भगवान बुद्ध : सत्याचा सर्वोत्तम शिक्षक

Submitted by human being on 3 November, 2013 - 06:04

भगवान बुद्ध, एक सर्वोच्च परिपुर्ण सम्यक संबुद्ध ( संपुर्ण जागृत). स्वतःच्या तेजोमय प्रकाशाने ज्याने ह्या विश्वातील अंधकार नाहीसा केला असा उज्ज्वल सुर्य म्हणजे तथागत भगवान बुद्ध..

तो आमचा मार्गदर्शक तारा आहे,, तो आम्हाला दुःखमुक्तीचा मार्ग सांगतो...

एक असा ज्याने संपुर्ण आयुष्यभर सर्व प्राणीमात्रांच्या सुखाकरिता प्रज्ञा, शील, व करुणेचा प्रसार केला... असा सत्याचा शिक्षक.

काय तो ईश्वर आहे?? ईश्वराचा अवतार किंवा त्याचा पुत्र आहे?? असा त्याने कधी दावा केला आहे काय? काय तो आपल्यासारखा मनुष्य आहे??

एक दिवस एका ब्राह्मणाने सम्यक संबुद्धाशी संपर्क साधला. आणी काही प्रश्न विचारले,,, आदरणीय महोदय,, तुम्ही यक्ष, गंधर्व किंवा इंद्र आहात काय? तुम्ही देवता आहात काय?? ईश्वर पुत्र आहात? ईश्वराचा अवतार आहात? कि तुम्ही ईश्वर आहात?? कि मनुष्य आहात??

ब्राह्मणाच्या ह्या प्रश्नावर,, पवित्र सम्यक संबुद्ध उत्तरले,, हे ब्राह्मणा,, मी त्या कमळासारखा आहे कि जो चिखलातुन बाहेर येतो.. मी यक्ष, गंधर्व किंवा इंद्र नाही. कारण मला अश्रु येत नाही, दुःख होत नाही..माझे आश्रव क्षीण झाले आहेत. मला तु संपुर्ण जागृत असा समज..

सर्वोच्च बुद्ध हे गंधर्व, यक्ष, इंद्र, ब्रह्मा आणी मनुष्य हे सर्वांच्या पलीकडे गेले आहेत..

सर्वोच्च सम्यक संबुद्ध आजपर्यंत झालेला जगातील महान शिक्षक होता.

त्या प्रज्ञावंत भगवान बुद्धाला आपण आपला शिक्षक का मानतो??

त्यांच्या एका महान शिष्य,, एका महान अरहंताच्या शब्दात :

अरहंत सेनेका (एक असा भिक्खु जो जन्म आणी मृत्युच्या बंधनातुन मुक्त झालेला आहे.) त्याने म्हटले,,

तो (सम्यक संबुद्ध) त्याच्याकडे सर्वोच्च प्रज्ञा आहे. तो आपल्या महान शिष्यांसाठी प्रज्ञेचा सर्वोच्च शिक्षक आहे. तो साऱ्या विश्वात सर्वोच्च आहे. तो सर्व देव आणी मनुष्यांसाठी सत्याचा शिक्षक आहे. अर्हंत सम्यक संबुद्ध, विद्या व आचरणांनी युक्त, सुगती ज्याने प्रगती प्राप्त केलेली आहे. सर्वश्रेष्ठ, दमनशील पुरुषांचा सारथी व आधार देणारा देव व मनुष्य यांचा गुरु असा हा भगवान बुद्ध आहे.अशा प्रज्ञावंताला पाहणे दुर्मीळ आहे.

तो एका शक्तीशाली हत्ती सारखा आहे. त्याच्यात असे महान प्रयत्न सामील आहेत. त्याच्यात महत्त्वकांक्षा आहे. तो सर्व दुःखमुक्त आहे.

भगवान बुद्धाच्या शिष्याने त्याची इतकी प्रशंसा का केली आहे?? त्या सर्वोच्च सम्यक संबुद्धाचे गुण काय आहेत?

भगवान बुद्ध हे अरहंत आहेत : संपुर्ण जागृत असा परिपुर्ण..

