दिवाळी फराळ.--शंकरपाळे,बेसन लाडु,बालुशाही.

Submitted by सुलेखा on 30 October, 2013 - 07:03
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ दिवस
लागणारे जिन्नस: 

नमकिन काजु-
साहित्यः- १ वाटी मैदा,१ वाटी बारीक रवा,३/४ वाटी कडकडीत तेलाचे मोहन,३/४ कप कोंबट दूध, १/२ चमचा मीठ,१ सपाट चमचा ओवा,१/२ चमचा मिरेपूड्,तळण्यासाठी तेल -१ १/२ वाटी.लहान टिणाचे झाकण [काजु चा आकार देण्यासाठी]
कृति--सर्व जिन्नस एकत्र करुन पिठ भिजवा.अर्धा तास मुरु द्या.प्लास्टिक शीट वर लाटुन टिणाच्या झाकणाने आकार कापा.गरम तेलात मंद आचेवर तळा.
खुसखुशीत नमकिन काजु तयार आहेत.
khare.JPG
गोड शंकरपाळे-
साहित्यः-१ वाटी दुध, १ १/२ [दिड वाटी]वाटी साखर,३/४ वाटी तूप एकत्र करुन साखर विरघळेपर्यंत गरम करा.हे मिश्रण थंड करा. ४ वाट्या मैदा घेऊन त्यात चिमुटभर मीठ घाला.
कृति--थंड झालेल्या मिश्रणात मैदा भिजवा.अर्धा तास मुरु द्या.गरम तेलात अगदी मंद आचेवर तळा.कढईतल्या शंकरपाळ्यांचा रंग अगदी किंचित गुलाबी झाला कि लगेच झार्‍याने बाहेर काढुन पेपर नॅपकिन वर ठेवा..सुरवातीला मऊ असणारे शंकरपाळे थंड झाले कि थोडेसे कडक पण खुसखुशीत होतात.
goad.JPG
बेसन लाडु-
साहित्यः-४ वाटी बेसन ,साधारण १ १/२ वाटे तूप, २ वाटी साखरेची मिक्सरमधे केलेली पिठीसाखर ,वेलची पूड,२
टेबलस्पून चारोळी.
कृति-- बेसन कोरडेच तूप अजिबात न घालता मंद आचेवर किंवा मायक्रोवेव्ह मधे खूप छान गुलाबी रंगावर भाजुन घ्या.हे भाजलेले पिठ थंड करा..एका पातेलीत तूप वितळण्यापुरते गरम करुन घ्या.
भाजलेल्या बेसन पिठात पिठीसाखर,वेलची पूड,चारोळी मिक्स करा.आता त्यात पातळ केलेले तूप घाला.सर्व मिश्रण छान कालवुन लाडू वळा.हे लाडू वळल्यावर पेढ्यासारखे चपटे न होता गोल आकारातच रहातात.एकदा बेसन पिठ कोरडे भाजलेले असले कि केव्हाही करता येतात..
Besan ladu.JPG
बालुशाही:--
साहित्यः--मैदा -१ कप,१/२ टी स्पून खाण्याचा सोडा,३ टेबलस्पून तूप,३ टेबलस्पून दही,चिमुटभर मीठ,.पाऊण कप साखरेचा १ १/२ तारी पाक, तळण्यासाठी तूप ३/४ कप.
साखरेत,साखर भिजेल इतके पाणी घालुन १ ते १/२ तारी पाक तयार करुन ठेवा.
.मैद्यात मीठ,त्यानंतर अनुक्रमे तूप व दही घालुन मिक्स करा .गोळा तयार करा.फक्त एक चमचा पाणी लागले तर घाला .अर्धा तास हा गोळा मुरु द्या.कढईत तूप मंद गॅसवर तापायला ठेवा.मुरलेल्या गोळ्यातुन पेढ्याचा आकाराच्या बालुशाही करा.त्यामधे अंगठयाने दाब देवुन खळगा करा. गरम तूपात अगदी मं द आचेवर तळा.कढईत ४-५ बालुशाही सोडल्यावर त्या एका बाजुने तळल्या गेल्या/शिजल्या कि वर येतात.आता त्याची बाजु पलटा.अगदी मंद गॅसवरच तळायच्या आहेत ,नाहीतर आतुन कच्च्या रहातील.जर कढईचा तळ पातळ असेल तर त्याखाली तवा ठेवा म्हणजे आच कमी लागेल. गुलाबी रंगावर या बालउशाही तळुन घ्या.एका घाण्याला साधारण ८ते१० मिनिटे लागतात.तरच त्या आतुन खरपूस तळल्या जातील.तळलेल्या बालुशाही थंड करायला ठेवा.या थंड झालेल्या बालुशाही,थंड पाकात किमान १ ते १/२ तास ठेवा.त्यानंतर या बालुशाही पाकातुन बाहेर काढुन ठेवा.खूप छान खुसखुशीत बालुशाही तयार
Balushahee.JPG.

क्रमवार पाककृती: 

या प्रमाणात साहित्य घेवुन तळताना विशेष काळजी घेतली तर सर्व पदार्थ मस्त होतील.

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा!
मस्तं.
आमच्या सारख्यांसाठी अगदी पर्फेक्ट रेसिपी दिल्यायत.
Wink

लाडवाची आयडिया छान आहे. आई बहुतेक असंच करते पण भाजताना सगळं नाही तरी २ चमचे तूप तरी घालतेच . विचारायला पाहिजे.