढंही खरं नाहीये. त्यालाही ती पावर हवीच असते, क्लिशे म्हणा हवं तर. आठवा तो म्हणतो "I am in the empire business". हायझेनबर्गची आवडती हॅट विसरलात का? ती हॅट घातल्यावर फॅमिली वगैरे सगळं झूठ होतं असं वाटत नाही का? त्याचं वॉल्टर व्हाईट ते हायझेनबर्ग वहावत जाणं त्याचाच तर खरा अर्थ ब्रेकिंग बॅड आहे ना?

फिनाले एपिसोड्स नेटफ्लिक्सवर आल्यापासून आठवड्यातून किमान दोनदा तरी मी ते शेवटचं मॅसाकार बघून आनंद मानून घेतो.

>> ते शेवटचं मॅसाकार बघून आनंद मानून घेतो

मला ते मॅसॅकर थोडं फारफेच्ड् वाटलं ..

पण मी आधीच लिहीलं तसं माझा इंटरेस्ट च संपला होता शेवटच्या एपिसोड ला ..

Spoiler Alert!
हायजनबर्ग एपिसोड पुरतं त्याच्या डोक्यात थोडं वारं जातं विच इज नॉर्मल. एकदा पावर आली की फार अवघड असतं ती नकारणे. पण तिथेच ह्या शो चे खुप मोठे यश आहे. आपल्यासारखी माणसं अशा परिस्थितीत जे करतील तेच ही कॅरॅक्टर्स करतात. कधी रागाच्या भरात हिंस्त्र रुप धारण करतात उदा: माईक ला मारणे, जेस्सी हँक ला मदत करतोय हे कळल्यावर अंकल जॅक/टॉडला त्याला त्यांच्या हवाले करणे, स्कायलरला शिवीगाळ करणे. त्यानी सुरवात आपण गेल्यावर आपल्या फॅमिलीला त्रास होऊ नये म्हणून केलेली असते आणि पुढे सुद्धा त्याला एंपायर बिल्डिंगची संधी ही असते पण तो घेत नाही.
गस फ्रिंग करता काम करत असताना सुद्धा त्याला त्यातून बाहेर पडायचं असतं पण गस त्याला सोडणार नाही हे माहित असल्यामुळे परत ते निस्तरणेही येतच.
हँकला अंकल जॅक मारणार असतो तेव्हा ज्या पैशाकरता हे सगळं हेल बॅड ब्रेकतं तो पैसा तो त्यांच्या हवाले करायला तयार होतो.
वाहवत तो जवळजवळ नेहमीच स्वतःला आणि त्याच्या कुटुंबाला वाचवायलाच जातो.
ब्रेकिंग बॅडचा अर्थ वाईट मार्गाला लागणे किंवा वाईट मार्ग अवलंबणे असा आहे माझ्यामते. वॉल्ट वाईट मार्ग अवलंबतो पण त्याच्या वागण्यात मात्र सतत "फॅमिली" करता हे दिसत राहतं. After being the greatest meth cook on earth and killing a major drug kingpin like Gus, he never really becomes ruthless and crazy and on the contrary always shows a mix of emotions that any common man would.

क्रिस्टलमेथ म्हणून कसले तुकडे आणतात देव जाणे! किती सुंदर दिसतात ते! चांगल्या आकाराच्या पारदर्शक बरण्या, सिलिंडरांमधे भरून डेकोरेटिव्ह पीस म्हणून ठेवावेसे वाटतात.

(नानू सरंजाम्याच्या नाटकाला गेल्यावर धोंडोपंतांच्या बायकोला चित्रा झालेल्या बाईनं नेसलेली, चटणीकलरची, म्हसकरांकडची साडी घ्यायची असते आणि नाटकातल्यासारखे पडदेपण! त्याची आठवण आली.) Proud

Pages