सम्यक संबुद्ध ह्यांनी मनाला होणाऱ्या विकारांवर कसा उपचार करता येईल याचा शोध लावला, ते,, राग, लोभ, द्वेष, मत्सर, मोह, कामवासना,इत्यादी, विकारांपासुन मुक्त होते.

भगवान बुद्धानी सर्व प्रकारच्या भावनांवर विजय मिळवला होता. त्यांचे शरीर वाणी आणी मन शुद्ध होते. म्हणुनच आम्ही त्यांच्यासाठी पुढील गाथा म्हणतो...

इतिपी सो भगवा अरहं सम्मा संबुद्ध, विज्जाचरण संपन्नो सुगतो लोकविधु अनुत्तरो पुरिसधम्मसारथी सत्था देवमनुस्सान बुद्धो भगवा ति!

यात सम्यक संबुद्ध म्हणजे ,, पुर्ण पणे प्रबुद्ध,, कोणत्या गुरु विना ज्याने चार आर्य सत्य समजले असा.

विज्जाचरण संपन्नो म्हणजे जो सत्य प्रज्ञा समजुन घेतो आणी त्याला आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो असा.

•सुगतो : असा ज्याने आर्य अष्टांगिक मार्गाचा पालन करुन निर्वाण पद प्राप्त केले आहे.

•लोकविधु : सर्वोच्च ज्ञानी,,, ह्या विश्वाचे सत्य जाणणारा. ह्या विश्वाचे मुळ ज्याला समजला, सर्व प्रकारच्या संसारापासुन मुक्ती आणी विश्वाची समाप्ती ज्याला समजली असा.

•पुरिसधम्मसारथी : श्रेष्ठ व दमनशील पुरुषांचा सारथी असा हा आमचा शिक्षक ज्याने कोणत्याही हत्याराविना आपल्या असीम करुणेने सर्वांना जिंकुन घेतले असा..

•सत्था देवमनुस्सान : असा हा भगवान बुद्ध सर्व देव आणी मनुष्यांचा गुरु आहे.

•बुद्ध : कोणाच्याही मदतीशिवाय ज्याने देव आणी मनुष्यांच्या कल्याणाकरिता चार आर्यसत्य जाणुन घेतले. दहा पारमिता पुर्ण करुन निर्वाण पद प्राप्त करुन घेतले असा.. महान प्रीती आणी करुणेचा शिक्षक..

•भगवा : The blessed one.. एक धन्य, पवित्र असा.. (वासनामुक्त)

भगवान बुद्ध आमचा महान शिक्षक, फक्त तोच असा पवित्र शिक्षक आहे ज्यामध्ये वरील सर्व गुण आहेत..

असा हा प्रज्ञावंत करुणासागर बुद्ध, सर्व वैज्ञानिक , आत्तापर्यंत झालेले सर्व तत्वज्ञानी , आणी विश्वातीलातील सर्व प्रकारच्या देव आणी मनुष्यांमध्ये श्रेष्ठ आहेत.

त्यांच्या शिकवणीतुन आम्हाला हे समजते कि ती सर्व प्रकारच्या विज्ञानापेक्षा खुप पुढे आहे. आजचा विज्ञान बुद्धाच्या ज्ञानापुढे अजुनही मागासलेला आहे. भगवान बुद्धांनी अडीच हजार वर्षांर्वी जो शोध लावला,, तो शोध विज्ञान आत्ता लावत आहे. तर अनेक शोध अजुन लागलेले नाही आहेत.

आत्तापर्यंतच्या कोणत्याच शिक्षकाने स्वतः परिपुर्ण असल्याची योग्यता सिद्ध केली नाही. जि भगवान बुद्धाने केली आहे. म्हणुन तो परिपुर्ण असा, मौल्यवान रत्न, आणी संपुर्ण जागृत असा सम्यक संबुद्ध सर्वोच्च शिक्षक आहे.

