आठवणी - नॅशनल पार्कस भटकंतीतल्या - भाग ३.१ : यल्लोस्टोन नॅशनल पार्क

Submitted by रायगड on 24 October, 2013 - 13:49

याआधीचे लेख :

भाग १ : http://www.maayboli.com/node/45931

भाग २.१ : http://www.maayboli.com/node/45966

भाग २.२ : http://www.maayboli.com/node/45986

***************************************************************

३. यल्लोस्टोन नॅशनल पार्क : Land of surprises

आदल्या वर्षी ग्लेशिअरच्या स्वर्गीय अनुभवानंतर २००५ च्या उन्हाळ्यात ४ जुलैच्या लंबविकांताला जोडून सुट्टी घेऊन अजून २ दिवस असे यल्लोस्टोन करू असे ठरले. परत एकदा कॅपिंग करू असे ठरले.
सिअ‍ॅटल ते यल्लोस्टोन हा जवळपास १२-१३ तासांचा ड्राईव्ह आहे. जवळात जवळचा commercial airport
आहे, बॉईसी, आयडहो येथे. सिअ‍ॅटल ते बॉयसी विमानाला २ तास लागत असावेत. तरीही बॉयसीहून जवळपास ६ तासांचा ड्राईव्ह आहेच. पण आम्ही शुक्रवारी ऑफिसेस मधून येऊन रात्रीचे विमान घेऊन रात्री उशिरा बॉईसी ला पोहोचून एखाद्या मॉटेल मध्ये राहून सकाळी बॉइसी हून गाडी रेंट करून पार्कला जाऊ असा एक (उगिच!) प्लॅन आखला. आम्हाला वाटलं की या प्रकाराने आपण दोन्ही दिशांनी धरून जवळपास १२-१३ तासांचा ड्राईव्ह वाचवू. प्रत्यक्षात ही ट्रीप म्हणजे जाणं-येणं नुस्ता गोंधळ!

शुक्रवारी घरी येऊन सामान घेऊन आम्ही विमानतळावर जायला निघालो. पण ४ जुलैचा वीकान्त असल्याने विमानतळाला जायचा रस्ता प्रचंड ट्राफिकने भरलेला. एरव्ही ४५ मिनीटं लागणार्‍या रस्त्याला त्या वेळी आम्हाला जवळपास २.५ तास लागले. नी अर्थातच विमान चुकणार याची जवळपास निश्चीती झाली...तरी पण आम्ही विमानतळावर पोहोचल्यावर सामान काढून जीवाच्या आकांताने धावत सुटलो नी विमानकंपनीच्या काउंटर वर पोहोचलो तर विमान नुकतेच रनवे लागले अशी मौलिक माहिती हाती लागली! Oh! oh!!नंतर एखादे विमान आहे का अशी विचारणा केल्यावर दुसर्‍या दिवशी संध्याकाळपर्यंत पुढचे विमान नाही अशी माहिती मिळाली.
हं! आता काय करावे? परत घरी जाऊन दुसर्‍या दिवशी येणे हा पर्याय होता पण ते नियमात बसण्यासारखे नव्हते नी शिवाय दुसर्‍या दिवशी दुपारी विमान घेऊन बॉयसी ला पोहोचल्यावर नंतर ६ तास ड्राईव्ह म्हणजे दुसरा दिवस वायाच गेला असता तेही नको होते. मग काय, सर्वानुमते (म्हणजे दोघांच्या मते) इथूनच गाडी रेंट करून ड्राईव्ह करावे अशी टूम निघाली. मग काय तडक गाडी रेंट केली नी निघालो. रात्रभर ड्राईव्ह करून पहाटे पहाटे आम्ही आमच्या मॉटेल वर पोहोचलो. (जे करावं लागू नये म्हणून विमान बुकिंग केलं होतं तेच अखेर नशिबी आलं!) मग तीन्-चार तास झोपलो नी सकाळी ११ ला पुढे निघालो.
संध्याकाळ पर्यंत आम्ही यल्लोस्टोनला जाऊन आम्ही आमच्या कँपसाईट वर टेंट उभारला. एव्हाना नवर्‍याची बॅटरी डाऊन झालेली नी डोकं दुखत असल्याने त्याने गोळी घेऊन टेंटवर पडून रहाण्याचा पर्याय निवडला. मला मात्र कधी एकदा आजू-बाजूला फिरून येत्ये असं झालेलं. त्यामुळे मी आपली गाडी घेऊन आजूबाजूला भटकून आले. जवळूनच यल्लोस्टोन नदी वहात होती नी एका ठिकाणी नदीवर पेलिकन्स जमले होते, त्यांच्या निरीक्षणात नी फोटोग्राफीत तासभर घालवून मग मी परतले.
यल्लोस्टोन म्हणजे खरोखरच आश्चर्याने भरलेले ठिकाण आहे. No wonder this is the most visited park in the US. सुमारे २ मिलीअन चौ. फूट क्षेत्रफळ असलेल्या यल्लोस्टोन चे मुख्य वैशिष्ठ्य म्हणजे तिथे असलेली active thermal features like geysers, hot springs, mudpots, and fumaroles. या भागात पृथ्वीच्या उदरामध्ये प्रचंड खळबळ चालू असते नी त्याचे परिणाम म्हणून हे - कुठे बुड्बुडे येत असलेले चिखलाचे खड्डे (mudpots), कुठे गरम पाण्याचे झरे(hot springs) पण सर्वात गम्मत म्हणजे इथे असलेले वेळोवेळी जमिनीतून जोरात बाहेर येणारे गरम पाण्याचे वा वाफेचे फवारे (gysers - गायझर्स). यल्लोस्टोन मध्ये लहान्-मोठे सुमारे ३०० गायझर्स आहेत. यातला सर्वात पॉप्युलर नी प्रसिद्ध म्हणजे ओल्ड फेथफुल गायझर. सुमारे प्रत्येक १.५ तासाने हा फवारा जोरदार बाहेर येतो...कधीही खंड न पडता त्याच्या नावाला जागून! गायझर्स चे व्हिडीओ बघायचे असतील तर इथे (disclaimer : this video is not mine. With thanks from Youtube) बघा. फार आश्चर्यकारक नी सुंदर आहे तो बघणं. नी ऐन उन्हाळ्यात त्यातून लांब-विकांताला तर पार्कात प्रचंड गर्दी असते तेव्हा हा गायझर बघायला एका वेळी जमणार्‍यांची संख्या पण हजारोंच्या आसपास असते. नी अक्षरशः स्टेडिअम मध्ये एखादी मॅच बघायला बसावे तरे चहूबाजूंनी केलेल्या बेंचेस वर लोकं बसलेली असतात.


