"डॉ.होमी भाभा बाल वैज्ञानिक" परिक्षेचा अभ्यास कसा करवून घ्यावा ?

Submitted by विनार्च on 9 November, 2013 - 04:44

माझी लेक चौथीला असताना, स्कॉलशीपच्या अभ्यासासाठी जो धागा मी काढला होता त्यावरचे प्रतिसाद मला अभ्यास करवून घेताना फारच उपयोगी पडले होते म्हणून हा धागा काढते आहे.
सहावीत दिल्या जाणार्‍या "डॉ.होमी भाभा बाल वैज्ञानिक" परिक्षेचा अभ्यास कसा करवून घ्यावा ?
मी बाजारात मिळाली ती दोन पुस्तकं आणली आहेत पण त्यात फक्त प्रश्नपत्रीकाच आहेत. पहिली ते सहावीची विज्ञानाची पुस्तके वाचावीत असा सल्ला त्यात दिला आहे. तितकच पुरेसं आहे का?
पहिली परिक्षा पार केल्या नंतर पुढील पायर्‍यांसाठी काय तयारी करावी लागेल ?
ज्यांना ह्या परिक्षेबद्द्ल माहीत आहे किंवा ज्यांच्या मुलांनी ही परीक्षा दिली आहे त्यांनी प्लीज मदत करा.
माझी लेक आता पाचवीला आहे आणि विज्ञान विषयाची तिला खूप आवड आहे. सध्या ती डॉ. बाळ फोंडके यांची "कोण?" "का?" "कसं?" ही पुस्तक वाचतेय......असं तिच बरच आवांतर वाचन सुरुच असत...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विनार्च आणि संतोष सराफ...तुमचं आणि तुमच्या पिल्लांचं मनापासुन अभिनंदन...

मला खुप उपयुक्त माहिती मिळतीये...त्याबद्दल आभार Happy

संतोष सराफ तुमच्या सखोल पोस्ट बद्दल खूप धन्यवाद !
(मोबाइल वरुन टाइप करायला मर्यादा येतात सो डिटेल लिहीता येत नाही आहे. )

विनार्च! आज दोन दिवसांनी इथे आलो आणि तुमच्या अनन्या बद्दलच्या पोस्टने एकदम फ्रेश झालो! धमाल असतात ही लहान मुले.
पण ग्रेट उत्तरे...
मला इथे लाईक कसे द्यायचे ते माहिती नाही. खूप पोस्ट्सना लाईक द्यायचे आहे. त्यातून जिज्ञासा च्या पोस्टला तर स्पेशल लाईक.
मुळात हा धागाच खूप उत्तम आहे...

इथे मिळालेल्या माहितीच्या आधारे कोणत्याही क्लास न लावता तसेच स्वतःचे इतर सगळे उद्योग सांभाळत अनन्या ला ह्यावर्षी ही होमीभाभा चे सिल्व्हर मेडल मिळाले आहे .

इथे मिळालेल्या माहितीच्या आधारे कोणत्याही क्लास न लावता तसेच स्वतःचे इतर सगळे उद्योग सांभाळत अनन्या ला ह्यावर्षी ही होमीभाभा चे सिल्व्हर मेडल मिळाले आहे . >>>>>>>>>>>>>> खूप खूप अभिनंदन न्या !!!!!!

धन्यवाद !
प्रतिभा, वावे, समाधानी,स्वाती 2,मी नताशा,भरत,
प्राजक्ता शिरीन , चैत्रगंधा, मी अनु _/\_

मला वरच्या पोस्ट वाचून या परिक्षेबद्दल खुपच उत्सुकता वाटते आहे. इंटरनेटवर मी यथावकाश माहिती मिळवेनच. माझी मुलगी तिसरीत आहे आणि तिला वाचनाची फार आवड आहे. मी आत्तापासून तिच्याकडून या परीक्षेसाठी काय तयारी करून घेऊन शकते? मी पुण्यात राहते.
-सुरुचि

नमस्कार,

बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेमध्ये (२०१८- २०१९) इयत्ता सहावी साठी माझा मुलगा चि. राघव अविनाश अभ्यंकर याने सुवर्णपदक प्राप्त केले.

या स्पर्धे अंतर्गत वर्ष २०१८-१९ साठी कृती संशोधन प्रकल्प विषय 'परिसर विकासासाठी परिसर सेना' असा होता.

" बदललेल्या जीवनशैलीला उत्तर शाश्वत जीवनशैलीचे" या शीर्षकाखाली त्याने कृती संशोधन प्रकल्प सादर केला.

चि. राघव, सु. प्र संघाच्या सुविद्यालय शाळेत बोरिवली येथे शिकतो. ह्या परीक्षेसाठी, त्याला त्याच्या आईचे मार्गदर्शन लाभले.

Pages