खरेच तो धन्य होता. तो सर्वोच्च विद्वान होता त्याच्यापाशी संग्रहवृत्तीचा लेशही नव्हता. तो उत्साही आणी कष्टाळु होता. त्याला पापाची घृणा वाटत असे. क्षमाशिलतेत तो पृथ्वीसमान होता. त्याने आपल्या मनात क्रोधाला कधीही प्रवेश करु दिला नव्हता. कोणत्याही इच्छेच्या आहारी तो गेला नव्हता. विकार-वशतेवर त्याने विजय मिळवला होता. करुणा, बंधुभाव आणी प्रीती ही त्याच्या ठायी परिपुर्ण होती....

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनुष्याने मनुष्याशी ,इतर प्राणीमात्रांशी कसे वागायचे ते शिकवले .हाच तो धर्म .देव ,आत्मा ,कर्म यांना त्यांत स्थान नाही .त्यामुळे क्रियाकर्म ,पापपुण्य ,स्वर्ग नरक या भाकड गोष्टी नाहित .

चांगला धर्मप्रसार
ले़ख आवडला बु॒द्ध मला आवडतो तो छान माणूस आहे असे मला वाटते पण त्याने जे ज्ञान सांगीतले/ प्राप्त केले ते त्या आधीही इतरही अनेक लोकांनी प्राप्त केले असावे असे मला वाटते पण् त्याने ते मिळवल्यावर आम जनतेला किती सहज बनवून उपलब्ध करून दिले असेच लोक/इतिहास पुरुष मला आवडतात

>>त्यांच्या शिकवणीतुन आम्हाला हे समजते कि ती सर्व प्रकारच्या विज्ञानापेक्षा खुप पुढे आहे. आजचा विज्ञान बुद्धाच्या ज्ञानापुढे अजुनही मागासलेला आहे. भगवान बुद्धांनी अडीच हजार वर्षांर्वी जो शोध लावला,, तो शोध विज्ञान आत्ता लावत आहे. तर अनेक शोध अजुन लागलेले नाही आहेत. <<
इथे बुद्धाच्या ऐवजी काही लोक आपापल्या अस्मितादर्शक प्रतिके घालतात. उदा. आमच्या पुर्वजांनी, वेदात, उपनिषदात, वगैरे वगैरे...

आजचा विज्ञान की आजचे विज्ञान?

बुद्धाने कुठला शोध लावला?

वर प्रकाश म्हणतात तसं अस्मितादर्शक प्रतिके फक्तं बदलतात.

बाकी बुद्धाची आणि आजच्या विज्ञानातल्या शोधांची तुलना कशाला?
त्याशिवाय त्याचे श्रेष्ठत्व कमी दर्जाचे ठरणार आहे का?

मला जसा गणपती आवडतो, तसाच बुद्धही आवडतो. जसं लहान मुलाला गणपती त्याचा मित्र वाटतो, तसे हे लोकं/ प्रतिकं मला मित्र वाटतात.

पण ते सर्वोत्तम, इतरांशी तुलना, अत्यंत चुकीची वाटते. त्यामुळे इतर चांगल्या व्यक्ती/ प्रतिकांचा आपण अभ्यासच करु शकत नाही किंवा त्यांना समजुन घेण्याचे मार्गच बंद करतो असं वाटते. असो. लेख चांगला आहे.

@इब्लिस : तो लेख मी नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला लिहिला होता म्हणून खाली तो संदेश दिला आहे…। परंतु तुमच्या म्हणण्यानुसार मी तो भाग तिथून काढलेला आहे

@साती : मुळात ति तुलना नाहीच, तर भगवान बुद्धांचे सांगीतलेले गुण आहेत...

सर्वांचे आभार..... मंगल मैत्री

human being,
अहो, तो भाग काढून टाकायला नव्हतो सांगत मी. massage हि स्पेलिंग मिस्टेक होती. message असे हवे होते. तुम्हाला 'मेसेज' द्यायचाय, तुम्ही 'मसाज' देत होता तिथे.

हयुमन बिन्ग,
तुमच्या लिखाणात काही काही ठिकाणी इतक्या ढोबळ चुका आहेत , कि वाचताना खुपच खटकते
मला वाटते की प्रूफ रीडीन्ग बरोबर होत नसावे. माझी एक सुचना आहे " लेख प्रसिद्धिस देण्यापुर्वी
मजकडे पाठवित जा . मी , मजकुरात फेरफार न करता , त्यावर योग्य ती दुरुस्ती करुन , तुमच्याकडे
परत पाठवीन, विना मोबदला ! ! "
अशीच सुचना मी वेब साईटवर सुद्धा पाठविली आहे , पण प्रतिसाद मिळाला नाही.
मला भगवान बुद्धान्बद्दल खुप आदर आहे त्यान्ची शिकवण मी मनापासुन आचरणात आणण्याचा प्रयत्न
करीत असतो, पण मराठी बद्दल तेव्ह्ढेच प्रेम आहे.

