Vegetable Stew

Submitted by स्वप्ना_राज on 3 November, 2013 - 13:16
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

गाजर, फ्लॉवर, कांदा, फरसबी, बटाटा, वाटाणा, हिरवी मिरची, लवंगा, वेलची, दालचिनी, मेथी, मिरी, नारळाचं दूध, मीठ, हळद, पाणी, गरम मसाला, कोथींबिर, तेल, मोहरी, कढीपत्ता, लाल मिरची

क्रमवार पाककृती: 

गाजराचे आणि बटाट्याचे चौकोनी तुकडे करा. फ्लॉवरचे तुकडे करा. हिरवी मिरची, कांदा, फरसबी बारीक चिरून घ्या.
पाण्यात गाजर, फ्लॉवर, कांदा, फरसबी, हिरवी मिरची, बटाटा, मीठ आणि हळद घाला. कुकरमधून एक शिट्टी काढून शिजवून घ्या.
मग त्यात २ लवंगा, १ वेलची, दालचिनीचा तुकडा, अर्धवट कुटून मेथी, अर्धवट कुटून मिरी घाला. आणि पाणी आटेपर्यत शिजवा.
त्यात शिजवलेले मटारचे दाणे घाला. मिक्स करा.
नारळाचं दूध घालून ढवळा. हवं तर मीठ घाला. गरम मसाला घाला.
तेल तापवून मोहरी, कढीपत्ता, लाल मिरचीची फोडणी करा. ती Stew वर ओता. कोथिंबीर घाला.
तांदळाच्या पिठाच्या उकडीच्या भाकरीसोबत सर्व्ह करा.

stew.JPG

अधिक टिपा: 

काजू पेस्ट अथवा खसखस पेस्ट घातल्यास Stew अधिक rich होतो.

माहितीचा स्रोत: 
खवय्ये/चख ले इंडिया/संजीव कपूरचा कार्यक्रम ह्यातलं काहीही असू शकतं. दुर्देवाने माझ्या रेसिपीच्या वहीत त्याची नोंद नाही. पण टीव्हीवर पाहून केलेली रेसिपी आहे हे नक्की.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान प्रकार आहे. स्ट्यू हा प्रकार आपल्याकडे युरपमधून आला. तिथे दाटपणासाठी नारळाचे दूध न वापरता कणीक किंवा मैदा वापरतात. फोडणीही नसते आणि तो शक्यतो ब्रेड्बरोबर खातात.
हे भारतीय व्हर्जनही चांगले आहे.

हो दिनेशदा, हा स्ट्यू खूप छान लागतो. विशेषतः थंडीच्या दिवसात. पण ह्या रेसिपीकडे कोणी फिरकलेलं दिसत नाही Uhoh

हा केरळी प्रकार आहे. अप्पम बरोबर खातात. ह्यात स्टार अनिस, जुलियन केलेले आलं घालून बघा, मस्त चव येते. प्लेटमध्ये अप्पम (मी उत्तपा करते) घेऊन, वरून दोन-तीन डाव हा स्ट्यू ओतायचा. स्ट्यूमध्ये भिजलेल्य अप्पमला भाज्या लावून खायच्या. कोथींबिर, हळद, गरम मसाला, कढीपत्ता, लाल मिरची, मेथी केरळी वर्जनमध्ये नसते.

>>ह्यात स्टार अनिस, जुलियन केलेले आलं घालून बघा
पुढल्या वेळी नक्की. Happy

साधना, खर्ंच करुन बघ. वर्षा मेल करतेच.