Old faithful gyser errupting


गायझर "शो" बघायला जमलेला जनसमुदाय

एक तर पार्क प्रचंड मोठा आहे नी त्यात ४ जुलैची हीSSS गर्दी. त्यामुळे सर्वत्र जायला भरपूर वेळ लागत होता. पुढले ३-४ दिवस यल्लोस्टोन भटकंतीत कसे गेले कळलच नाही. पार्कच्या वेगवेगळ्या भागातले सर्व thermal features तर बघून झालेच शिवाय आवडता ट्रेक चा प्रोग्रॅमही झाला. याशिवाय ranger talks, ranger led trail - हे ही झालं. एका ठिकाणी सकाळी एका ranger led trek ला गेलो. कोवळ्या उन्हात फिरवत रेंजर बाई नी पार्कची नी परिसराची, विविध वनस्पतींची, प्राण्यांची सुंदर माहिती दिली. पण बाई लक्षात राहिल्या वेगळ्याच कारणानी.
तिने डोक्यावर ranger hat घातलेली. खालच्या ओठाला पांढर्‍या रंगाचे sunscreen लावलेले, cricketiers लावतात ना तसे! बोलता तिने मध्ये, "सतत sun मध्ये फिरत असाल तर sunscreen लावायला विसरू नका" असा एक सल्ला दिला नी स्वतःची कथा सांगितली. पार्क रेंजर असल्याने उन्हाळ्याच्या दिवसांत १२-१२ तास उन्हात फिरणे हा तिच्या कामाचा भाग होता. डोक्यावर ranger hat असायचीच पण त्याच्या flap ची सावली तिच्या वरच्या ओठापर्यंतच पोहोचायची. खालच्या ओठाला ऊन लागायचे. सूर्यकिरणातल्या UV rays मुळे त्वचेचा कर्करोग होऊ शकतो, तो तिच्या खालच्या ओठाला झाला. शस्त्रक्रिया करून खालचा ओठ काढावा लागला. नशिबाने अजून कुठे शरीरावर न झाल्याने थोडक्यात निभावले म्हणायचे. पण मी तरी पहिल्यांदाच सूर्यकिरणाने होणार्‍या त्वचेच्या कर्करोगाची केस बघितली नी ती अजूनही डोक्यात बसल्ये.

बाकी ग्लेशिअर सारखीच इथली लाकडाची हिस्टॉरिक लॉजेस सुध्दा तशीच सुंदर आहेत. त्यातही Old Faithful gyser च्या परिसरातलं Old Faithful lodge आतून्-बाहेरून अतिशय देखणं नी rustic !

