आमची जंगलरूम

Submitted by सावली on 29 October, 2013 - 00:52

आमची जंगलरूम.

आमच्या घरात आम्ही खोल्यांना नावे दिली आहेत. ओशन रूम, जंगलरूम, स्काय रूम इत्यादी. बाकीच्या खोल्यांमध्ये नावाप्रमाणे काही सजावट नाही मात्र जंगलरूममध्ये जंगलाचे चित्र काढायचे असे बरेच आधी ठरवून ठेवले होते. या चित्रातल्या प्रत्येक प्राण्याला काहीतरी नाव आहे आणि त्या प्राण्यांच्या कथाही आहेत. कथा पुन्हा केव्हातरी इथे देईन. तोवर आमची जंगलरूम बघा.

इथे अजून टेबल, बेड इत्यादी काही केले नाही. सध्या पसारा मांडून खेळायला जागा हवीये. जरा मोठी झाली की बाकीचे करून घेणार. ते साधेच , मोठे झाल्यावरही वापरता येईल असे असणार आहे.

१ - दरवाज्यातून आत आल्यावर उजवीकडे पियानो , पुस्तकाचे कपाट

२ - पूर्ण भिंतीवरचे चित्र. या भिंतीला लागून असलेल्या भिंतीवर खिडकी आहे.

३.  खिडकीच्या बाजूला मोठे भिंतीतले कपाट.

४. दरवाज्याच्या डावीकडे व्हाईट बोर्ड आणि त्याखालचे चित्र. व्हाईट बोर्डच्या वर सरस्वतीचे चित्र येणार आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

येस ये मैने देखा है!
हे फार सुंदर काम केलं आहे तिने. इन फॅक्ट सावलीने अख्खं घरच मस्त सजवलं आहे.
अस्वलाच्या वरची फ्रेमही मस्त दिसतेय.

अर्रे व्वा!!! खरंच सुंदर!!! Happy असं स्वतःच रंगकाम करून रूम सजवायचा एक ऑप्शन आहेच!! फक्त आमची आपली जमेल तशी कलाकारी!

अरे अ‍ॅक्वा रुमपण मस्तयं.. Happy
मला माझ्या रुममधे मस्त कलरफुल फुलपाखरु हवयं.. कोण देणार का काढुन?
जेव्हा रुम होईल तेव्हाच कॉन्टॅक्ट करेन Happy

छान आहे,
माझ्या मुलींच्या अशीच अ‍ॅनिमल किंगडम केली होती... कुत्री, मांजर आवड्त म्हणून. मोठी झाल्यावर बदलले ते चित्र..आता मोठी झाल्यावर वेगळेच मानवप्राणी दिसताहेत भिंतीवर Proud सगळे फूटबॉल प्लेअर्, टेनिस प्लेअर्स, नट,गायक (हॉलीवूडच) वगैरे भरलेत...

मस्त.

पोरासाठी गाड्या, विमानं, रणगाडे, ट्रॅक्टर इ.इ.इ रंगवायचं आहे. पण सध्या तरी त्याला हवं ते रंगवू देतेय भिंतींवर. एखाद्या वर्षानी बघू आम्ही रंगवायचं.
आम्ही सध्या क्रेयॉन्स, पेन्सिल्स, , फिंगर कलर्स, पेन्सिल कलर्स, आईचे अ‍ॅक्रेलिक कलर्स, पेंट पेन्स, थ्री डी आउटलायनर्स, मार्कर्स आणि अजून जे काही रंगवण्याजोगं, लिहिण्याजोगं सामान सापडेल त्यानी घरातल्या लिहिता येण्याजोग्या सगळ्या सरफेसेसवर (भिंती, फ्रीज, खुर्च्या,चादरी, टेबल, कपाट, माझे रिकामे कॅनव्हास, स्पेशल रंगकामाचे माझे कागद,मी रंगवण्यासाठी बनवून घेतलेले एमडीएफचे कोस्टर्स, ट्रे,ज्वेलरी बॉक्सेस इ.इइ.) वर रंगरंगोटी, रेखाटनं, झालंच तर त्याची वारली आणि मधुबनी डिझाइन्स (????), हिंदी- इंग्रजी मुळाक्षरं, आकडे यातलं जे वाटेल ते भरण्याच्याच फेजमध्ये आहोत.
कोण जाणे ही फेज किती वर्ष असते. (सध्या वय वर्ष पाच)

थँक्यु लोक्स.
केपी, मस्त आहे अ‍ॅक्वारुम पण.

पियानो किंवा सिंथेसायझर मला हवा आहे. >> मी जपानमधे घेतलेला आहे. माझा कॅसियोचा प्रिविया आहे. हवा असल्यास इथली किंमत विचारुन सांगु शकते. भारतात कॅसियो आणि यामाहा फेमस आहेत. सिंथेसायझर/ किबोर्ड पण घेता येईल तो बंद करुन कपाटात ठेवता येतो. हा बराच साफ ठेवावा लागतो.

वरची चित्र काढायला कोणते रंग वापरलेस? >> अ‍ॅक्रिलिक कलर्स. भिंतीला एशियन पेंट्च्या रॉयल इमल्शनची लेमन यलो शेड आहे. त्यावर अ‍ॅक्रिलिक कलर्स सहज बसतात.

वर्षा, स्पेशल थँक्यु Blush

मोठी झाल्यावर वेगळेच मानवप्राणी दिसताहेत भिंतीवर >> Lol

कोण जाणे ही फेज किती वर्ष असते. >> माहित नाही गं. आमच्याकडे ही फेज आलीच नाहीये. म्हणुन आत्ताच रंगवलं आम्ही.

पियानोसमोर बसून मनात येतील ती, आठवतील ती गाणी वाजवत बसावं. >> ललिता, दात आहेत तर.. वाली म्हण आठवली. तो पियानो असुन मला / नवर्‍याला काहीच वाजवता येत नाही. लेक शिकतेय अजुन. तीला स्केल्स प्रॅक्टीस करायला कंटाळा येतो. कधी कधीच करते. तुला पियानो वाजवावासा ( एका शब्दात किती वा!) वाटला तर केव्हाही ये घरी.

काय सुंदर रंगवलीयेस गं रुम !! खुप छान..
पुढेमागे माझं घर होइल तेव्हा मलाही आवडेल असं काही करायला.

त्या पियानोनंच माझं अधिक लक्ष वेधून घेतलं. घरात मी एकटीनंच असावं, सर्व काम उरकलेलं असावं, आसपास शांतता असावी आणि मग त्या पियानोसमोर बसून मनात येतील ती, आठवतील ती गाणी वाजवत बसावं. अहाहा! तहान-भूक सगळं विसरायला होईल मला. >>>>>>>>> +१००००००००१

Pages