Submitted by भारती.. on 15 November, 2013 - 11:04
क्रीडचन्द्र वृत्त : एक प्रयास
("लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा" )
‘’एकलव्य ‘’
मला वेढतो हा ऋतू जाणिवेच्या झळांचा हिमानी
जशी एकट्या एकलव्यास वेढे व्यवस्था पुराणी
गुरू मानले द्रोण आचार्य त्याने मनामानसात
निदिध्यास घेउन एकांत अभ्यास केला वनात
हिरावून घेईल हा श्रेय येथील प्रस्थापितांचे
गुरूनेच निर्दाळले स्वप्न भोळे किराताकुळीचे
तुटे अंगठा रक्त लोटे भळाळून मातीत लोळे
वरी ढाळती क्षार अश्रू अनिर्बंध निष्पाप डोळे
कथा एक वाहे नदीसारखी ती किती काळ गेला
नव्याने कितीदा निषादास त्या जन्म येथे मिळाला
कुणा सांगता गोष्ट तत्वभ्रमाची ? उरे हाच शोक
जिथे शीश आशीष मागे तिथे घाव होतो अचूक
..रिते राहिले गर्भ जे आशयाचे फळाला न आले
खरे गूढ त्या घातपाती क्षयाचे कुणा ना कळाले..
-भारती बिर्जे डिग्गीकर
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा वा...
वा वा...
वा वा...
वा वा...
व्वा! अत्यंत सुंदर
व्वा! अत्यंत सुंदर
अप्रतिम
अप्रतिम
सुरेख! भारतीताई या रचनेला
सुरेख! भारतीताई या रचनेला प्रयास जरी म्हणत असलीस तरी सुरेखच रचना आहे!!
एकलव्याच्या आयुष्यातले कारुण्य किती समर्पक शब्दांत मांडलेस!!
वाह सरळ पोचते ही कविता सहज
वाह
सरळ पोचते ही कविता
सहज सुंदर नेहमीप्रमाणेच
निदिध्यास म्हणजे काय
निदिध्यास म्हणजे काय ??
यापूर्वी नाही वाचला हां शब्द
पुन्हा एकदा तुम्हाला सा.न.
पुन्हा एकदा तुम्हाला सा.न. भारतीताई
________/\_________
निव्वळ ग्रेट कविता
जिथे शीश आशीष मागे तिथे घाव होतो अचूक <<< पर्फेक्ट आणि एकदम करेक्ट बोललात
खालचा शेरही भन्नाट आहे !!!
एकलव्याच्या आयुष्यातले
एकलव्याच्या आयुष्यातले कारुण्य किती समर्पक
शब्दांत मांडलेत ! <<सहमत आहे
नेहमीप्रमाणे सुंदर आणि उत्कट शब्दछटा ...
वृत्त बहुधा सुमंदारमाला +1दीर्घ असे आहे ना ..छानच !
आभार सर्वांचे. कालच्या
आभार सर्वांचे.
कालच्या बालदिनीच नेमका एकलव्यावरील एपिसोड पहाण्यात आला, भिडला.
जाई, निदिध्यास म्हणजे सतत सतत केलेले खोल चिंतन .
सुशांत, हे वृत्त क्रीडचंद्र आहे, सुमंदारमालेशी साधर्म्य आहे आणि फरकही.
( याची लगावली ..लगागा सहा वेळा अशी आहे,सुमंदारमालेत सुरुवातीला एक लघु, नंतर सात वेळा गागाल, शेवटी एक गुरू येतो.)
रचनेचा फॉर्म सुनीताचाही आहे (१२ ओळी + शेवटच्या २ ओळी या प्रकारातील. )
शेवटच्या दोन ओळींनी कळस चढवला
शेवटच्या दोन ओळींनी कळस चढवला आहे.

'सुनीत' चा फॉर्म आवडला.
'तत्वभ्रम' हा तू निर्मिलेला शब्द अतीशय सुरेख आणि चपखल आहे.
दीदी तुझी नविन आशघन शब्द निर्मितीची क्षमता निव्व्ळ अफाट आहे. एखादातरी असा नविन सुंदर शब्द असतोच तुझ्या कवितेत.
_/\_
कविता आवडली,भावली,भिडली हे वेगळं सांगयला नकोच. ते अध्याहृतचय..
सुंदर रचना!
सुंदर रचना!
सादर प्रणाम
सादर प्रणाम ........
____________/|\___________
व्वा ! खूपच छान. शेवटच्या ४
व्वा ! खूपच छान.
शेवटच्या ४ ओळी खासच.
अ प्र ति म...!!
अ प्र ति म...!!
उच्च रचना, अतीव आदर...
उच्च रचना, अतीव आदर...
सुंदर !
सुंदर !
आभार, आभार आभार
आभार, आभार आभार
आवडली !
आवडली !
खुप सुंदर !
खुप सुंदर !
प्रयास भारीच आहे मस्त
प्रयास भारीच आहे
मस्त रचना
खरे गूढ त्या घातपाती क्षयाचे कुणा ना कळाले..... व्वा
निव्वळ अफाट !
निव्वळ अफाट !
कविता समृद्ध आहेच पण काही
कविता समृद्ध आहेच पण काही ओळीत वृत्तभंग झालाय तो आपण लीलया घालवू शकाल ह्याची जाणीव आहे. कृपया त्यावर विचार व्हावा.
गुरू मानले द्रोण आचार्य त्याने मनामानसात
निदिध्यास घेउन एकांत अभ्यास केला वनात
कुणा सांगता गोष्ट तत्वभ्रमाची ? उरे हाच शोक
जिथे शीश आशीष मागे तिथे घाव होतो अचूक
वरती वृत्त कळणार्या बर्याच जणांचे प्रतिसाद वाचले आणि कुणीच हे का निदर्शनास आणून दिले नाही ह्याचे आश्चर्य वाटले.
शेवटचा लघु हा गुरू मानतात वगैरे गोष्टी..... हा वादाचा विषय होऊ शकतो.
असो,
चूक भूल द्या घ्या.
पुनश्च आभार सर्वांचे विदिपा,
पुनश्च आभार सर्वांचे
विदिपा, होय , ''शेवटचा लघु हा गुरू मानतात '' असे नाही तर ''शेवटचा लघु हा वृत्ताच्या गरजेनुसार गुरू मानता येतो '' हेच गृहितक या चारही ओळीत धरले आहे .कारण शेवटचा उच्चार वाचनात नेहमीच लांबवता येतो.
हा वादाचा विषय आहे हे आत्ताच कळले. मीही अधिक माहिती मिळवेन..
ता.क. माझे हे गृहितक अधिकारी व्यक्तीकडून कन्फर्म करून घेतले ..
सुन्दर कविता!
सुन्दर कविता!
<<<शेवटचा लघु हा गुरू मानतात
<<<शेवटचा लघु हा गुरू मानतात वगैरे गोष्टी..... हा वादाचा विषय होऊ शकतो.>>>
परत विनाकारण वादाचा विषय निघाला. शेवटचे लघु अक्षर हे कवितेच्या गरजेनुसार गुरू मानायचे ही फार पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे. कधी कुणी विनोदाने म्हटले असेल की पूर्वीच्या कवींना ssssssssss लिहून उच्चार लांबवायचे सवय होती. असेलही. पण शेवटच्या एका लघु ची एक गुरू मात्रा करणे हे सर्वमान्य असताना फक्त काही गज़लकारांना मान्य नसेल; तर त्यामुळे परंपरा नष्ट होत नाही. चु.भू.दे.घे.