भगवान बुद्धांबद्दल प्रेम आहे. श्रद्धा आहे. आदर आहे. सगळंच आवडतं पण.

फक्त लेख मार्केटिंगवाला असल्यानं आता असह्य व्हायला लागलय. इरीटेट व्हायला लागलय मार्केटिंगमुळं. पेशन्स संपत चाललेत. क्रिकेट, धर्म, पक्ष, मोदी, राहुल, दर शुक्रवारी रीलीज होणारा पिक्चर, बिनडोक शिरेली. असह्य होतंय.

मार्केटिंगवाला लेख ? म्हणजे कसला लेख?

( आणि समजा असलाच मार्केटिंगवाला, तरी तुमच्याच देवाच्या ९ व्या अवताराबद्दल आहे ना? मग असह्य का व्हावे? Happy )

-----
हास्पिटलात बसून रोज म्हातारा-आजारी मनुष्य - मढे हे त्रिकूट बघणारा मिनीबुद्ध संजिव

बुद्धविचारांबद्दल जो आदर (आणि उत्सुकता) आहे, ते अशा प्रकारच्या गुणगायनपर लेखांमुळे किंचितही वाढत नाही. काहीतरी ठोस, गंभीर, वैचारिक लिहा राव ! हे काय आहे? बुद्धांवरचा लेख कसा असला पाहिजे !

त्यांच्या शिकवणीतुन आम्हाला हे समजते कि ती सर्व प्रकारच्या विज्ञानापेक्षा खुप पुढे आहे. आजचा विज्ञान बुद्धाच्या ज्ञानापुढे अजुनही मागासलेला आहे. भगवान बुद्धांनी अडीच हजार वर्षांर्वी जो शोध लावला,, तो शोध विज्ञान आत्ता लावत आहे. तर अनेक शोध अजुन लागलेले नाही आहेत. आत्तापर्यंतच्या कोणत्याच शिक्षकाने स्वतः परिपुर्ण असल्याची योग्यता सिद्ध केली नाही. जि भगवान बुद्धाने केली आहे.

काय सांगता?
या अशा दाव्यांबद्दल आम्ही बुद्धांचा पुढील उपदेश प्रमाण मानतो-

“Do not believe in anything simply because you have heard it.
Do not believe in anything simply because it is spoken and rumored by many.
Do not believe in anything simply because it is found written in your religious books.
Do not believe in anything merely on the authority of your teachers and elders.
Do not believe in traditions because they have been handed down for many generations.
But after observation and analysis, when you find that anything agrees with reason and is conducive to the good and benefit of one and all, then accept it and live up to it.”

हे विचार खर्‍या अर्थाने बुद्धाला आदरणीय ठरवतात, नाही का?

तरी तुमच्याच देवाच्या ९ व्या अवताराबद्दल आहे ना? मग असह्य का व्हावे?

हे आणखी एक. संशयपिशाच्च. कशातही काहीही दिसणे. सचिन आज बेकार खेळला म्हटलं कि ब्राह्मणद्वेष तसं. ज्यांच्या झुंडी त्यांच्या मतांची तानाशाही झालीय. आम्ही म्हणू तेच हा प्रॉब्लेम आहे. आणि उघड मात्र मोठमोठ्या गप्पा मारायच्या.. तुमच्याशी सहमत नसलो तरी तुमच्या मताचं प्राण गेला तरी रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे.
घंटा !

आम्ही संशय पिशाच्च आणि तुम्ही कोण? अंगुलीमाल का?

दुसर्‍याच्या बोटातून काही चांगलं झरलं की त्याची बोटं कापून गळ्यात घालून फिरणारे अंगुलीमाल इथे कमी नाहीत . नै का?