तेस्त

Submitted by श्रद्धादिनेश on 22 November, 2013 - 07:55

विठ्ठलपंत व रुक्मिणीबाईंना निव्रुत्ती, ज्ञानदेव, सोपानदेव व मुक्ताबाई अशी चार अपत्ये होती. ज्ञानदेवांचा जन्म गोकुळाष्टमीचा म्हणून त्यांना क्रुष्णावतार मानून त्यांचे नाव ज्ञानदेव असे ठेवले.

गावाने ज्ञानदेवांच्या परिवाराला वाळीत टाकलेले असल्यामुळे त्यांना खुप हाल अपेष्टा सहन कराव्या लागत.
एके दिवशी निव्रुत्तींना मांडे खायची इच्छा झाली. मांडे भाजण्यासाठी खापर आणायला मुक्ताबाई गावातील कुंभाराकडे गेल्या. कुंभाराने खापर मुक्ताच्या हातात दिलेच होते तेवढ्यात गावातील विसोबा नावाचा एक दुष्ट माणूस तिथे आला. त्याने विचारले," ए पोरटे, कशाला हवेय ग खापर?" मुक्ता म्हणाली,"निव्रुत्ती दादाला मांडे करुन घालायचेत." त्यावर विसोबा म्हणाला,"भीक मागून खायचे सोडून मांडे करुन खायला लागलात! खबरदार रे कुंभारा हिला खापर दिलेस तर. याद राख माझ्याशी गाठ आहे." बिचारा कुंभार मान खाली घालून गप्प राहिला. मुक्तानेही हिरमुसून खापर खाली ठेवले व घरी परत निघाली.

विसोबाही तिच्या मागे त्या सर्वांची गम्मत बघावी म्हणून त्यांच्या झोपडीकडे निघाले. घरी आलेल्या मुक्ताचा उदास चेहरा बघून ज्ञानदेवांनी विचारले,"काय ग मुक्ते, काय झाले? कोणी काही बोलले का तुला?" मुक्ताने सर्व हकिकत त्यांना सागितली व म्हणाली," आता खापर नाही तर मांडे कसे बनवणार आणि निव्रुत्ती दादाची इच्छा कशी पुरी करणार?"ज्ञानदेव म्हणाले,"एवढेच ना! तू पिठ भिजव. मी तुला खापर देतो." मुक्ता म्हणाली,"अरे पण विसोबांनी गावात सगळ्यांनाच सांगितले असेल की यांना काही देऊ नका म्हणून. तु कुठून आणणार खापर?" ज्ञानदेव म्हणाले,"मुक्ते, ज्याने जग बनवले त्याच्याहून मोठा कुंभार कुठला? तो देईल खापर. शिवाय आपला देह मातीचाच ना! चल तु कर तयारी. फक्त माझ्या पाठीवर मावतील एवढेच मोठे मांडे कर.""स्वतःसाठी सिद्धी वापरु नये हे खरं. पण मी दादांचा भाऊ व शिष्यच आहे. त्यांच्या सेवेसाठी सिद्धी वापरायला काहीच हरकत नाही. तू तयारी कर"

मुक्ताने पिठ भिजवले. ज्ञानदेव ओणवे झाले. मुक्ताने मांडा थापून त्यांच्या पाठीवर टाकला.झोपडीच्या बाहेर विसोबा लपले होते. त्यांना वाटत होते इतके बोललो, पण कार्टीने एका शब्दाने उलट उत्तर केले नाही. काय सहनशक्ती. एतक्यात त्यांना मांडे भाजल्याचा वास आला. म्हणजे ह्यांना खापर मिळाले की काय असे वाटून ते हळूच फटीतून पाहू लागले. पाहतात तर काय अजबच. ज्ञानदेवांची पाठ चांगली लाल झालेली आणि मुक्ता त्यावर मांडे भाजते आहे. त्यांना हा जठराग्नीचा जाळ आहे हे लक्शात आले. ते धावत आत आले व त्यांनी ज्ञानदेवांचे पाय धरले. आजवर आपण यांना कसा त्रास दिला ते आठवून त्यांनी सर्वांची क्षमा मागून त्यांचे मोठेपण कबूल केले.
---------------------------------

याच काळात चांगदेव नावाचे एक योगीराज होऊन गेले. विविध प्रकारच्या विद्या त्यांनी हस्तगत केल्या होत्या. मंत्रशक्ती व सिद्धीच्या जोरावर ते लोकांच्या अडचणी निवरीत अ अनेक प्रकारचे चमत्कार करीत. पण त्यांनी गुरू केला नसल्यामुळे आत्मज्ञान नव्हते व स्वभाव अहंकारी बनला होता.

चांगदेवांना ह्या तेजस्वी व योगसिद्धी जाणणार्या चार मुलांबद्दल कळले होते. त्यांनी त्यांची भेट घेण्याचे ठरवले. त्यांना भेटायला जाताना आपले योगसामर्थ्य दाखवायला हवे असे अहंकारी चांगदेवानी ठरवले.
भेटीच्या दिवशी सकाळी ते सातशे शिष्य, वाद्य, वाजंत्री घेऊन निघाले. ते स्वतः वाघावर स्वार झाले होते व हातात सापाचा चाबूक होता. असे ते आकाशमार्गे निघाले. आळंदीत आले तेव्हा चारही भावंडे एका पडक्या भिंतीवर सकाळचे कोवळे उन खात बसली होती. इतक्यात मुक्ताचे लक्ष आकाशात गेले व ती म्हणाली,"दादा, ते पहा आकाशात काय दिसते आहे." सोपान म्हणाला," योगीराज चांगदेव वाघावर बसून आकाशातून येत आहेत. दादा, आपल्याला त्यांचे स्वागत करायला हवे ना?" मुक्ता म्हणाली,"कसे करणार? काय आहे आपल्याकडे? आणि मुक्या प्राण्यांना राबवणे चांगले नाही."

ज्ञानदेव म्हणाले," आपण निर्धन असलो तरी अतिथीचे स्वागत हे करायलाच हवे. आपण या भिंतीलाच सांगू. चल ग बाई पाहूण्यांचा सत्कार करायला." आणि अहो आश्चर्यम! ती दगडमतीची भिंत चक्क त्या भावंडांना घेऊन हवेतून चांगदेवाना सामोरी जाऊ लागाली. ते पहाताच चांगदेवांचा सर्व गर्व वितळला. आपण आपल्या योगसामर्थ्याने हा सर्व लवाजमा, साप, वाघ घेऊन आलो. पण हे तर दगड मातीची भिंत चालवताहेत. यांच्यापुढे आपले सामर्थ्य काहीच नाही हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी धावत जाऊन ज्ञानदेवांचे पाय धरले व त्या चार भावंडांच्या सावालीत राहू लागले.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users