लपून रहा प्रिये

Submitted by राजेंद्र देवी on 24 October, 2013 - 04:09

लपून रहा प्रिये

तुला पाहण्या बघ
चंद्र रोज निघतो
आठवणीत तुझ्या
कलेकलेने झिजतो

तुला शोधण्या दिवसरात्र
या नभी तो हिंडतो
घेऊन अगणित तारका
तो तुला शोधतो

लपून राहा प्रिये
सारे लागले शोधू
चांदण्या रात्री मी चोरली
चंद्राची वाग्दत्त वधू

राजेंद्र देवी

Group content visibility: 
Public - accessible to all site users