तो पापणीस माझ्या...

Submitted by स्वाकु on 12 November, 2013 - 01:53

तो पापणीस माझ्या, ओले करून गेला
पाहून घाव ताजा, वेडा हसून गेला

नाही मला जमेना, हा खेळ मांडलेला
अर्ध्यात जोडलेला, रस्ता खचून गेला

डोळ्यांत सांजवेळी, अश्रू भरून आले,
जाळून काळजाला, अग्नी विझून गेला

आनंद जीवनाचा होतास तू सख्या रे
टाळून तू मला का? वैरी बनून गेला

मागेच टाळलेला, 'स्वानंद' आठवांचा
मागून हा कशाला, अश्रू पुसून गेला

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मतल्याची पहिली ओळ मक्त्याची दुसरी..वा छानच !.. मला लाजवाब वाटल्या>>>

वैभव,

दोन ओळींत आनंदकंद गंडलेय हे सांगायचे नाही का? काय चुकतंय हे सांगितल्याखेरीज सुधारणा कशी होईल? स्वानंदराव म्हणताहेत ते तुझ्या प्रतिसादांतून शिकण्याचा प्रयत्न करीत आहेत म्हणून.....