दोडक्याचा ठेचा

Submitted by Anvita on 22 November, 2013 - 08:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

1-२ दोडके , लसुण,हिरव्या मिरच्या , जिरे, मीठ , फोडणीचे साहित्य .

क्रमवार पाककृती: 

आधी mixer वर लसुण,हिरव्या मिरच्या आणि जिरे वाटावे नंतर दोडक्याचे सालीसकट तुकडे करून mixer वर भरड वाटावे. फोडणी करून लसुण, हिरवी -मिरची -जिरे पेस्ट परतून घ्यावी .
दोडक्याची भरड टाकून चांगले शिजवावे . सगळ्यात नंतर मीठ घालावे .
दोडक्याचा ठेचा तयार .

अधिक टिपा: 

खूप सोपी recipe आहे आणि मुख्य म्हणजे दोडका सालीसकट खाल्ला जातो .
लसूण आणि हिरव्या मिरच्याचे प्रमाण आवडीप्रमाणे घ्वावे . पण हा पदार्थ तिखट चांगला लागतो .

पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोडक्याच्या सालींची चटणी माहित होती. हा प्रकार पहिल्यांदाच ऐकला. दोडके मिळाल्यावर करून बघण्यात येईल. Happy

दक्षिणा, अल्पना मला पण माहिती नव्हता . आमच्या स्वयंपाकाच्या बाईंकडून कळली हि recipe .
एखाद्या दोडक्याचा करून बघा .
change म्हणून छान आहे . पण तिखटाच छान लागतो हा ठेचा . शेवटी ठेचा म्हणजे तिखटच हवा ना!

मस्तच. दोडका म्हणजेच घोसाळीना?

घोसाळे आणि शिराळे हे कोवळे घेऊन मी सालासकटच भाजी करते आमच्याकडे आवडते, मुगडाळ आणि कांदा लसूण घालून सालासकट. साले काढली तर सालांची चटणी करते.

आता असा करून बघेन ठेचा.

>> दोडका म्हणजेच घोसाळीना?
नाही. दोडका म्हणजे शिराळी. Happy

प्रभा , हा टिकणारा ठेचा नाही . हा तसा भाजी चाच एक प्रकार आहे. मिरचीच्या ठेच्या एवढा तिखट नव्हे .
दोडके ठेचून केलेला म्हणून असेल नाव ' दोडक्याचा ठेचा'

आता वर घोसाळ्याचं नाव आलेलं आहे म्हणून एक प्रश्न... असा ठेचा घोसाळ्यांचा केला तर दोडक्याच्या ऐवजी? चांगला लागेल की पाणचटच लागेल?
इथे दोडकी मिळत नाहीत सहसा, पण घोसाळी मात्र मिळतात. पण घोसाळ्यांची भाजी आवडत नाही. (अगदी एकदाच सिंडीच्या रेसेपीने केलेली भरलेली घोसाळी केली होती ति आवडली. )

घोसाळीचा पण मस्त लागतो. आमच्याकडे बटाट्याचा पण करतो आम्ही. बटाटे सालासकट घ्यायचे. थोडावेळ पाण्यात ठेवले की वरची सगळी माती निघून जाते. मस्त दिसतात असे बटाटे. मग ते तसेच खलबत्त्यात घालून ठेचायचे ठेचता ठेचता त्यात मिरची पण थोडी घालायची. हे करत असतानाच फोडणी - कांदा बारीक चिरून जरा जास्तच, लसून मिरची . मग बटाटा ठेचल्यावर धुवायचा नाही. त्यामुळेच ठेच्याल्या बरोबर लगेच फोडणीत. जास्त वेळ ठेवला तर लाल होतो. मस्त परतायचा. खमंग होतो तेल जरा जास्तच लागते

मला पण वाटले कि घोसाळीचा पाणचट होईल कि काय म्हणून मी पण नाही केला. करून बघायला हरकत नाही.
आज दोडक्याच्या ठेच्यात हिरव्या मिरची बरोबर थोडी लाल सुकी मिरची पण वाटली ती चव पण आवडली .