सहकारी तत्वावर शेती: एक उत्तम गुंतवणुक पर्याय?

Submitted by रेणु on 5 December, 2013 - 09:48

नमस्कार मंडळी
नुकतीच एक अ‍ॅड पाहण्यात आली. सहकार तत्वावर शेती करण्याबद्दल, त्याविषयी जरा जाणकारांचे मत
घ्यावे, म्हणुन हे नविन पान.
मला वाट्लेले लाभदायक मुद्दे:
१. शेती असण्याची हौस भागणार आहे.
२. ४०% उत्पन्न मिळण्याची कागदोपत्री खात्री अहे.
३. फार्म हाऊस सारखा विले़ज रिसोर्ट हा ही पर्याय आहे.
४. उत्पन्न taxfree असणार आहे.
आता काही शंका:
१.ही शेती सहकार तत्वावर म्हण्जे इतरही गुंतवणुक दार आहेतच, तेव्हा कुठल्याही व्यवहारात hsg society साठी असते, तशी रितसर परवानगी लागणार. आणि तरीही ज्या कंपनी ला ही शेती करायला देणार आहोत, त्यांचा करार संपवता येणार नाही.
२. स्वताच्या नावाचे शेत असुन ही उत्पन्न फक्त ४०% च मिळ्णार, अगदी ५०-५० सुध्हा नाही.
३.इथे शेती असली तरी, त्याचा इतरत्र कुठे शेती घेण्यासाठी उपयोग होउ शकेल काय?
४. इथेही "कसेल त्याची जमीन" हा कायदा लागु झाला, तर "तेल ही गेले आणि तुप ही गेले" ही अवस्था होइल.

भारतात "सहकारी शेती" हा प्रकार प्रथमच ऐकायला येतोय, कोणास काही अधिक माहिती आहे का?

प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही काळापुर्वी सागाची झाडे लाऊन फायदा मिळवा अशी स्कीम होती अर्थातच ती कंपनी होती आणि त्यात मुदतठेव ठेवायची होती. दुर्दैवाने ही स्कीम फेल झाली.

सहकारी शेती असेल तर

१) ही कुठे आहे ? तुमच्या जिल्ह्यात आहे का ?

२) शेतीची जागा विकत घेतली आहे ( प्रमोटर्स यांनी ) हे माहित करुन घ्यावे.

३) शेअर्स ची रक्कम भरुन सर्वांच्या नाववर लोन घेऊन ही शेती खरेदी केली जाणार आहे का याचा तपास करावा.

४) सहकारी शेतीच्या ( काय्द्याचे ) बाय लॉज तपासावेत.

५) सहकार तत्वात एखादी सहकारी संस्था नुकसानीत गेली तर दुसरी सहकारी संस्था ती टेकओव्हर करु शकते.
यात फक्त असेट टेक ओव्हर होतात. लायबिलीटज नाहीत. त्यामुळे तुमचे शेअर्स अश्या प्रसंगी पाण्यात जातात.
( मी सदगुरु जंगली महाराज सहकारी बँकेचे शेअर्स घेतले होते. ही बँक नुकसानीत गेली. पुढे ठाणे जनता सहकारी बँकेने ही बँक टेकओव्हर केल्यानंतर फक्त अ‍ॅसेट्स टेकओव्हर झाले. लायबॅलेटिज पोटी माझे शेअर्स अडकुन पडलेत. )

६) सबब सध्याचे प्रमोटर्स अशीच एखादी सहकारी शेती चालवतात व त्यांचा प्लॅन नवीन संस्था निर्माण करुन नुकसानीत आणुन पुढे सध्याच्या संस्थेने टेकोव्हर करायचा प्लॅन नाहीना याची खात्री करावी.

आपल्या वार्शीक उत्पन्नाच्या किती टक्के रक्कम हा व्यवहार रिस्की असेल तर गुंतवावी याचा विचार करुन ठेवावा.

एका दाण्याचे १०० होतात म्हणजे ३ महिन्यात आपल्या १ रुपयांचे १०० होतात म्हणजे ४० टक्के नफा देणे शक्य आहे इ जाहिरातीला भुलुन जाणे की शेती फायद्याची नाही ही वास्तवता आहे म्हनुन शेतकरी आत्महत्या करतात ही वास्तवता लक्षात ठेवावी.

या सर्व योजनेचे प्रवर्तक ( प्रमोटर्स ) यांचा योजनेच्या मागचा मुळ उद्देश्य काय आहे हे जाणुन घ्यायचा प्रयत्न करावा.

नितीनचंद्र,
धन्यवाद! तुम्ही खुप चांगला सल्ला दिल्याबद्दल!
अर्थात, ही post बरीच जुनी (४ महिने पुर्वीची ) आहे, आणि दरम्यान मी अश्या शेतीत काही गुंतवणुक करण्याचा विचार रद्द केला, मला वाटलेल्या संभाव्य धोक्यांमुळे.
पण इतरही वाचकांना ह्या माहीतीचा फायदा होइल, अशी आशा आहे, पुन्हा धन्यवाद!

..