काय नाही आहे या यल्लोस्टोन मध्ये? विविध प्रकारचे शेकडो thermal features, घनदाट जंगल, मैलोनमैल पसरलेली उघडी हिरवीगार कुरणं, शेकडो छोटे-मोठे धबधबे, प्रचंड प्रमाणावर वन्य जीवन, Grand Canyon of Yellowstone च्या रूपाने खोल दरी नी तिथले रंगीबेरंगी डोंगर (painted hills) ! एकाच जागेत सामावलेली ही विविधता आश्चर्यचकित करून सोडते.

मोकळी पसरलेली हिरवीगार कुरणं.. नितांत सुंदर! इथे अशी २ मोठ्ठी कुरणं (open meadows) आहेत -
Lamar valley and Hayden valley! सरत्या संध्याकाळी यातल्या एखाद्या meadow काठाशी तास्-दोन तास बसून रहाणे म्हणजे स्वर्गीय सुख आहे. कधी meadows वर वन्य जीवन दिसतं...आईच्या आजूबाजूला खेळणारी अस्वलाची किंवा मूसची पिल्लं असं गोडुलं दृश्य पहावयास मिळतं. एकदा आम्हाला एका वन्यजीव निरिक्षकाने लावलेल्या spotting scope मधून दूरवर असलेला लांडग्यांचा पॅक बघायला मिळाला - which is considered a rare site even in Yellowstone.

