' घाव '

Submitted by -शाम on 27 November, 2013 - 00:06

हा जन्म म्हणू की जोग
अभागी भोग
जाळतो छाती
वक्षातुन चळते
स्वप्न चुरडते राती

आसक्त क्षणांचे फेर
तमाच्या पार
उसळती लाटा
शिणलेला निथळे
देह निचेत करंटा

सोसते दिशांचे बोल
पापणी ओल
घाव घन गहिरा
निकलंक हिर्‍यावर
वांझपणाचा कचरा

-----------------------------------शाम

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आईपणाला असमर्थ स्त्रीची हताशा जाणवली.
कवितेचा आकृतिबंध, तिची लय खूप आक्रमक आहे, शब्द टोकदार आहेत आणि विषय बोचरा आहे. ह्या कॉम्बीनेशनमुळे कविता, छोटीशीच असली तरी, खूप अंगावर आली. पुन्हा पुन्हा वाचली मी.

अप्रतिम !!

मस्त.