गेले भिजून डोळे...

Submitted by स्वाकु on 2 November, 2013 - 00:53

जागली रात्र सारी गेले थकून डोळे
मिटताच पापण्या आज गेले भिजून डोळे

सुचले जरी शब्द मला, मांडू कसे कळेना
मांडताच शब्द माझे, आले भरून डोळे

अश्रू पुसून टाकी ते ओठांवरचे हसू
तरी शोक अंतरीचा पाही कुठून डोळे

आज भयाण शांतता किती ग बोलकी होती
हुंदके देत देत ते गेले सुकून डोळे

कोरून जखमा जुन्या अश्रूंना पूर आला
अश्रूंशी नवे नाते गेले जोडून डोळे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लय समजली नाही
बहुधा केवळ मात्रा गणीतीय पद्धतीने १, २ ,३ , ४ , ५ ...अश्या जुळवल्या आहेत आपण (मला तसे वाटले मी मोजल्या नाहीत नेहमीप्रमाणे )
असो