ढोकळा- वडा चाट.

Submitted by सुलेखा on 12 November, 2013 - 23:53
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ढोकळा-वडा साहित्यः--
१/२ वाटी बेसन,
१/२ टी स्पून मीठ,
१ चमचा लिंबाचा रस,
१ चमचा तेल,
इनो १ टी स्पून,
पाणी .
२ बटाटे--उकडलेले किंवा मावेत /ओव्हन मधे भाजलेले.
लसुण, मिरची,आले जाडसर वाटलेले १ चमचा,
१ चमचा लिंबाचा रस,
अर्धा टी स्पून प्रत्येकी --तिखट,मीठ,बडीशोप,हिंग हळद गरम मसाला ,धणे-जिरे पुड.आणि इनो.
कोथिंबीर.
वरुन सजावटीसाठी--
[यापैकी कोणतेही पर्याय आवडीप्रमाणे/उपलब्ध असतील ते घ्या.]
१[मीठ-साखर घालुन फेटलेले दही, खजुर-चिंचेची गोड चटणी,केचप..कोथिंबीर -पुदिना-मिरचीची हिरवी चटणी,पाण्यात भिजवलेल्या लाल काश्मिरी मिरच्या-लसुण यांची चटणी. किंवा लिंबाचा रस.
२]चाट मसाला.काळे मीठ..हवे असल्यास तिखट-मीठ.
३]किसलेले गाजर,बारीक चिरलेली काकडी-टोमॅटो-बीट-सिमला मिरची.-कांदा.कोथिंबीर
४] वाफवलेले कॉर्न , मटार,शेंगदाणे / खारे दाणे,तिखट/खारी बुंदी. डाळींबाचे दाणे..
५]बारीक शेव.

क्रमवार पाककृती: 

बेसन,मीठ,तेल व लागेल तसे थोडॅ थोडे पाणी मिसळुन मिश्रण तयार करा.बटाटेवड्यांच्या मिश्रणापेक्षा थोडेसे पातळ हवे तरच ढोकळा छान फुगेल.
बटाटे कुसकरुन त्यात वड्यासाठीचे सर्व जिन्नस मिसळा.
त्याचे लहान लहान गोळे तयार करा.
२-३ वाट्यांना तेलाचा हात फिरवुन घ्या.
बेसन मिश्रणात इनो मिसळा व मिश्रण फेटुन घ्या.
गॅसवर कूकर मधे पाणी व एक रिंग त्यावर भोके असलेली /साधी ताटली ठेवा.
वाटीत २ चमचे बेसन मिश्रण घाला.त्यामधे बटाट्याचा लहान गोळा ठेवा..या गोळ्यावर पुन्हा २ चमचे बेसन मिश्रण घाला..
कूकरमधे या वाट्या ५ मिनिटे वाफायला ठेवा. प्रेशर काढुन कूकरचे झाकण लावा.
आता वाट्या बाहेर काढुन थंड झाल्यावर वाटीतला ढोकळा-वडा प्लेट मधे काढा.
Dhokala Chat...JPG
त्यावर सजावट करा.आणि मस्त आस्वाद घ्या..

अधिक टिपा: 

बेसन ऐवजी मुगडाळ वापरता येईल.
तयार भजीपिठ, ढो़कळापिठ,गोटा पिठ चालेल.
बटाट्या ऐवजी रताळे /कंद चालेल.किंवा तांदुळ्पिठी/भाजणी/ज्वारी/मका पिठ+मेथी+दुधी+भोपळा घालुन केलेले गोल गोळे चालतील. अशा रितीने पथ्यकर चाट प्रकार ही करता येईल.

माहितीचा स्रोत: 
माळवी खासियत
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम वेगळा प्रकार.
एकदा तुमच्याकडे यायला पाहिजे फक्त वेगवेगळे पदार्थ खाण्यासाठी. Happy

मिश्रण फेटुन घेतल्यावर ते फुगते, तसं ते किती वेळ वापरता येईल? कारण वाट्या शिजुन बाहेर काढायला ७-८ मिनिटे लागतील ना?

मी ढोकळा करतो (म्हणजे बायको करते, मी पहातो), तेंव्हा मिश्रण शक्य तितक्या लौकर कुकरमध्ये ठेवायची घाई असते, म्हणुन विचारलं.

विजय देशमुख,
अगदी बरोबर आहे.एका वेळेस कूकर/स्टीमर मधे जितक्या वाट्या [३ किंवा ४]ठेवता येतील तितक्याच प्रमाणात बेसन मिश्रणा घेवुन त्यात इनो मिसळायचा.म्हणजे २/३ चमचे उरले तर पुढच्या घाण्यासाठी चालेल पण सगळ्या मिश्रणात इनो घालायचा नाही.लागेल तसे बेसन मिश्रण घेवुन इनो घालायचा.अजुन एक टिप म्हणजे इनो घातल्यावर मिश्रण बटाटे वड्याच्या मिश्रणापेक्षा थोडे पातळ हवे तरच हा ढोकळा फुगेल.नाहीतर "गोल दडस बट्टी" तयार होईल....

खुपच छान . आजच केला हा प्रकार इडली पात्रात केला. कैरी- खजुर चटणी बरोबर सर्व्ह केला. नातींना खुप आवडला. धन्यवाद सुलेखा, तुमच्या पाकक्रुती नाविन्यपुर्ण असतात