अजुनही?

Submitted by विजय देशमुख on 9 November, 2013 - 08:20

"हाय विजय"
"हॅलो निमिष, कसा आहेस?"
"ठिक. बरेच दिवस झाले तुला भेटायचं होत"
"मलासुद्धा. खरं तर आपल्या बायका भेटतात, बोलतात, त्यावरुन तुझ्याबद्दल माहीति होती, पण भेटीचा योग आज आला."
"खरय"
"काय रे थकला आहेस की काय?"
"नाही, का रे?"
"नाही चेहर्‍यावर फ्रेशनेस वाटत नाही, बरं आहे ना?"
"मी ठिक आहे रे..."
"कमॉन यार, xxxxxx सारख्या जगप्रसिद्ध कंपनीत आहेस, आमच्यासारखं नाही तुझं. कित्येक भारतीय रोजच भेटत असतील तुला, की कोरियन लोकांचा कंटाळा आला?"
"कोरिअन नाही, भारतीयांचाच कंटाळा आला?"
"म्हणजे, पॉलिटिक्स...?"
"नाही ते ही चाललं असतं, पण माझ्याच ऑफिसमध्ये मी वेगळा पडलोय..."
"का रे?"
"मी xxxxx जातीचा..."
"मग? त्याचा इथे काय संबंध?"
"मला नाही पण इतरांना पडतो"
"..........."
"मी एकटा जेवतो, एकटाच कॉफी घेतो... माझा हात लागलेलाही इतरांना चालत नाही...."
"व्हॉट? अरे हुशार इंजिनिअर ना रे तुम्ही, शिकुनही हीच परिस्थिती?"
"हम्म..."
"मग, आता?"
"यापेक्षा भारतात बरं होतं म्हणायची वेळ आहे, ट्राय करतोय, बदली झाली तर"
"आणि तोपर्यंत?"
"सहन करायचं, दुसरं काय..."
".................."

{द. कोरियातील एका सत्य परिस्थितीवर आधारीत}

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या भारतीयांना XX वर मारून कोरियन लोकांशीच नेटवर्किंग करा म्हणावं. तेथे करीयर मधे त्याचाच फायदा होईल. कोण आहेत हे लोक - मराठी की उत्तरेकडचे? हापिसात तक्रार करा सरळ, जर 'वरचे' ही त्यांचेच चिल्लेपिल्ले नसतील तर.

अरेरे (हे त्या असंस्कृत लोकांसाठी लिहीलय). त्यांच्या बुद्धिमत्तेची कीव आली. अर्थात याचा तुम्हाला मनस्ताप होतच असणार.
विजय तुम्ही अभारतीयांशीच मैत्री करा.

दुर्दैवाने चातुर्वण्य पद्धत अजुनही कोरियन शाळांत शिकवली जाते. त्यामुळे इथे थोडीफार मैत्री झाली की "अजुनही भारतात जाती आहेत का?" किंवा "Are you Brahmin" हा प्रश्न सर्रास विचारला जातो.
यासाठी भारतीय दुतावासाने काही केले असेल, तर ते माहीती नाही. Sad पण जसे आपल्या शाळेतील पुस्तकांत जगाचा भुगोल शिकवताना "बर्फाळ प्रदेशातील लोकं इग्लुत राहतात" यापलिकडे जाउन आधुनिक काळात काय बदल झाले, हे लिहिलेलं नसतं, तसच काहिसं. Sad

काही मजेदार किस्सेही आहेत, ते कधीतरी नंतर.