"डॉ.होमी भाभा बाल वैज्ञानिक" परिक्षेचा अभ्यास कसा करवून घ्यावा ?

Submitted by विनार्च on 9 November, 2013 - 04:44

माझी लेक चौथीला असताना, स्कॉलशीपच्या अभ्यासासाठी जो धागा मी काढला होता त्यावरचे प्रतिसाद मला अभ्यास करवून घेताना फारच उपयोगी पडले होते म्हणून हा धागा काढते आहे.
सहावीत दिल्या जाणार्‍या "डॉ.होमी भाभा बाल वैज्ञानिक" परिक्षेचा अभ्यास कसा करवून घ्यावा ?
मी बाजारात मिळाली ती दोन पुस्तकं आणली आहेत पण त्यात फक्त प्रश्नपत्रीकाच आहेत. पहिली ते सहावीची विज्ञानाची पुस्तके वाचावीत असा सल्ला त्यात दिला आहे. तितकच पुरेसं आहे का?
पहिली परिक्षा पार केल्या नंतर पुढील पायर्‍यांसाठी काय तयारी करावी लागेल ?
ज्यांना ह्या परिक्षेबद्द्ल माहीत आहे किंवा ज्यांच्या मुलांनी ही परीक्षा दिली आहे त्यांनी प्लीज मदत करा.
माझी लेक आता पाचवीला आहे आणि विज्ञान विषयाची तिला खूप आवड आहे. सध्या ती डॉ. बाळ फोंडके यांची "कोण?" "का?" "कसं?" ही पुस्तक वाचतेय......असं तिच बरच आवांतर वाचन सुरुच असत...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हि परिक्षा चांगली असते. त्यामुळे मुलांना खुप चांगली माहिती मिळते.
विनार्च तुम्ही कुठे राहता?
माझे मोठे दिर ह्या परिक्षेचे क्लासेस घेतात. मुंबईबाहेर असाल तर कुरियरने पुस्तके घरी पाठवतात.
त्यांची माहिती तुमच्या विपुमध्ये देते.

बाल वैज्ञानिक साठी परिक्षा ? आश्चर्य
वाटलं.>>>>> हो विजय

मी ही दोन वेळा दिली आहे परिक्षा ही शाळेत असताना
ऑब्जेक्टिव टाइप प्रश्न असतात
निर्धारित गुण मिळ्याल्यास मुलाखत वगैरे होते . कट ऑफ अवलंबून असत
आणि सुवर्ण पदक मिळ्त

विनार्च सहाविला आहे ना तुमची मुलगी

तिला बोर्डाची सर्व शालेय विज्ञान विषयक पुस्तके वाचायला सांगा
थोड जनरल नॉलेज देखील
यात पाचवी पर्यतची वाचणे मस्ट आहे। सातवी आठवीची पुस्तके वाचल्यस ऊत्तम ..
मला खुप फायदा झाला होता त्याचा ऊत्तिर्ण होण्यात

वरती वर्षा म्हणतात तसे क्लासेस लावले तर फायदा होईल

या परिक्षेत आणि स्कॉलरशिप परिक्षेत फरक असतो का? म्हणजे प्रश्न विचारण्याच्या पद्दतीत?
वर्षा, मलाही विपू करा माहीती. बघु किती मुलं तयार होतात ते. Happy

विजय तुम्हाला विपु केली आहे.

ही फक्त सायन्सचीच परिक्षा असते. ह्यात mcq (multiple choice questions) असतात आणि ते application based असतात. ही परिक्षा सहावी आणि नववी अशा दोन वर्षी असते. सप्टेंबरमधे लेखी परिक्षा असते त्यात पास झाले तर पुढे प्रॅक्टिकल असतात त्यातही पास झालात तर प्रोजे़क्ट असते. ह्या सर्व ट्प्प्यात पास झालात तर गोल्ड मेडल मिळते.

ह्यासाठी खुप वाचन करावे लागते. थोडे जनरल नॉलेज पाहिजे. पुर्वी ह्या परिक्षेसाठी काहिच मटेरियल उपलब्ध नसायचे. आता बाजारात बरेच मटेरियल मिळते. त्याचा नक्कीच उपयोग होतो. सहावित परिक्षा द्यायची असेल तर पाचविपासुनच अभ्यासाला सुरवात करावी.

धन्यवाद वर्षा.
अभि१ :- केवळ PMO साठी कोणी शास्त्रज्ञ होत नाही. असो, तो वेगळा वादाचा विषय होईल.

अश्विनीमामी,वर्षा,जाई,असामी माहिती बद्द्ल धन्यवाद !