हे वन्यजीव निरिक्षक किंवा काही व्हिजिटर्स तासचे तास खुर्च्या टाकून या meadows पाशी पुस्तकं वगैरे निवांतपणे वाचत बसलेले असतात...ह्या लोकांकडे एवढा वेळ कसा असतो याचं उत्तर त्यांच्याशी बोलताना मिळालं. कित्येक लोकं विशेषतः जेष्ठ नागरीक या पार्कांमध्ये उन्हाळ्याचे ३-३ महिने रहायला येतात. आठवड्यातले ३-४ दिवस कुठेतरी हॉटेल, रेस्तॉरंट मध्ये काम करून पैसे मिळवायचे नी उरलेले दिवस मस्त पार्क भटकायचा - वन्यजीव निरीक्षण - फोटोग्राफी असे करायचे, शांतपणे वाचन करायचे असा काल ते व्यतित करतात. आम्हाला त्यांच्या जीवनाचा विलक्षण हेवा वाटला. मी तर रिटायर व्ह्यायची स्वप्नच बघत्ये Happy
या जेष्ठ नागरीकांमध्ये सुध्दा २ तट आहेत बरं का! एक तट ग्लेशिअर नॅशनल पार्कची भलावण करतो तर दुसर्‍याच्या मते - यल्लोस्टोन अधिक सुंदर! तरी बरं ही सर्व मंडळी १ वर्ष ग्लेशिअर नी एक वर्ष यल्लोस्टोन नी मग एखादं तिसरं नॅशनल पार्क करून परत या दोन पार्कस ना येतातच!
Abundant wildlife हे यल्लोस्टोन चं मोठ्ठ वैशिठ्य! मूस, एल्क, ग्रिझली अस्वलं नी काळी अस्वलं, कोल्हे, लांडगे, हरणांचे ३-४ प्रकार - पूर्वी कधीही न पाहिलेली ponghorn deers मी इथे पाहिली, शिवाय पक्ष्यांमध्ये trumpeter swans, pelicans आणि इतर अनेक. त्यातही बायसन्स (bisons) तर इथे लाखोंच्या संख्येत आहेत. बघावं तिकडे हे बायसन्स कळपाने इथे-तिथे फिरत असतात. हा प्राणी दिसतो तर महाभयंकर नी सुमारे १ टन वजन! यल्लोस्टोनच्या रस्त्यावरही फिरत असतात ही मंडळी. या प्राण्याने नुस्ती मान हलवली नी त्याचा धक्का जर आपल्या गाडीला लागला तरी आपली गाडी शटल कॉक सारखी फेकली जाईल!
याच बायसन्सनी परतीच्या प्रवासाची आमची दाणादाण उडवून दिली. शेवटच्या दिवशी अर्धा दिवस पार्क फिरून दुपारी जेऊन मग पार्कच्या बाहेर पडायचे नी रात्रीपर्यत बॉईसीला पोहोचून तिथे परत (त्याच मॉटेलमध्ये) मुक्काम ठोकून दुसर्‍या दिवशी सकाळी ७ चे विमान पकडून विमानतळावरून तडक ऑफिसेस गाठायची असा प्लॅन. पण येताना human traffic jam ने आमची भंबेरी उडवली तर परत जाताना bison traffic jam ने आमची विकेट घेतली.
झालं असं की, पार्कच्या पूर्वेच्या एका टोकाला आम्ही होतो नी पश्चिमेच्या बाजूच्या entrance ने आम्हाला बाहेर पडायचे होते...एरवीही हे अंतर कापायला १.५ तास सहज लागतो.आम्ही सुमारे १-१.३० ला पार्कच्या बाहेर पडण्यास निघालो. मध्ये एका ठिकाणी जी गाडी थांबवावी लागली ती काही पुढे काढता येण्याचं लक्षण दिसेना. पुढे पार दूरपर्यंत गाड्यांची रांगच रांग लागली होती. पहिले काही वेळ गाडीत बसून काढला की हलतीलच आता गाड्या पुढच्या म्हणत. पण छे! जैसे थे...मग नवरा उतरून पुढे चालत जाऊन पुढच्या गाड्यांमधल्या कोणाला काही माहिती आहे याची चौकशी करायला गेला तर कोणालाही काहीच माहिती नाही. शेवटी असेल एखादा अपघात पुढे... निघेल थोड्याच वेळात ट्राफिक असं म्हणून आम्ही आपले गाडीत बसून राहिलो. या प्रकारे २-२.५ गेले...मध्ये बाहेर उतरून आजूबाजूला कोणाला काही माहिती आहे का हे विचारून येणे नी मध्येमध्ये गाडीत बसणे असं सर्वांचच चालू होतं. मग कळलं की १-२ गाड्यांमधील काहीजण चालत पार पुढे गेल्येत नक्की काय झालय पुढे ते पहायला. त्यांना जाऊनही १-१.५ तास लोटलेला आणि तरीही ते परतले नव्हते. शेवटी २-२.५ तासांनी ती लोकं आली आणि कळले की भर रस्त्यात ४-५ बायसन्स नी ठाण मांडून सर्व ट्राफिक जॅम करून ठेवलाय. नक्की काय कोणाला माहित नव्हतं पण कोणी म्हणत होतं की रेंजर येऊन काही त्यांना उठवणार नाहीत कारण this place belongs to them...they are the kings (or queens) here. अरे बापरे! हे काय भलते प्रकरण! या पद्धतीने हे प्राणी रात्रभर हलणार नाहीत मग आपण काय करायचे? कोणी म्हणत होतं की नाही, रेंजर येऊन त्यांना उठवतील्...सुमारे ५-६ तासाने बातमी आली की त्या प्राणी महोदयांनी तिथून उठण्याचे कष्ट घेऊन प्रस्थान केले आहे नी आता ट्राफिक हलत आहे. नी मग अर्ध्या तासात सगळा ट्राफिक सुलभपणे चालू झाला.
पण या सर्व प्रकारात संध्याकाळचे ७ वाजून गेलेले. यानंतर अजूनही पार्क बाहेर पडायला एखाद तास नी त्यानंतर बॉईसी ला पोहोचायला ६ तास! मध्ये जेवायला थांबयचा वेळ पकडला तर सुमारे ८ तास लागणार होते बॉईसीला पोहोचायला. आम्ही जमेल तशी गाडी हाणत बॉईसीच्या रस्त्याला लागलो. नी परत एकदा रात्रभर ड्राईव्ह करून पहाटे २-३ वाजता आम्ही मॉटेलला पोहोचलो...विश्रांतीची तर नितांत गरज होती. पण सकाळी ७ चे विमान म्हटल्यावर ६ ला तरी विमानतळावर पोहोचणे भाग होते...मग अक्षरशः २ तास झोपून गजर लावून उठलो नी अंघोळी उरकून विमानतळावर जाऊन यावेळेस मात्र विमान मिळवलेच!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! काय मस्त मजा करून आलात!
पण तुमच्या उत्साहाला सलाम.

फोटो मस्त आले आहेत. तो पाणी पिऊन मान वर केलेला घोडा तर अगदी झकास!
वा! ३ महिने तेथे जाऊन राहण्याच्या कल्पनेनेही मस्त वाटते.

रेंजर लेड ट्रेक हा मस्त भाग आहे. कारण त्यात बहुदा किस्से ऐकायला मिळत असतील. Happy

परतीला गव्यांनी चांगलीच वाट लावली म्हणायची. पण रेंजरचे म्हणणे काहीसे योग्य आहे असे वाटले.

(अवांतरः पर्यायी शब्द
मड गिझर चिखलाचे कारंजे?
हॉट स्प्रिंग्ज - गरम पाण्याचे झरे / फवारे
thermal features - औष्णिक आकर्षणे? )

मस्त फोटो आणि लिहिलय सुद्धा छान.
एक विचारु का, तुमची येलोस्टोन ला जाणारि फ्लाईट मिस झालि होति, तर परत जाणारि फ्लाईट तुम्हाला कशी काय घेता आलि ? वन वे बुकिंग केले होते का?