रंगीत पेन्सिल्स - "वेटिंग फॉर द स्टर फ्राय"

Submitted by वर्षा on 14 November, 2013 - 01:07

वेटिंग फॉर द स्टर फ्राय

प्रिझमा प्रिमियम आणि प्रिझमा व्हेरीथीन्स.
बॅकग्राउंडसाठी काही प्रमाणात कोकुयो कॅम्लिन प्रिमियर पेन्सिल्स.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम! कांदे, चेरी टोमॅटो आणि ब्रोकली तर फारच हुबेहुब. Happy

मागे काळा रंग छान दिसतोय पण भाज्यांच्या खाली एखादा लाईट रंग उदा निळा वगैरे वापरला असतास तर अधिक उठाव आला असता.

धन्यवाद सर्वांना!
>>तितकेसे आवडले नाही..
इन फॅक्ट मलाही, कांदे, टोमॅटो बरे आलेत. (पण ते तरंगतायत असं वाटतंय) ब्रोकोली आणि भोपळी मिरच्या बरोबर नाही दिसत आहेत. Proud तुम्हाला काय आवडलं नाही ते ऐकायला आवडेल.
मामी, हो चालू शकेल निळा रंग कदाचित.
>>रंग जरा जास्त भडक झालेत बहुधा.
असू शकेल.
पण यात बरेच रंग होते त्यामुळे मला रंगवताना मजा आली. आता परत काढणार असला प्रकार.

मलाही भाज्या अगदी हुबेहुब जमल्या आहेत असं वाटलं नाही. ब्रॉकोलीची फुलं खूपच विरळ आली आहेत. कांद्याचा रंग छान जमलाय.

तुम्हाला काय आवडलं नाही ते ऐकायला आवडेल >> that's the spirit...
पर्स्पेक्टिव, साधारणतः कांदे आणी टोमेटो आकाराने सारखेच असतात, या कडे थोड लक्ष द्यायला हवे होते..
रंगसंगति बद्द्ल म्हणाल तर, तो वेयक्तिक प्रश्न आहे, प्रत्येकाला वेगवेळे रंग आवडतात.. रंगसंगति आपल्याला चित्र पुर्ण झाल्यावर ते लक्षात येते .. तेव्हा आपण फार काहि करु शकत नाहि... अर्थात हे माझ मत झाले... मि एक चांगला प्रयत्न म्ह्णेल

आधीच्या चित्रांच्या मानानी थोडे जास्त कृत्रिम वाटले हे चित्र. कांद्याच्या कडा इथे तरी पांढर्‍या शुभ्र वाटत आहेत. पण प्रत्यक्षात कांदा चिरल्यावर त्या थोड्या रंग बदलतातच.. ब्रोकोली पण विरळ झालीये.. अर्थात मूळ तशीच असेल कदाचित.. चेरी टोमॅटो मध्ये पण रंग जास्त भडक वाटले..

हा प्रकार कधीतरी ट्राय करुन बघायला पाहिजे.. फुलांची चित्र एलिमेंट्री, इंटरला भरपूर काढली.. फळांची पण काढून बघायला पहिजेत आता..

प्रयत्न चांगला आहे… पण तितकीशी मजा नाही…
पर्स्पेक्टिव चुकल्यासारख वाटतंय, कांद्याच्या मानाने टोमाटो जास्त लहान झालेत… शयाडोस मिसिंग आहेत.

राजू७६, ती चिरलेली पिवळी भोपळी मिरची आहे.
मनीष राजगुरु आणि सौरभ, ते चेरी टोमॅटो आहेत. ते या चिरलेल्या अर्ध्या कांद्यापेक्षा लहानच होते.
हिम्सकूल, नाही ब्रोकोली विरळ नव्हती.
सौरभ, शॅडो मिसिंगबद्दल सहमत.