अंतर्नाद

Submitted by बागेश्री on 29 October, 2013 - 23:57

अनेक न निनादलेल्या घंटाचा गुच्छ..
त्या तिथे
शरीरात..!

बेसावध क्षणी कुठलीतरी वायुलहर
शरीरमर्यादा ओलांडून आत शिरते..
अन्..

घंटांची एकत्रित किणकिण कानी येते
आजवर कधीही न ऐकलेला,
तो सूर
आपल्याच आतून...

बाहेर आपण सैरभैर...

आत महत्त्व न दिलेल्या भावना,
असहाय्य- अगतिक, निजलेल्या..!
आता मात्र संधिसाधू,
सोबत करतात त्या त्रयस्थ लहरीची....

आता आतल्या आत बेभान तरंग...
सौम्य निनादाचं उग्र होणं...
कानातून बाहेर फुटू पाहणं...

आतली धुमश्चक्री इतरांना कळू नये म्हणून,
डोळा सावध!
शब्द ओठबंद!

नजर दूर कुठेतरी हरवून ठेवलेली...

आपण आपल्याला कधी-कधी इतके नकोसे होतो?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

आवडली

अनेक न निनादलेल्या घंटाचा गुच्छ..,
वायुलहरसौम्य निनादाचं उग्र होणं...,
कानातून बाहेर फुटू पाहणं...,
डोळा सावध!,
शब्द ओठबंद!,
आपण आपल्याला कधी-कधी इतके नकोसे होतो?

हे सर्व म्हणजे बगेश्रीची छाप........... सुंदर............. नेहमीसारखंच................ खास......... Happy

छान.....
"आता आतल्या आत बेभान तरंग...
सौम्य निनादाचं उग्र होणं...
कानातून बाहेर फुटू पाहणं..."
हे सर्वात विशेष.

उत्तम !
आतली धुमश्चक्री इतरांना कळू नये म्हणून,
डोळा सावध!
शब्द ओठबंद! >> फार आवडेश .