फोटोग्राफी स्पर्धा..नोव्हेंबर.. "लोककला" निकाल

Submitted by उदयन.. on 11 November, 2013 - 06:43

नमस्कार,

दरमहिन्या प्रमाणे " नोव्हेंबर " महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.

यंदाचा विषय आहे... " लोककला "

दर महिन्याला स्पर्धा अजुन क्लिष्ट करण्याचा मानस आहे..

आता सगळेच सरसावले आहेत.. म्हणुन.."लोककला" हा विषय घेउन आलो आहे.

लोककला हे भारताने जतन केलेलं मौल्यवान ऐश्वर्य आहे. देशातिल ग्रामीण भागात मनोरंजनासाठी आणि प्रबोधनासाठी या लोककलांचा जन्म झाला. तशाच काही लोककला या धार्मिक व आध्यात्मिक श्रद्धांशीही निगडीत आहेत. देशात कुठेही जा, लोककला तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या रूपात भेटते. भारतातिल लोककला इतकी समृद्ध आणि विविधतेने नटलेली आहे की आपल्या दैनंदिन जिवनातली मरगळ एक लोकगित ऐकल्या वर किंवा लोकनृत्य पार कुठल्या कुठे पळुन जाते. तुम्ही ही लोककला तुमच्या आयुष्यात कुठेना कुठे नक्कीच अनुभवली असेल आणि ते क्षण तुमच्या हृदयाच्या कप्प्या सोबतच कॅमेर्‍यातही बंदिस्त केले असतिल. तर तेच क्षण तुम्ही आमच्या समोर उलगडयाचे आहेत. या महिन्याच्या "लोककला" या थीमच्या माध्यमातुन..

माय्बोलीकर जगभरात आहेत म्हणुन जगातील सर्वच लोककला यांचा समावेश करण्यात येत आहे... थोडीफार माहीती त्याबद्दलची लिहिण्यात यावी .. कारण इतरांना माहीती सुध्दा मिळावी

प्रथम क्रमांकः नीधप : रावण तयार झाल्यावर
खुप छान फोटो. रंग छान आले आहेत. फोटो rule of thirds प्रमाणे आहे.

1 nidhap.jpgद्वितीय क्रमांकः नंदिनी: कल्लरेपायट्टू
फोटो मध्ये हाव-भाव, pose व वेग सुरेख टिपला आहे. फोटो थोडासा out of focus आहे पण ठिक आहे.

nandini 2.JPGतृतीय क्रमांकः प्रिया७ :
छान फोटो. वेग आणि poses छान आहेत.

3 priya.JPGऊत्तेजनार्थः फारुक सुतारः
छान pose. हा फोटो अगदी चेहर्‍यासमोरुन हवा होता.

faruk uttejanarth.jpg

आपल्याला शक्य असल्यास ( शक्य कराच ) कॅमेर्‍याची सेटींग्स याचा सुध्दा उल्लेख करावा...... जेणे करुन इतरांना सुध्दा माहीती होईल फोटो काढण्यासाठी काय काय करावे....

जिप्सी, शापित गंधर्व आणि मार्को पोलो ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...

नियमः-

१) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
२) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध संकेतस्थळांवर वापरले जातात
३) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना)
४) जास्तित जास्त २ फोटो......

"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..

चला तर करुया सुरुवात

***********पिकासा वरुन मायबोलीवर फोटो कसे अपलोड करायचे या माहीती साठी खाली*********************
.

http://www.maayboli.com/node/43465

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जपानी सकुरा मात्सुरी (चेरी ब्लोसम) हा महोत्सव दर एप्रिल महिन्यात वॉशिन्ग्टन डी सी येथे होतो, सदर छायाचित्र जपानी कलाकारांचे प्रसिद्ध लोकनृत्य 'ओबोन' करतानाचे आहे. त्यांच्या हातातले 'नारुको' हे लाकडी क्लॅपर्स वापरून केलेले मार्शल आर्टसच्या शैलीतले हे नृत्य प्रे़क्षणीय असते...

DSC_1337.JPG

From December 5, 2013

केरळ ला गेलो असतानाचा फोटो आहे..
भरतनाट्यम की काय प्रकार नक्की लक्षात नाही .. कोणास माहिती असल्यास सांगावे...
परिचीत प्रकारच आहे... माझ्या लक्षात नाहिये..
या नाट्यात असे दाखवले होते की , वर दाखवलेला राजा एका स्त्री च्या प्रेमात पडतो .. आणि कालांतराने ती स्त्री नसुन राक्षस आहे हे त्याच्या लक्षात येते आणि तो तिला वरच्या फोटोत दखवल्याप्रमणे मारायचा प्रयत्न करतो ..
शेवटी वध करतो...
त्या आधी त्या स्त्री वेशातिल पत्राने .. नऊ रस फक्त चेहर्‍यावरील हाव्भावाने प्रकट केले तो हा खालचा फोटो
From December 5, 2013

हे कथकली आहे.
कथकली हा अभिजात कला प्रकार मानला जातो. हा लोककलाप्रकार नाही.
लोककलाप्रकार म्हणजे पारंपरिक असे नव्हे.

भारतीय पारंपरिक कलाप्रकारामधे अभिजात कला आणि लोकधर्मी कला (म्हणजेच लोककला) असे दोन उपप्रकार आहेत.
हाच भेद चित्रशैली व शिल्पशैलींमधेही आहे.
भारतीय पारंपरिक प्रयोगकला किंवा ललितकलांमधे कथ्थक, भरतनाट्यम, ओडिसी, सत्रिया, कुचिपुडी, मणिपुरी, मोहिनीअट्टम, कथकली, कुडियाट्टम हे अभिजात प्रकार तर तमाशा, यक्षगान, दशावतार, खेळे, भारूड, नौटंकी, पंडवानी, कलरी, बिहू वगैरे लोककलाप्रकार आहेत.

नीरजा, तुझ्या पोस्टवरून थोडंसं कळलय. थोडी सविस्तर माहिती दे ना.

अगदी व्याख्या नाही पण काही ठळक मुद्दे आहेत का जे लोककलेला अभिजात कलाप्रकारापेक्षा वेगळे दर्शवतात?

तू दिलेल्या वर्गिकरणावरून खेडेगावातले जे कलाप्रकार आहेत ते लोककला यात येतात आणि नागरी जीवनात (पूर्वीच्या काळी राजदरबारी) सादर केले जाणारे कलाप्रकार म्हणजे अभिजात - असे वाटले मला.

चित्रकलेच्या बाबतीत हे वर्गिकरण कसे केले जाते?

माधव, फार डिटेल लिहावं लागेल. ऑलमोस्ट संशोधनात्मक लेखासारखं आणि आत्ता खरंच वेळ नाहीये. माफ करा.
नागर व ग्रामीण हे फरक आहेतच पण त्यापलिकडे जाऊन त्या त्या कलेचं ग्रामर, नियम व आडाख्यांचे चपखलपण, सादरीकरणाच्या पद्धतींमधला नेमकेपणा/ न-नेमकेपणा इत्यादी गोष्टींवर हे सर्व अवलंबून असते.

नीरजा, वेळ मिळाला की नक्की लिही या विषयावर. वाचायला नक्की आवडेल. कधी आठवण करू विपूत? Happy

उदयन, बाफ थोडासा भरकटवल्याबद्दल सॉरी रे.

निकाल जाहीर करण्यात आलेला आहे

सर्व विजेत्यांचे आनि स्पर्धेत सहभागी होणार्यांचे हार्दिक अभिनंदन Happy

Pages