माझ्या लेकीला आज पर्यंत कशासाठी ही क्लास लावलेला नाही कारण ती तयारच नसते कुणाकडेही क्लासला जायला (सो क्लास हा ऑपश्न माझ्यासाठी नाही) ... तिचा अभ्यास तिच करते अन बर्‍यापैकी हुशार असल्यामुळे सक्ती करणे योग्य वाटत नाही. त्यामुळे मिळतील तितकी पुस्तक मी घरी आणून ठेवते ... तिची ती तिला वाटेल तेंव्हा वाचते त्यामुळे मला लवकरच तयारीला लागाव लागत नेहमी...

अश्विनीमामी >>>> हो घेतलेल्या दोन पुस्तकांपैकी एक मेनका प्रकाशनचा प्रश्नसंच आहे दुसरा मनोरमा प्रकाशनचा आहे.

चुनाभट्टीला मराठी विज्ञान परीषद आहे. तिथे चौकशी करता येईल. मुलांसाठी तिथे बरेच उपक्रम चालवले जातात. ( याच नावाचा स्टॉप आहे. प्रियदर्शीनीपासून चालत जाण्याजोग्या अंतरावर आहे. रिक्षाही मिळेल. )

कालच होमी भाभाच्या लेखी परिक्षेचा निकाल समजला...माझ्या लेकीला ७२ गुण मिळुन ती प्रॅक्टिकलसाठी सिलेक्ट झाली....
इथे तसेच इतर ठिकाणी मार्गदर्शन केलेल्या सगळ्या माबोकरान्चे खूप खूप धन्यवाद ___/\___ Happy

प्रॅक्टिकलसाठी साधारण काय तयारी करुन घ्यावी?...
(शाळेत मुलांनी अजून लॅबच तोंडही पाहीले नाही आहे.)

क्या बात है अर्चना. अनन्या व तुझे दोघीन्चे हार्दिक अभिनन्दन.:स्मित: अनन्याला शाबासकी. तिला पुढे जाण्या साठी व प्रॅक्टिकलसाठी खूप सार्‍या शुभेच्छा.:स्मित:

या बद्दल प्लीज सविस्तर लिही, इतराना पण मार्गदर्शक ठरेल.:स्मित:

विनार्चअ,
गोरेगावच्या पाटकर कॉलेजम्ध्ये चौकशी करा , प्रॅक्टिकल्साठी .
तसेच चुनाभट्टीच्या विज्ञान परीषदेत

धन्यवाद ! रश्मी... प्राजक्ता... स्वस्ती.. Happy
आम्ही अभ्यास साधारण कसा केला, ते लिहीते लवकरच.

अभिनंदन अनन्या...

विनार्च, तुम्ही नक्की कुठे राहता ते माहीत नाही, पण ठाण्याला , माधवी घारपुरे प्रॅक्टीकल्स चे क्लासेस घेतात. माझा मुलगाही जातोय. ( तो सिलेक्ट झाला नाहीये तरीही आवड म्हणून ).

आठवड्यातून एकदा २ तास असतो क्लास. त्यांचा नं आहे - ९८२१६ ४००२८. . त्या घरी प्रयोग करायला एक किट ही देतात ( तो वेगळा घ्यावा लागतो ) . जर त्या क्लास शिवाय देणार असतील तर घरी करता येइइल .
ऑल द बेस्ट !

सदरचा क्लास पुण्यात कोण घेतंय हे कळू शकेल का? माझ्या मुलासाठी लावायचाय. मी राहायला बिबवेवाडी/कात्रज ला आहे

अनन्या, अभिनंदन!
विनार्च, तुमचेही अभिनंदन. लेक खुपच हुशार आणि सर्वगुणसंपन्न आहे. (रांगोळी/चित्र इत्यादी)

मुलगा लेखी परीक्षेमध्ये पास झाला, आता प्रात्यक्षिक परीक्षेची तयारी म्हणून घारपुरेंकडे क्लास लावला आहे.

परीक्षेमध्ये काय काय विचारले जाते याबद्दल काही माहिती आहे का? साधारण अंदाज?

त्यांच्या साईटवर गेल्यावर्षीची प्रश्नपत्रीका आहे , ती पाहिलीत का? साधारण अंदाज येइल.

लेकीने प्रॅक्टीकल पार केली आता मिशन प्रोजेक्ट .... मार्गदर्शन करणार्या सगळ्या माबोकरांचे खूप आभार __/\__ Happy

अभिनंदन! तुमचे आणि लेकीचेही.
एकदा सगळ्या तयारीचा प्रवास लिहा.
बर्याच जणांना मार्गदर्शक ठरेल.

Pages